सावधान! राज्यात आजपासून वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज, 9 जुलैपर्यंत IMDचे तीव्र इशारे, कसे राहणार हवामान?
अरबी समुद्रात वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे तसेच जोरदार मान्सूनचा प्रवाह यामुळे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
Maharashtra weather update: अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रकार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे . राज्यात 5 ते 9 जुलै दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे . कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर तसेच मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी राहील . आज तळ कोकणापासून संपूर्ण किनारपट्टी भागात पावसाचे ऑरेंज अलर्ट आहेत .मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरावर जोरदार पावसाची शक्यता आहे . उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय . (IMD Rain forecast )
हवामान विभागाचा अंदाज काय ?
प्रादेशिक हवामान केंद्र व पृथ्वी मंत्रालयाने एकत्रितपणे जाहीर केलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार, 5 जुलै ते 9 जुलैपर्यंत महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा इशारा देण्यात आलाय . अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे पश्चिम बंगाल व आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय . याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्याच्या पावसाची हजेरी राहणार आहे . यावेळी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील . रविवार व सोमवार (6 व 7 जुलै) रोजी पुणे घाटमाथ्यावर पुन्हा एकदा रेड अलर्ट देण्यात आलाय . संपूर्ण कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे .
ट्रेंडिंग
पुढील चार दिवस कुठे हाय अलर्ट ?
5 जुलै : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर तसेच नाशिक ,पुणे, सातारा व कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय .
मुंबई,नंदुरबार, धुळे ,जळगाव,छत्रपती संभाजीनगर ,जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
6 जुलै : पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट, मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट , कोल्हापूर सातारा नाशिकच्या घाटमाथ्यावरही तुफान पावसाचा ऑरेंज अलर्ट
बीड ,नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार,वर्धा ,नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली : यलो अलर्ट
7 जुलै : पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट
ऑरेंज अलर्ट :रत्नागिरी, रायगड,भंडारा गोंदिया,नाशिक व साताऱ्याचा घाटमाथा
यलो अलर्ट : मुंबई, ठाणे ,पालघर, नाशिक, नंदुरबार ,धुळे ,जळगाव ,छत्रपती संभाजीनगर, जालना ,परभणी, हिंगोली, नांदेड,नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली
8 जुलै: रत्नागिरी गोंदिया व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, रायगड सिंधुदुर्ग नागपूर ,भंडारा, चंद्रपूर ,गडचिरोली,तसेच कोल्हापूर व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट
9जुलै : तळ कोकणासह पुढे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावरील पावसाचा येलो अलर्ट,नागपूर भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचाही समावेश
हेही वाचा