Ujani Dam : चिंताजनक! उजनी धरणाने गाठली मृतपातळी; सीना माढा उपसा सिंचन योजना बंद, पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले चिंता नाही
Ujani Dam : उजनी धरणाच्या जलसाठयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनदायनी ठरलेलं उजनी धरण आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास मायनसमध्ये गेलेल आहे.

Ujani Dam सोलापूर : उजनी धरणाच्या जलसाठयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनदायनी ठरलेलं उजनी धरण आज (18 एप्रिल) सकाळी सहा वाजताच्या सुमारास मायनसमध्ये गेलेल आहे. उजनी धरण प्रशासनाकडून सकाळी सहा वाजता देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार उजनी धरण सध्या 0.06 टक्के वजामध्ये आहे. सध्या उजनी धरणात एकूण साठवण क्षमतेच्या 63 पूर्णांक 62 टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे. उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ही 123 टीएमसी इतकी आहे. जेव्हा उजनी धरण 100 टक्के क्षमतेने भरतं तेव्हा उजनी धरणात 117 टीएमसी इतका पाणीसाठा मावतो, त्यापैकी 54 टीएमसी पाणीसाठा हा जिवंत पाणीसाठा म्हणून ग्राह्य धरला जातो. तर उर्वरित 63 टीएमसी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो आणि आज उजनी ही मायनसमध्ये म्हणजे मृत पातळीत गेलेली आहे.
गेल्या पावसाळी हंगामात 110% भरलेले उजनी धरण आज वजा पातळीत गेले असून यामुळे सीना माढा उपसा सिंचन योजना बंद झाली आहे. सध्या उजनी धरणाच्या मृतसाठ्यात 63 टीएमसी एवढा मुबलक पाणीसाठा असल्याने संपूर्ण उन्हाळ्यात कसलीही पाणीटंचाई जाणवणार नाही, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे.
सीना माढा उपसा सिंचन योजना बंद
गेल्या वर्षी उजनी धरण नीचांकी पातळीला पोहोचल्यानंतर केवळ 60 टक्के भरले होते. त्यामुळे गेल्या हंगामात 21 जानेवारी रोजी धरणाने वजा पातळी गाठली होती. मात्र यावर्षी धरणात जवळपास 123 टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाल्याने आज 18 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता धरणाने मृतसाठ्यात प्रवेश केला आहे. आता सीना माढा उपसा सिंचन योजना बंद झाली असून पुढील दोन दिवसात दहिगाव उपसा सिंचन योजना ही पाणी पातळी कमी झाल्याने बंद पडणार आहे. कालवा सल्लागार समितीमध्ये ठरल्याप्रमाणे 15 मे पर्यंत उजनीच्या कालव्यातून शेतीसाठी पाणी देता येणार असल्याने सर्व उन्हाळी पिकांना याचा फायदा होणार आहे.
उन्हाळी हंगामात कोठेही पाणीटंचाई जाणवणार नाही- जयकुमार गोरे
याशिवाय सोलापूर महापालिकेसह पंढरपूर, मंगळवेढा ,सांगोला या नगरपालिका व शेकडो पाणीपुरवठा योजनांना भीमा नदीतून सध्या पाणी सोडण्यात येत असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता ही मिटली आहे. भीमा नदीत सोडलेले हे पाणी औज बंधाऱ्यापर्यंत पोहोचले असून पुढील दोन दिवसात हिल्लि बंधाऱ्यापर्यंत पोहोचेल. यावर्षी पाण्याचे काटेकोर नियोजन झाल्यामुळे संपूर्ण उन्हाळी हंगामात कोठेही पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा दावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
