एक्स्प्लोर

भीषण अपघात! नादुरुस्त उभ्या ट्रकवर भरधाव आयशर टेम्पो अन् कार आदळली; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर, औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना  

Tuljapur Accident News : औसा-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील बेलकुंड येथे एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. पावसामुळे वाहन चालकास अंदाज न आल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितलं जात आहे.

Tuljapur Accident News : राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यात तुळजापूर जिल्ह्याभरात देखील काल (3 एप्रिल)संध्याकाळपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) चांगलाच जोर धरला होता. अशातच औसा-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील (Ausa-Tuljapur National Highway) बेलकुंड येथे एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. पावसामुळे वाहन चालकास अंदाज न आल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितलं जात आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय,  तर तीन लोक जखमी झाले आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भादा पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील कारवाई सुरू केली. तर जखमींवर औषध उपचार करण्यात आले. मात्र सारखा पाऊस सुरू असल्याने मदत कार्य पोहोचवताना अडचणींना सामोरे जावं लागलं. सतत सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे वाहन चालकांचा अंदाज चुकला आणि हा अपघात होऊन यात दोघांचा जीव गेला आहे.

पावसामुळे चालकास अंदाज न आल्यामुळे भीषण अपघात     

पुढे आलेल्या माहितीनुसार, औसा - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बेलकुंड येथे रात्री नादुरुस्त असलेल्या ट्रकला मागून आयशर टेम्पो धडकला. त्याचवेळी आयशर टेम्पो मागून येणारी कार आयशर टेम्पोला धडकून भीषण अपघात झाला. या घटनेत आयशर टेम्पो चालक आणि नादुरूस्त ट्रक दुरूस्ती करणारा मेकानिकचा जागीच मृत्यू झाला आहे.

दोघांच जागीच मृत्यू आणि तीन जण जखमी

औसा -तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बेलकुंड जवळ  रात्री आठ वाजण्याच्या सुमारास (एमएच २६ -७२१२ ) क्रमांकाचा ट्रक नादुरूस्त अवस्थेत उभा होता. हा ट्रक दुरूस्त करण्याचे काम सुरू होते. ट्रॅक खाली एक मेकानिक साथीदारास मदत करण्यासाठी गेला होता. त्याचवेळी औसा वरून पुणे येथे कोंथिबीर घेऊन निघालेल्या (एमएच २५ पी ३७३७) आयशर टेम्पोच्या चालकाला सुरू असलेल्या पावसामुळे नादुरुस्त अवस्थेत उभा असलेल्या ट्रकचा अंदाज आला नाही. भरधाव वेगातल्या आयशरने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकखाली काम करणाऱ्या व्यक्तीचाही यामुळे मृत्यू झाला. आयशरच्या पाठीमागून येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारणे अचानक झालेल्या घटनेमुळे वेळेवर ब्रेक न लागल्याने आयशरला पाठीमागून धडक दिली. कार मधील दोघांना किरकोळ मार लागला आहे. तर ट्रकच्या बाजूला असलेल्या व्यक्तीस ही मार लागला आहे. या घटनेत दोघांच जागीच मृत्यू आणि तीन जण जखमी झाले आहेत.
 
घटनेची माहिती भादा पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर औषध उपचार करण्यात आले. सारखा पाऊस सुरू असल्याने मदत कार्य पोहोचवताना अडचणींना सामोरे जावं लागलं... अवकाळी पावसामुळे वाहन चालकांचा अंदाज चुकला आणि दोघांचा जीव गेला.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anushka Sharma : आरसीबी फायनलमध्ये अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर हसू, डोळ्यात आसू, विराटचं स्वप्न एका पावलावर
आरसीबी फायनलमध्ये अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर हसू, डोळ्यात आसू, विराटचं स्वप्न एका पावलावर
Gokul : गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा दबाव, कमालीची गुप्तता, संचालकांना लिफाफ्यातून नाव कळवणार
गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा दबाव, अध्यक्षपदी कुणाची वर्णी?
सोलापुरात अपघाताची भीषण घटना; बोलेरो दोनदा पलटी, स्कुटीवरील 2 महिला जखमी
सोलापुरात अपघाताची भीषण घटना; बोलेरो दोनदा पलटी, स्कुटीवरील 2 महिला जखमी
RCB vs PBKS Qualifier 1 : इस साल कप नामदे... पंजाबला पराभूत आरसीबीची फायनलमध्ये धडक! पंजाब किंग्जचा आठ विकेट्सनी पराभव
इस साल कप नामदे... पंजाबला पराभूत आरसीबीची फायनलमध्ये धडक! पंजाब किंग्जचा आठ विकेट्सनी पराभव
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anil Kaspate Special Report : आधी वैष्णवीचा छळ, चारित्र्यावर शिंतोडे, मनावर ओरखडे Vaishnavi HagawaneZero Hour Full : वैष्णवीला 'थप्पड' मारली...बस इतनी सी बात? हगवणेंच्या वकीलांचा युक्तीवाद...आणि वाद!Ladki Bahin Yojana Special Report :'लाडकी'चा निधी जोरात वादावादी;तिजोरीवर भार ,लाडकीसाठी निधी पळवला?Beed Mango Farmer : पावसामुळे आंब्याची बाग उद्ध्वस्त, शेतकरी महिलेचा अश्रूंचा बांध फुटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anushka Sharma : आरसीबी फायनलमध्ये अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर हसू, डोळ्यात आसू, विराटचं स्वप्न एका पावलावर
आरसीबी फायनलमध्ये अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर हसू, डोळ्यात आसू, विराटचं स्वप्न एका पावलावर
Gokul : गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा दबाव, कमालीची गुप्तता, संचालकांना लिफाफ्यातून नाव कळवणार
गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा दबाव, अध्यक्षपदी कुणाची वर्णी?
सोलापुरात अपघाताची भीषण घटना; बोलेरो दोनदा पलटी, स्कुटीवरील 2 महिला जखमी
सोलापुरात अपघाताची भीषण घटना; बोलेरो दोनदा पलटी, स्कुटीवरील 2 महिला जखमी
RCB vs PBKS Qualifier 1 : इस साल कप नामदे... पंजाबला पराभूत आरसीबीची फायनलमध्ये धडक! पंजाब किंग्जचा आठ विकेट्सनी पराभव
इस साल कप नामदे... पंजाबला पराभूत आरसीबीची फायनलमध्ये धडक! पंजाब किंग्जचा आठ विकेट्सनी पराभव
Rule Change: LPG, क्रेडिट कार्ड ते आधार कार्ड अपडेट,  1 जूनपासून लागू होणार 5 मोठे बदल, जाणून घ्या अपडेट 
एलपीजी सिलेंडरचे दर ते क्रेडिट कार्डचे नियम,आधार अपडेट, 1 जूनपासून 5 मोठे बदल लागू होणार
सरकारी नोकरीची मोठी संधी, हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले फक्त काही तास 
सरकारी नोकरीची मोठी संधी, हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले फक्त काही तास 
भाजप आमदार महोदयांची राऊडी स्टाईल, मिल कामगारांच्या पगारासाठी अधिकाऱ्यावर उगारली पाणी बॉटल
भाजप आमदार महोदयांची राऊडी स्टाईल, मिल कामगारांच्या पगारासाठी अधिकाऱ्यावर उगारली पाणी बॉटल
नांदेडमध्ये खदानीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू; मामाच्या गावी आलेल्या संघर्षने गमावला जीव, गावात हळहळ
नांदेडमध्ये खदानीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू; मामाच्या गावी आलेल्या संघर्षने गमावला जीव, गावात हळहळ
Embed widget
OSZAR »