एक्स्प्लोर

75 वर्षीय नानांचा नाद खुळा, शर्यतीत बैलजोडीच्या पुढे घोडीवर बसून धुरळा

Bullock Cart Race: पुण्यातील मावळ तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत बैलगाड्यांपेक्षा 75 वर्षीय मधू नाना पाचपुते यांनी जास्त लक्ष वेधून घेतले. पाचपुते यांनी बैलगाडा शर्यतीचा घाट गाजवलाय.

Bullock Cart Race  : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवल्यानंतर आता राज्यभरात विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहे. नुकतेच पुण्यातील मावळ तालुक्यात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत बैलगाड्यांपेक्षा जास्त लक्ष वेधून घेतले 75 वर्षीय मधू नाना पाचपुते यांनी. पाचपुते यांनी बैलगाडा शर्यतीचा घाट गाजवलाय. अगदी तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह आणि शैली आहे. त्यामुळेच राज्यातील बैलगाडा शौकीन त्यांचे जणू फॅन झाले आहेत. पाचपुते यांनी शर्यतीत बैलगाड्यांपुढं पळवलेली घोडी पाहण्यासाठी परिसरातून शौकीन गर्दी करत असतात. घोडी पळवताना त्यांचा उत्साह पाहण्यासारखाच असतो. 

पाचपुते यांना शर्यतीत बैलजोडीपुढे घोडी पळवण्याचा छंद आहे. डोक्यावर टोपी, कपाळाला भंडारा, गळ्यात उपरणं आणि धोती-कुर्त्याचा पेहराव करून पाचपुते घोडीवर स्वार होतात. वयाच्या पंच्याहत्तरीतही नानांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि शरीराची हालचाल तरुणांना लाजवणारी ठरते. घाटात भिररररचा आवाज आला की बैलगाडा सुसाट धावतो.  

पुण्याच्या खेडमधील चिंचोशी गावातील नानांच्या कुटुंबात तीस वर्षांपूर्वी पारो नावाची घोडी दाखल झाली. गेली आठ वर्षे बैलगाडा शर्यतीवर बंदी होती. परंतु, पाचपुते यांनी पारोचा खूप चांगला सांभाळ केला. पाचपुते यांच्या तीन पिढ्या बैलगाडा शर्यतीचा घाट गाजवत आहेत. त्यामुळेच मधू नानांना घोडी पळविण्याचा छंद जडला. गेल्या पन्नास वर्षांपासून ते घाटातील बैलजोड्यांपुढे ही घोडी पळवतात.  

राज्यात कुठंही बैलगाड्यांचा घाट भरला की नाना आणि त्यांच्या घोडीची शौकिनांकडून आतुरतेने वाट पाहिली जाते. गावातील मंडळी केवळ नानांचा हा नाद पहायला घाटावर पोहचतात. नाना सध्या सोशल मीडियावर देखील तुफान गाजत आहेत.  

महत्वाच्या बातम्या

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Electric Vehicle : धोरण तर जाहीर केलं पण ईव्ही गाड्यांसाठी महाराष्ट्र तयार आहे का? तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचं काय? 
धोरण तर जाहीर केलं पण ईव्ही गाड्यांसाठी महाराष्ट्र तयार आहे का? तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचं काय? 
भारताच्या तिजोरीत मोठी भर, जून महिन्यात नेमकं किती झालं कर संकलन? अर्थव्यवस्थेला चालना 
भारताच्या तिजोरीत मोठी भर, जून महिन्यात नेमकं किती झालं कर संकलन? अर्थव्यवस्थेला चालना 
पंढरपूर वारीदरम्यान मृत्यू झाल्यास वारकऱ्याला 4 लाखांची आर्थिक मदत; शासनाचा मोठा निर्णय
पंढरपूर वारीदरम्यान मृत्यू झाल्यास वारकऱ्याला 4 लाखांची आर्थिक मदत; शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! बीड लैंगिक छळ प्रकरणातील शिक्षकांची पोलीस कोठडी 5 जुलैपर्यंत वाढवली, न्यायालयाचे आदेश
मोठी बातमी! बीड लैंगिक छळ प्रकरणातील शिक्षकांची पोलीस कोठडी वाढवली, न्यायालयाचे आदेश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde : बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ, पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या...?
Raj Thackeray Full PC : राऊतांचा फोन, राज ठाकरेंचा होकार! ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणजे येणार
Uddhav Thackeray Full PC :  मार्क पडले 100 कमळी आमची एक नंबर, विधानभवनात येऊन भाजपला डिवचलं
Shefali Jariwala Death | शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं गूढ कायम, फ्रिजमधील अन्नामुळे बेशुद्धी?
Aaditya Thackeray सरकारच्या सक्तीसमोर महाराष्ट्राची शक्ती जिंकली, 2 भाऊ एकत्र येण्याची भाजपला धास्ती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Electric Vehicle : धोरण तर जाहीर केलं पण ईव्ही गाड्यांसाठी महाराष्ट्र तयार आहे का? तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचं काय? 
धोरण तर जाहीर केलं पण ईव्ही गाड्यांसाठी महाराष्ट्र तयार आहे का? तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचं काय? 
भारताच्या तिजोरीत मोठी भर, जून महिन्यात नेमकं किती झालं कर संकलन? अर्थव्यवस्थेला चालना 
भारताच्या तिजोरीत मोठी भर, जून महिन्यात नेमकं किती झालं कर संकलन? अर्थव्यवस्थेला चालना 
पंढरपूर वारीदरम्यान मृत्यू झाल्यास वारकऱ्याला 4 लाखांची आर्थिक मदत; शासनाचा मोठा निर्णय
पंढरपूर वारीदरम्यान मृत्यू झाल्यास वारकऱ्याला 4 लाखांची आर्थिक मदत; शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! बीड लैंगिक छळ प्रकरणातील शिक्षकांची पोलीस कोठडी 5 जुलैपर्यंत वाढवली, न्यायालयाचे आदेश
मोठी बातमी! बीड लैंगिक छळ प्रकरणातील शिक्षकांची पोलीस कोठडी वाढवली, न्यायालयाचे आदेश
Nashik Crime News : नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, बिहारच्या सात जणांविरोधात गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, बिहारच्या सात जणांविरोधात गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Accident: ट्रिपल सीट जात असताना बाईक घसरून दोन तरुणांचा जागीच मृत्यू, एक जखमी, मुंबईत भीषण अपघात
ट्रिपल सीट जात असताना बाईक घसरून दोन तरुणांचा जागीच मृत्यू, एक जखमी, मुंबईत भीषण अपघात
पावसामुळे नियंत्रण सुटलं, बाईकस्वार आधी बॅरिकेटला धडकून ट्रकला आदळले, दोघांचा जागीच मृत्यू, भंडाऱ्यात नव्या बायपास हायवेवर भीषण अपघात
पावसामुळे नियंत्रण सुटलं, बाईकस्वार आधी बॅरिकेटला धडकून ट्रकला आदळले, दोघांचा जागीच मृत्यू, भंडाऱ्यात भीषण अपघात
Satara News : हिमाचलमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार! महाराष्ट्रातील पर्यटकही अडकल्याची प्राथमिक माहिती
हिमाचलमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार! महाराष्ट्रातील पर्यटकही अडकल्याची प्राथमिक माहिती
Embed widget
OSZAR »