एक्स्प्लोर

Shahaji Bapu Patil on Ajit Pawar : शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटलांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, अनेकांची...

येणारी 2024 ची निवडणूक महायुती मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात लढवेल आणि विजयी होईल, आमच्या सरकारकडे मोठे बहुमत असल्याने सरकारला कसलाही धोका नसल्याचे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.

Shahaji Bapu Patil on Ajit Pawar : भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेल्या पोस्टर्सवरून सांगोलाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना (Shahaji Bapu Patil on Ajit Pawar) अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ते आज (23 जुलै) सांगलीत (Sangli News) फॅबटेक मल्टीस्टेट सोसायटीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. राष्ट्रवादीमधील फुटीर अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या वाढदिनी शुभेच्छा देताना केलेल्या ट्विटनंतर राजकीय भूवया उंचावल्या आहेत. मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच असे ट्विट केल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चा रंगल्या आहेत.

सरकारला कसलाही धोका नाही 

आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की, भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांची महत्त्वकांक्षा असते. मात्र, सध्याचे शिंदे यांचं नेतृत्व भक्कम आहे आणि सर्वांना न्याय देणारं आहे. त्यामुळे येणारी 2024 ची निवडणूक महायुती मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात लढवेल आणि विजयी होईल. आमच्या सरकारकडे मोठे बहुमत असल्याने सरकारला कसलाही धोका नसल्याचे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले. अजित पवारांनी आमदारांना केलेल्या निधी वाटपाचे स्वागत करत सर्व आमदार समाधानी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

ग्रामीण आणि शहरी निधीमध्ये फरक असतो

जयंत पाटील आणि आव्हाड यांना निधी दिला नाही, यावर बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण आणि शहरी निधीमध्ये फरक असतो. त्यामुळे भविष्यात नगरविकास मधून निधी मिळेल. मात्र, मी तरी निधीवरून समाधानी आहे. राज्यात एकीकडे पावसाचा हाहाकार आहे. मात्र, सांगोला तालुक्यात पावसाची ओढ असल्याने येथील शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी शहाजी बापू पाटील यांनी केली. 

भाजप सेनेच्या विचारला भारावून वेगळी वाट पकडली

शहाजी बापू पाटील म्हणाले की, मी सांगलीत असताना काँग्रेसमध्ये राहून युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम केले. मात्र, कालांतराने भाजप शिवसेना यांच्या विचाराने भारावून गेल्याने मी वेगळी वाट पकडली अशी कबुलीही त्यांनी दिली. महायुतीत दाखल झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात जास्त कामे माझ्या मतदारसंघात झाल्याचा दावाही शहाजी बापू पाटील यांनी केला.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
Pakistan : किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
4 लाखांचा हुंडा दिला तरी आणखी 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ, अंबाजोगाईत वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती
4 लाखांचा हुंडा दिला तरी आणखी 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ, अंबाजोगाईत वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती
3 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार केला; नॅशनल पार्कच्या जंगलात तुफानी चकमक
3 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार केला; नॅशनल पार्कच्या जंगलात तुफानी चकमक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Speech Samruddhi: 100-120 वेग,फडणवीसांचं ड्रायव्हिंग;दादा म्हणतात, विम्याची गरज पडली नाहीEknath Shinde Speech Samruddhi Highway :नागूपर ते मुंबई गेम चेंजर प्रकल्प पूर्ण, एकनाथ शिंदेंचं भाषणDevendra Fadnavis Speech Samruddhi Highway ; नागूपर ते मुंबई सुस्साट, देवेंद्र फडणवीसांचं भाषणSanjay Raut VS Girish Mahajan Special Report : नाच्या शब्दाचा वापर, गिरीश महाजन संजय राऊतांची जुंपली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
Pakistan : किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
4 लाखांचा हुंडा दिला तरी आणखी 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ, अंबाजोगाईत वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती
4 लाखांचा हुंडा दिला तरी आणखी 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ, अंबाजोगाईत वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती
3 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार केला; नॅशनल पार्कच्या जंगलात तुफानी चकमक
3 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार केला; नॅशनल पार्कच्या जंगलात तुफानी चकमक
13 गंभीर गुन्हे, 3 मकोका, माजी आमदाराचे मावस भाऊ; सुनेला छळणारे पुण्यातील गायकवाड पिता-पुत्र कोण?
13 गंभीर गुन्हे, 3 मकोका, माजी आमदाराचे मावस भाऊ; सुनेला छळणारे पुण्यातील गायकवाड पिता-पुत्र कोण?
नाशिकमध्ये लव्ह जिहादची धक्कादायक घटना, तरुणीला फूस लाऊन शारिरीक संबंध ठेवले, गर्भवती झाल्यावर कळलं...
नाशिकमध्ये लव्ह जिहादची धक्कादायक घटना, तरुणीला फूस लाऊन शारिरीक संबंध ठेवले, गर्भवती झाल्यावर कळलं...
TMC MP Mahua Moitra : तृणमुल काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या 50 वर्षीय खासदार महुआ मोईत्रा थेट जर्मनीत गुपचूप विवाहबंधनात; 65 वर्षीय पती पिनाकी मिश्रा आहेत तरी कोण?
तृणमुल काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या 50 वर्षीय खासदार महुआ मोईत्रा थेट जर्मनीत गुपचूप विवाहबंधनात; 65 वर्षीय पती पिनाकी मिश्रा आहेत तरी कोण?
Kolhapur News : दहा लाखांच्या हुंड्यासाठी लव्ह मॅरेज केलेल्या पतीकडून सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा छळ; पोटावर लाथ मारून ठार मारण्याची धमकी
दहा लाखांच्या हुंड्यासाठी लव्ह मॅरेज केलेल्या पतीकडून सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा छळ; पोटावर लाथ मारून ठार मारण्याची धमकी
Embed widget
OSZAR »