एक्स्प्लोर

आमच्यावर 50 खोक्यांचा आरोप करण्याऱ्यांना देव माफ करणार नाही, गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला पैसे मिळाले नसते : शहाजीबापू पाटील

Shahaji Bapu Patil : महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचे दहा-बारा उमेदवार आहेत, मात्र महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार यात तिळमात्र शंका नाही असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

सांगली : महाविकास आघाडीमध्ये भावी मुख्यमंत्र्यांचे दहा-बारा पोस्टर्स लागतात, पण महायुतीमध्ये एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार यात तिळमात्र शंका नाही असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं. ठाकरे गटाचे नेते आमच्यावर 50 खोके घेतल्याचा आरोप करतात, पण आमच्यावर आरोप करणाऱ्यांना देव माफ करणार नाही असंही ते म्हणाले. विट्यामध्ये टेंभू योजनेच्या कार्यक्रमाच्या शुभारंभी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. खानापूर-आटपाडीचे माजी आमदार अनिल बाबर यांचे स्वप्न असलेल्या टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामांचा मुख्यमंत्रीनी शुभारंभ केला. 

आम्हाला 50 खोके मिळाले नाही

यावेळी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे की शिंदेंसोबतच्या आमदारांना 50 खोके भेटले. आम्हीपण आमच्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगू की आम्हाला 50 खोके भेटले नाहीत. उठ सुट 50 खोके आम्हाला मिळाले असे ओरडत आहेत. पण पन्नास खोक्यांचा आमच्यावर आरोप करणाऱ्यांना देव माफ करणार नाही. 

आम्ही जर गुहावाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला पैसे भेटले असते का? असा सवाल यावेळी शहाजीबापू पाटील यांनी विचारला. 

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकदम ओके

यावेळी शहाजीबापू पाटील यांनी त्यांचा प्रसिद्ध डॉयलॉग मारला. 'एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकदम ओके' असं म्हणताच उपस्थितातून त्याला दाद मिळाली. मविआमधील नेत्यांचे भावी मुख्यमंत्र्यांचे दहा-बारा पोस्टर लागतात, पण एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार यात तिळमात्र  शंका नाही असं शहाजीबापू पाटील म्हणाले. 

मविआने भंगार गोळा करायला सुरुवात केली आहे असा टोला महाविकास आघाडीमध्ये होणाऱ्या इन्कमिंगवर शहाजीबापू पाटील यांनी लगावला. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हाला भेटत नव्हते. 

संजय राऊतांना मतदान करायची इच्छा नव्हती

शहाजीबापू पाटील म्हणाले की, संजय राऊतांना मतदान करण्याची आमची इच्छा नव्हती. पण आम्हाला संजय राऊत नाही शिवसेना महत्त्वाची होती. त्यामुळे सर्वांनी गुपचूप मतदान करावं असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. 

शहाजीबापू पाटील म्हणाले की, अनिलभाऊ  बाबर निवडणुकीत पडले तरी पुन्हा ताकतीने उठून काम करायचे. माझ्या इतकं तर आमदारकीला कोणी पडलं नाही. गणपतराव देशमुख माझ्या विरोधात सर्वाधिक वेळा निवडून आले.

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांची दहशत सुरुच, आता तीन कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; डोळ्याला आणि डोक्याचा चावा

खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू, अकोला महापालिकेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

थेट शाळेच्या खोलीमध्येच महिला शिक्षिकेला मागून पकडलं, मोबाईल हिसकावला अन् डीन म्हणाला, 'आज रात्री एकटीच फ्लॅटवर भेटायला ये, मोबाईल हवा असेल तर तुला..'

Video : तू कसला सोसायटीचा सचिव, पार्किंगमध्ये कार कशी आली? उपसंचालक पेटला अन् दातानं इंजिनिअरच्या नाकाचा 'शेंडा' कापत तुकडा पाडला!

व्हिडीओ

Latur Robbery CCTV : लातूरच्या औसा शहरात मोबाईलच्या दुकानात डल्ला,लाखोंचा माल चोरीलाNandurbar Shahada | झाडं कोलमडली, विजेचे खांब पडले,घरांची पडझड; शहादा तालुक्याला वादळाचा तडाखाVaishnavi Hagawane Update :मुलींचा खूप नाद,हुंड्यासाठीही छळलं; हगवणेनं थार वापरली तो मित्रही तसलाच!Pakistan Joker : जोकर पाकिस्तान, ओवैसींकडून खिल्ली Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांची दहशत सुरुच, आता तीन कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; डोळ्याला आणि डोक्याचा चावा
इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांची दहशत सुरुच, आता तीन कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; डोळ्याला आणि डोक्याचा चावा
खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू, अकोला महापालिकेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू, अकोला महापालिकेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
थेट शाळेच्या खोलीमध्येच महिला शिक्षिकेला मागून पकडलं, मोबाईल हिसकावला अन् डीन म्हणाला, 'आज रात्री एकटीच फ्लॅटवर भेटायला ये, मोबाईल हवा असेल तर तुला..'
थेट शाळेच्या खोलीमध्येच महिला शिक्षिकेला मागून पकडलं, मोबाईल हिसकावला अन् डीन म्हणाला, 'आज रात्री एकटीच फ्लॅटवर भेटायला ये, मोबाईल हवा असेल तर तुला..'
Video : तू कसला सोसायटीचा सचिव, पार्किंगमध्ये कार कशी आली? उपसंचालक पेटला अन् दातानं इंजिनिअरच्या नाकाचा 'शेंडा' कापत तुकडा पाडला!
Video : तू कसला सोसायटीचा सचिव, पार्किंगमध्ये कार कशी आली? उपसंचालक पेटला अन् दातानं इंजिनिअरच्या नाकाचा 'शेंडा' कापत तुकडा पाडला!
रुपाली चाकणकरांचा तोल सुटला, कारण...; वैष्णवी हगवणे प्रकरणावरुन राष्ट्रवादीच्याच महिला नेत्याची बोचरी टीका

मोठी बातमी: पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळाच्या विकासासाठी 681 कोटी मंजूर, अजित पवार यांच्या नियोजन विभागाची प्रशासकीय मान्यता

शेतकऱ्याचा कांदा चिखलात माखला, नाशिकसह राज्यभरात कांद्याला कवडीमोल भाव, क्विंटलमागे शेतकऱ्याला किती मिळतायत?

मविआतून विधानसभा लढलेल्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; काकांची साथ सोडून धरला दादांचा हात

Embed widget
OSZAR »