एक्स्प्लोर

मोठी बातमी! तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून नवीन दर्शन आराखडा तयार; स्तनदा माता, दिव्यांग अन् वृद्धांना मिळणार आता थेट दर्शन

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नवीन व्हीआयपी दर्शन आराखड्यानुसार स्तनदा माता, दिव्यांग तसेच आधार घेऊन चालणारे वृद्ध यांना आता थेट निःशुल्क दर्शन मिळणार आहे.

धाराशिव: तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या (Tuljabhavani Temple)  नवीन व्हीआयपी दर्शन आराखड्यानुसार स्तनदा माता, दिव्यांग तसेच आधार घेऊन चालणारे वृद्ध यांना आता थेट निःशुल्क दर्शन मिळणार आहे. तसेच मंदिर संस्थानला दहा हजार किंवा त्याहून अधिक देणगी, वस्तु देणाऱ्या कुटुंबाला सुद्धा थेट मोफत दर्शनाचा लाभ मिळणार आहे. तर मंदिर विश्वस्त किंवा व्यवस्थापक यांच्या शिफारशीने येणाऱ्या भाविकांना (Devotees) व्हीआयपी दर्शनासाठी दोनशे रुपयांचा पास घ्यावा लागणार आहे. मंदिर संस्थानकडून नवीन दर्शन आराखडा प्रस्तावित करण्यात आला असून त्याबाबत भाविकातून सूचना आणि अभिप्राय मागवले आहेत. 

दरम्यान, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे भाविक भक्तांच्या सोयीसाठी व व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टिकोनातून, महत्वाच्या व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी दर्शन सुविधा प्रस्तावित करण्यात येत असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. यामध्ये सर्व महंत, पुजारी आणि भाविक भक्तांना यासंदर्भात काही सूचना अथवा अभिप्राय असल्यास ते दिनांक 19 मे 2025 ते 26 मे 2025 दरम्यान संस्थानच्या अधिकृत ई-मेल वर पाठवावेत. असे आवाहन करण्यात आले आहे. त्या करिता Email id - [email protected] ही  संस्थानची अधिकृत ई-मेल आयडी देण्यात आली आहे. 

10,000 किंवा त्याहून अधिक देणगी देणाऱ्यांना कुटुंबासह नि:शुल्क दर्शन 

1) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, राज्यपाल, न्यायालयीन न्यायाधीश, मंत्री, संसद/विधीमंडळाचे आजी-माजी सदस्य, राज्य मंत्री दर्जा असलेल्या व्यक्ती, सर्व महामंडळाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष, संविधानिक आयोगाचे अध्यक्ष, भारतीय सैन्यदलातील अधिकारी व सैनिक आदी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना कुटुंबासह नि:शुल्क दर्शन.

2) रु. 10,000 किंवा त्याहून अधिक रक्कम अथवा वस्तू अर्पण करणाऱ्या भाविकांना कुटुंबासह नि:शुल्क दर्शन.

3) मंदिरातील प्रथा परंपरेनुसार मंदिरात येणाऱ्या अध्यात्मिक/धार्मिक/मानकरी व मंदिर कामकाजाशी संबंधित व्यक्तींना नि:शुल्क दर्शन.

4) राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला, क्रीडा, विज्ञान, साहित्य, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त व्यक्ती, महाराष्ट्र व इतर राज्यातील मंदिर देवस्थान समितीचे विश्वस्त यांना नि:शुल्क दर्शन.

5) दिव्यांग (अस्थीव्यंग व अंध), स्तनदामाता व मदतनीसाशिवाय चालू न शकणाऱ्या वयस्कर व्यक्तींना नि:शुल्क दर्शन.

6) केंद्र व राज्य शासनाच्या सेवेतील वर्ग 1 चे सर्व प्रशासकीय अधिकारी कुटुंबासह आल्यास 4 व्यक्तींपर्यंत नि:शुल्क दर्शन, त्यानंतर प्रत्येक व्यक्तीसाठी रु. 200 देणगी शुल्क. (कुटुंब- स्वतः, पती-पत्नी, मुले, आई व वडील)

7) उपरोक्त अ.क्र 1,4 व 6 मध्ये नमुद नसलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती/संस्थांचे प्रमुख कुटुंबासह आल्यास 4 व्यक्तींपर्यंत नि:शुल्क दर्शन, त्यानंतर प्रत्येक व्यक्तीसाठी रु. 200 देणगी शुल्क. (कुटुंब- स्वतः पती-पत्नी, मुले, आई व वडील)

८) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान विश्वस्त सदस्य, मंदिर व्यवस्थापक यांच्या शिफारशीने आलेल्या व्यक्तींना रु. 200 देणगी शुल्क.

९) महाराष्ट्र राज्य व इतर राज्यातील मंत्री कार्यालय/संसद/विधिमंडळ सदस्य व संविधानिक महामंडळ/आयोग यांच्या लेखी शिफारशीने आलेल्यांना रु. 200 देणगी शुल्क.

या प्रस्तावित योजना मंदिर व्यवस्थापनाच्या सुव्यवस्थेसाठी असून, भाविक भक्तांचे सहकार्य अपेक्षित आहे. असे देखील मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru, Qualifier 1 : तर आरसीबी यंदा आयपीएलचा मानकरी ठरणार? गेल्या 14 वर्षांपासून विजेतेपद पटकावलेल्या संघांचा वेगळाच पॅटर्न समोर!
तर आरसीबी यंदा आयपीएलचा मानकरी ठरणार? गेल्या 14 वर्षांपासून विजेतेपद पटकावलेल्या संघांचा वेगळाच पॅटर्न समोर!
IPL 2025 Playoffs Rules : क्वालिफायर 1, क्वालिफायर 2 आणि एलिमिनेटर सारखे प्लेऑफ सामने खराब हवामानामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे रद्द झाले तर काय होईल?
क्वालिफायर 1, क्वालिफायर 2 आणि एलिमिनेटर सारखे प्लेऑफ सामने खराब हवामानामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे रद्द झाले तर काय होईल?
तरुणाला घरातून ओढत बाहेर काढलं, लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण, वाळू तस्करीतून घनसावंगीत धक्कादायक प्रकार
तरुणाला घरातून ओढत बाहेर काढलं, लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण, वाळू तस्करीतून घनसावंगीत धक्कादायक प्रकार
EPFO 3.0 लवकरच होणार लॉन्च; 9 कोटी लोकांना होणार थेट फायदा, या' 5 मोठ्या बदलांवर एकदा नजर माराच!
EPFO 3.0 लवकरच होणार लॉन्च; 9 कोटी लोकांना होणार थेट फायदा, या' 5 मोठ्या बदलांवर एकदा नजर माराच!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पीत नाही,सुळेंना सणसणीत टोलाSupriya Sule On Sanjay Raut : तहान लागल्यावर गटारातलं पाणी पितं नाही? संजय राऊतांचा टोलाLaxman Hake Pandharpur : ओबीसीचे झोपडे उध्वस्त कराल तर..लक्ष्मण हाकेंचा फडणवीस,जरांगेंना इशाराJammu Kashmir Dal Lake : घाबरायची गरज नाही, काश्मीर सुरू होतंय; भारतीयांनी काश्मीरात यावं..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru, Qualifier 1 : तर आरसीबी यंदा आयपीएलचा मानकरी ठरणार? गेल्या 14 वर्षांपासून विजेतेपद पटकावलेल्या संघांचा वेगळाच पॅटर्न समोर!
तर आरसीबी यंदा आयपीएलचा मानकरी ठरणार? गेल्या 14 वर्षांपासून विजेतेपद पटकावलेल्या संघांचा वेगळाच पॅटर्न समोर!
IPL 2025 Playoffs Rules : क्वालिफायर 1, क्वालिफायर 2 आणि एलिमिनेटर सारखे प्लेऑफ सामने खराब हवामानामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे रद्द झाले तर काय होईल?
क्वालिफायर 1, क्वालिफायर 2 आणि एलिमिनेटर सारखे प्लेऑफ सामने खराब हवामानामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे रद्द झाले तर काय होईल?
तरुणाला घरातून ओढत बाहेर काढलं, लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण, वाळू तस्करीतून घनसावंगीत धक्कादायक प्रकार
तरुणाला घरातून ओढत बाहेर काढलं, लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण, वाळू तस्करीतून घनसावंगीत धक्कादायक प्रकार
EPFO 3.0 लवकरच होणार लॉन्च; 9 कोटी लोकांना होणार थेट फायदा, या' 5 मोठ्या बदलांवर एकदा नजर माराच!
EPFO 3.0 लवकरच होणार लॉन्च; 9 कोटी लोकांना होणार थेट फायदा, या' 5 मोठ्या बदलांवर एकदा नजर माराच!
मोठी बातमी : ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना दहा हजार रुपये देणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
मोठी बातमी : ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना दहा हजार रुपये देणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
Vaishnavi Hagawane Death: 'फरार नीलेश चव्हाणला पकडून ठेवलंय, त्याच्याकडे दोन पिस्तूल', पोलिसांचा ताफा पोहोचला तर...खोटी माहिती दिल्यानं गुन्हा दाखल
'फरार नीलेश चव्हाणला पकडून ठेवलंय, त्याच्याकडे दोन पिस्तूल', पोलिसांचा ताफा पोहोचला तर...खोटी माहिती दिल्यानं गुन्हा दाखल
जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कोथींबीरीसह कोबीचं पिकं मातीत, शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका
जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कोथींबीरीसह कोबीचं पिकं मातीत, शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका
Pune News: पुण्यात भाजप आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न; शिवीगाळ करत धमकावलं, एकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात भाजप आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न; शिवीगाळ करत धमकावलं, एकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
Embed widget
OSZAR »