Jagtap Family On Vaishnavi Hagawane Death : हगवणेंच्या दुसऱ्या सूनेचीही हादरवणारी कहाणी, वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण, मयूरीच्या भावाने CCTV दाखवला!

Jagtap Family On Vaishnavi Hagawane Death : हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी जगताप हिला मारहाण झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्या भावाने केला आहे.

Continues below advertisement

Jagtap Family On Vaishnavi Hagawane Death: सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता. या प्रकरणाने सध्या महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली असून हगवणेंच्या दुसऱ्या सूनेचीही हादरवणारी कहाणी समोर आली आहे. वैष्णवीचा नवरा शशांककडून हगवणे यांची मोठी सून मयुरीला हिला मारहाण करण्यात येत होती. याबाबतचा सीसीटीव्ही मयुरीच्या भावाने एबीपी माझाशी बोलताना दाखवला आहे. तर करिष्मा आणि शशांक हगवणे यांनी आपल्या मुलीला सर्वाधिक त्रास दिल्याचा आरोप मयुरी जगताप हिच्या आईने केला आहे. 

Continues below advertisement

करिष्मा आणि शशांक हगवणे यांनी सर्वाधिक त्रास दिला

हगवणे यांची मोठी सून मयुरी जगताप हिच्या आई म्हणाल्या की, हगवणे कुटुंबीयांनी माझ्या मुलीला देखील त्रास दिलेला आहे.  शशांक हगवणे, करिष्मा हगवणे,लता हगवणे यांनी माझ्या मुलीला त्रास दिला. पण, माझ्या मुलीने ज्यावेळेस त्रास होईल त्यावेळेस मला सांगितले. मला त्रास देत आहे, मला मारहाण करताय, असे माझी मुलगी मला सांगायची. आम्ही दोन-तीन वेळेस त्यांच्यासोबत बैठक घेतली. हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मुलीला समजावून सांगितलं. मुलीने थोडे दिवस सहन केले पण सहन करण्याची एक क्षमता असते. क्षमतेच्या पलीकडे गेल्यावर मुलीला सहन झाले नाही. त्यांनी मुलीला मारहाण केली. आम्ही तक्रार करायला गेल्यानंतर पोलिसांनी लगेच तक्रार घेतली नाही. तिचं लग्न झाल्यानंतर सहा महिने ते लोक व्यवस्थित वागले. नंतर करिष्मा हगवणे आणि शशांक हगवणे हे तिला जास्त त्रास द्यायला लागले. तिच्या मिस्टरांचा यात काहीही हात नाही. तिच्या मिस्टरांनी कायम तिला साथ दिली. अजूनही तिला त्यांची साथ आहे. आता ती 14 जानेवारीपासून आमच्याकडे आहे. तिचे मिस्टर आमच्याकडे येऊन जाऊन करतात. कारण तिच्या मिस्टरांचा यात काहीच विरोध नाही, असे त्यांनी म्हटले आहे. करिष्मा आणि शशांक हगवणे यांनी सर्वाधिक त्रास दिला. सासू थोडे दिवस चांगल्या वागल्या. मात्र, नंतर त्यांची देखील वागणूक बदलल्याचेही त्यांनी सांगितले. 

त्यांची सुधारायची मानसिकता नव्हती

तर तुझ्या बहिणीवर अत्याचार होत होते. तसेच वैष्णवीवर देखील अत्याचार होत होते. तुला याबाबत तुला काही कल्पना होती का? असे मयुरीच्या भावाला विचारले असता तो म्हणाला की, वैष्णवीच्या बाबतीत अगोदर कल्पना नव्हती. पण सगळ्यात पहिले माझ्या बहिणी सोबत या गोष्टी चालू झाल्या. आम्ही प्रत्येक वेळेस मयुरीला साथ देखील दिली. प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे जाणे, मीटिंग बसवणे, कुठे काय कोणाचं चुकत असेल तर समजावून सांगणे. या गोष्टी वारंवार होत होत्या. दोन वेळेस आपण त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पण पोलिसांकडे गेल्यावर त्यांच्या इथले गावातले कोणीतरी ओळखीचे लोक येऊन मध्यस्थी करायचे. पण त्यांची सुधारायची मानसिकता नव्हती. 

मयूरीच्या भावाने CCTV दाखवला!

त्यांनी तिसऱ्या वेळेस देखील तेच केले. रात्रीच्या दरम्यान आम्हाला फोन आला की, मला मारहाण केलेली आहे. त्यावेळेस आम्ही पोलीस ठाण्यात गेलो तर आमच्यात आणि त्यांच्यात बाचाबाची देखील झाली. आम्ही तक्रार दाखल केली. शशांक हगवणे हे मोबाईल घेऊन पळून जातानाचे आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्या वेळेस भांडण सुरू होते ते त्यावेळेस बहिणीने लाईव्ह वगैरे केले होते, त्याचे व्हिडीओ देखील आमच्याकडे आहे, असे म्हणत मयुरी यांच्या भावाने मयुरीला शशांक हगवणे याने मारहाण केल्याचा सीसीटीव्हीच दाखवला.  

आणखी वाचा 

Vaishnavi Hagawane Death: ना हगवणे, ना कस्पटे...वैष्णवीचं 9 महिन्यांचं बाळ कोणाकडे होतं?; कुटुंबियांना एक फोन अन् बाळ सुपुर्द

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »