एक्स्प्लोर

Beed Crime: अंबाजोगाईत महिला वकिलाने डीजेच्या आवाजाची तक्रार केली, सरपंचाने बेदम मारलं, पाईपच्या माराने अंग काळनिळं पडलं

Beed Crime News : अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

Beed Crime News : गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा हा जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या कृत्यामुळे सतत चर्चेत आहे. अशातच अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.  धक्कादायक  बाब म्हणजे, सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला (Female Lawyer Beating) सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण केली गेलीय. यात पाईपच्या माराने अंग काळनिळं पडल्याचे ही पुढे आले आहे. किरकोळ वादातून उफाळून आलेल्या या अमानुष मारहाणीचा प्रकार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार  जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक्सवर पोस्ट केल्यानंतर समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आला असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 

जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टनंतर समोर आला मारहाणीचा प्रकार 

पुढे आलेल्या माहिती नुसार, घटनेतील पडीत महिलेने ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने घरापुढील लाऊडस्पिकर, पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. यानंतर या वकील महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीनंतर ही महिला बेशुद्ध देखील पडली होती. त्यानंतर तिला उपचारानंतर घरी पाठवल्याचे या पोस्ट मध्ये म्हटले आहे. या मारहाणीनंतरचे फोटो देखील आता समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिल्यानंतर अंबाजोगाई तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शेतात रिंगण करून काठ्या आणि जे.सी.बी पाईपने जबर मारहाण

अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीली करणार्‍या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जे.सी.बी पाईपने जबर मारहाण केली आहे. यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातुन ही एका रात्रीत उपचार करून घरी पाठवलं आहे. सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळुन एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल, कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत विचारला आहे. त्यामुळे या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : मुंबई दोनशेच्या नशेत, पण पंजाबचा दोनशे चेसचा पराक्रम आजवरच्या इतिहासात कोणत्याच संघाला जमला नाही! बुमराहचा सुद्धा आरसीबी आणि पंजाबविरुद्ध दुर्दैवाने योगायोग
मुंबई दोनशेच्या नशेत, पण पंजाबचा दोनशे चेसचा पराक्रम आजवरच्या इतिहासात कोणत्याच संघाला जमला नाही! बुमराहचा सुद्धा आरसीबी आणि पंजाबविरुद्ध दुर्दैवाने योगायोग
Jasprit Bumrah: बोल्ट मुंबईसाठी व्हिलन झालाच, पण बुमराहसोबत सुद्धा गेल्या पाच वर्षात कधीच घडलं नाही ते सुद्धा घडलं!
बोल्ट मुंबईसाठी व्हिलन झालाच, पण बुमराहसोबत सुद्धा गेल्या पाच वर्षात कधीच घडलं नाही ते सुद्धा घडलं!
Maharashtra Rain Farmers: यंदाचा पाऊस खास का ठरणार, शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस का येणार? डॉ. पंजाबराव डख यांनी सांगितलं कारण
यंदाचा पाऊस खास का ठरणार, शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस का येणार? डॉ. पंजाबराव डख यांनी सांगितलं कारण
Ukraine Drone attack on Russia: युक्रेनच्या गुप्तहेर खात्याने ट्रकच्या छतात लपवून ड्रोन्स आतमध्ये आणली अन् रशियाची 41 लढाऊ विमानं खाक करुन टाकली
युक्रेनच्या गुप्तहेर खात्याची कमाल, ट्रकच्या छतात लपवून ड्रोन्स रशियात नेले अन् सगळं बेचिराख केलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Indigo Delhi Raipur Flight : धुळीच्या वादळात अडकलं विमान, टर्बुलन्सचा थरारक व्हिडिओ समोर!Santosh Ladda Gold Robbery : चोरी करुन चोर गेले देवदर्शनाला.. आरोपींचं शिर्डी, श्रीशैलम, तिरुपती देवदर्शन Special ReportABP Majha Headlines 08 AM TOP Headlines 02 June 2025 Maharashtra Marathi NewsAjit Pawar And Sharad Pawar : AI वरुन चॅट GPT; बैठकीनंतर पवरांमध्ये बंद दाराआड चर्चा? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : मुंबई दोनशेच्या नशेत, पण पंजाबचा दोनशे चेसचा पराक्रम आजवरच्या इतिहासात कोणत्याच संघाला जमला नाही! बुमराहचा सुद्धा आरसीबी आणि पंजाबविरुद्ध दुर्दैवाने योगायोग
मुंबई दोनशेच्या नशेत, पण पंजाबचा दोनशे चेसचा पराक्रम आजवरच्या इतिहासात कोणत्याच संघाला जमला नाही! बुमराहचा सुद्धा आरसीबी आणि पंजाबविरुद्ध दुर्दैवाने योगायोग
Jasprit Bumrah: बोल्ट मुंबईसाठी व्हिलन झालाच, पण बुमराहसोबत सुद्धा गेल्या पाच वर्षात कधीच घडलं नाही ते सुद्धा घडलं!
बोल्ट मुंबईसाठी व्हिलन झालाच, पण बुमराहसोबत सुद्धा गेल्या पाच वर्षात कधीच घडलं नाही ते सुद्धा घडलं!
Maharashtra Rain Farmers: यंदाचा पाऊस खास का ठरणार, शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस का येणार? डॉ. पंजाबराव डख यांनी सांगितलं कारण
यंदाचा पाऊस खास का ठरणार, शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस का येणार? डॉ. पंजाबराव डख यांनी सांगितलं कारण
Ukraine Drone attack on Russia: युक्रेनच्या गुप्तहेर खात्याने ट्रकच्या छतात लपवून ड्रोन्स आतमध्ये आणली अन् रशियाची 41 लढाऊ विमानं खाक करुन टाकली
युक्रेनच्या गुप्तहेर खात्याची कमाल, ट्रकच्या छतात लपवून ड्रोन्स रशियात नेले अन् सगळं बेचिराख केलं
Shreyas Iyer News : लढाई हरलो पण युद्ध नाही, श्रेयस अय्यर नुसता बोलला नाही, तर करून दाखवलं, एकट्याने पंजाबला अंतिम फेरीत पोहचवले!
लढाई हरलो पण युद्ध नाही, श्रेयस अय्यर नुसता बोलला नाही, तर करून दाखवलं, एकट्याने पंजाबला अंतिम फेरीत पोहचवले!
Sambhajiraje Chhatrapati : दूर्गराज रायगडावर ऐतिहासिक ठेवा सापडला, संभाजीराजे छत्रपती यांची फेसबुक पोस्टद्वारे ‘यंत्रराज’ बद्दल माहिती
दूर्गराज रायगडावर ऐतिहासिक ठेवा सापडला, संभाजीराजे छत्रपती यांची फेसबुक पोस्टद्वारे ‘यंत्रराज’ बद्दल माहिती
निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण तटकरेंचा कुठेच लवलेश असणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण तटकरेंचा कुठेच लवलेश असणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Shashi Tharoor : काँग्रेस नेत्यांकडून टीका, ब्राझीलमध्ये प्रश्नाचं उत्तर देत  शशी थरुर म्हणाले,'आता वेळ आलीय की...'
काँग्रेस नेत्यांकडून टीका, ब्राझीलमध्ये प्रश्नाचं उत्तर देत शशी थरुर म्हणाले,'आता वेळ आलीय की...'
Embed widget
OSZAR »