Pune IT Engineer Death: तोंडावर स्कार्फ बांधून लिफ्टमध्ये शिरली, हिंजवडीतील अभियंता तरुणीचा उडी मारण्यापूर्वीचा व्हिडीओ समोर
Pune IT Engineer Death: पोलिसांनी तिच्या रूमची केली पाहणी असता, अभिलाषा हिने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली. 'माझी जगायची इच्छा संपली आहे. मी हे स्वतःच्या मर्जीने करत आहे' असे चिठ्ठीमध्ये लिहिले आहे.

पुणे: पुण्यातील हिंजवडी परिसरामधील एका 26 वर्षीय आयटी अभियंता तरुणीने 'सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे', अशी चिठ्ठी लिहून 13व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 31 मेच्या पहाटेच्या सुमारास घडली आहे. हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीच्या 13 व्या मजल्यावरून उडी घेत अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे या 26 वर्षीय तरुणीने आपलं जीवन संपवलं आहे.
पोलिसांनी घटनेबाबत काय दिली माहिती?
हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये 31 मे रोजी अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे नावाची आयटी अभियंता तरूणीने उडी मारून जीव दिला, तीचं वय 26 वर्षे इतकं होतं. या तरूणीने 13 व्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर आलं आहे. या तरूणीने आत्महत्या करण्यापूर्वी सूसाईड नोट देखील लिहून ठेवली होती. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. सूसाईड नोटमध्ये तीने आपल्या आई वडीलांची माफी मागितली आहे. तिच्या मैत्रिणींची देखील माफी मागितली आहे. आयुष्य जगून झालं आहे असं लिहून तिने आपलं जीवन संपवलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आत्महत्येपूर्वीचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर
अभिलाषाचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. चार वाजून 42 मिनिटांनी ती लिफ्टमध्ये येते. त्यानंतर लिफ्टचं बटन दाबून ती अगदी शांतपणे लिफ्टला टेकून उभी राहिलेली दिसते, तिने स्कार्फ बांधलेला होता. त्यानंतर लिफ्ट तेराव्या मजल्यावर आल्यावर ती लिफ्टमधून बाहेर पडते, हा अभिलाषाचा आत्महत्येपूर्वीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
हिंजवडीतील इंजिनीअर तरुणीचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. #Punenews #Crimenews #Punecrimenews #Punepolice #CCTV pic.twitter.com/eng6fO7Ob3
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) June 5, 2025
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा घटनेच्या दिवशी पहाटे 4.30 सुमारास दुचाकीने सोसायटीच्या आवारात आली. लिफ्टने 13व्या मजल्यावरती गेली पहाटे 4.42 सुमारास तिने आत्महत्या केल्याचं निदर्शनास आले आहे. अभिलाषाच्या शव विच्छेदन अहवालात तिच्या शरीरावरिल महत्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली असून, या घटनेत कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा संशयास्पद काही आढळून आले नसल्याचे म्हटले आहे . प्राथमिक दृष्ट्या तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचं त्यांनी दिसून येत आहे. तिच्या खोलीची झाडाझडती घेतली असता एक तिने लिहिलेले सुसाइट नोट सापडली आहे , त्यावर सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे असं लिहलेली सुसाइड नोट आढळून आली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहेत.
अभिलाषाच्या शव विच्छेदन अहवालात तिच्या शरीरावरील महत्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली असून, या घटनेत कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा संशयास्पद काही संकेत आढळून आले नसल्याचे म्हटले आहे. प्राथमिक दृष्ट्या तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचं त्यांनी म्हटले आहे. तिच्या खोलीची झाडाझडती घेतली असता तिने लिहिलेले सुसाइट नोट सापडली आहे, त्यावर सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे, असं लिहिलेलं आढळून आले आहे. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.
नॅपकीन, मोबाइल पोलिसांनी केले जप्त
अभिलाषा हिच्यासोबत राहत असलेल्या तिच्या मैत्रिणीशी पोलिसांनी संपर्क साधला असता तिने दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा रात्री एक वाजेपर्यंत रूममध्ये होती. त्यानंतर मी सकाळी पाच वाजता उठले असता ती रूममध्ये दिसली नाही. त्यावेळी बाथरूम भिंतीवर रक्ताचे पुसट डाग दिसले. परंतु, त्याबाबत लक्षात आले नाही. त्यानंतर मी पुन्हा सकाळी दहा वाजता उठले असता, अभिलाषा रूममध्ये आली नव्हती. त्यामुळे तिच्याशी संपर्क करत होते. परंतु, तिचा फोन बंद होता त्यामुळे संपर्क झाला नाही.
काही वेळाने पोलिसांकडून मला या घटनेबाबत समजले. त्यानंतर आम्ही पुन्हा रूमची पाहणी केली असता अभिलाषा हिच्या बेडवर नॅपकिन व इनरवर रक्ताचे डाग दिसून आले, असे अभिलाषाच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी तिच्या रूमची केली पाहणी असता, अभिलाषा हिने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली. 'माझी जगायची इच्छा संपली आहे. मी हे स्वतःच्या मर्जीने करत आहे.' असे चिठ्ठीमध्ये लिहिले आहे. रक्ताचे डाग असलेले नॅपकिन, इनर, उशीचे कव्हर व मोबाइल पोलिसांनी जप्त केले. तिने चिठ्ठीत लिहिलेल्या मजकुराप्रमाणे तिने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
