पाकिस्तानातील हिंदू खेळाडूचे दोन्ही पाय कापले, कारण ऐकून बसले धक्का; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

एक काळ होता, जेव्हा मैदानावर तो धाव घेऊ लागला की फलंदाजांच्या मनात धडकी भरायची. पण आज, त्याच माजी वेगवान गोलंदाजाने आपले दोन्ही पाय गमावले आहेत.

Continues below advertisement

Pakistan Cricketer Mohinder Kumar News : एक काळ होता, जेव्हा मैदानावर तो धाव घेऊ लागला की फलंदाजांच्या मनात धडकी भरायची. त्याची वेगवान, अचूक आणि आग ओकणारी गोलंदाजी पाहून स्टेडियममध्ये प्रेक्षकांची हशा उसळायची. पण आज, त्याच माजी वेगवान गोलंदाजाने आपले दोन्ही पाय गमावले आहेत. खरंतर, पाकिस्तानमधील एका क्रिकेटपटूला त्याचे दोन्ही पाय कापावे लागले, ज्याचे कारण ऐकून धक्का बसले. या खेळाडूने पाकिस्तानसाठी लिस्ट ए आणि फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले आहे.

Continues below advertisement

खरंतर, पाकिस्तानचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक मोहिंदर कुमार यांना पायाच्या संसर्गामुळे दोन्ही पाय कापावे लागले. मधुमेही म्हणजेच डायबेटिस असल्यामुळे त्यांना पाय कापावे लागले. हा संसर्ग इतका गंभीर झाला होता की तो त्यांच्या जीवाला धोका बनला होता. या घटनेने क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. 

या खेळाडूच्या गोलंदाजीने 1976 ते 1994 दशकात क्रिकेटविश्व गाजवले होते. त्याचे यॉर्कर्स, स्विंग, आणि खतरनाक बाउंसर अनेक फलंदाजांच्या करिअरमधील दुःस्वप्न ठरले होते. पाकिस्तानच्या या क्रिकेटपटूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली होती. खेळाडू म्हणून त्यांच्या योगदानानंतर, त्यांनी प्रशिक्षक म्हणून तरुण क्रिकेटपटूंनाही प्रेरणा दिली. त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे अनेक खेळाडूंना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत झाली. पण, डायबेटिससारख्या आजाराने त्यांचे आयुष्य कठीण वळणावर आणले.

कोण आहे मोहिंदर कुमार?

मोहिंदर कुमार यांचा जन्म 11 जून 1959 रोजी कराची येथे झाला. पण त्यांनी कधीही पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही, परंतु ते बराच काळ देशांतर्गत क्रिकेट खेळले. त्याने 1976-77 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 1993-94 पर्यंत या फॉरमॅटमध्ये खेळला. ते 1980 आणि 1994 पर्यंत लिस्ट ए मध्ये देखील सक्रिय होते. त्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्यांनी 26.41 च्या सरासरीने एकूण 187 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये 10 वेळा एका डावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा आणि 4 वेळा एका सामन्यात 10 विकेट्स घेण्याचा समावेश आहे.  

घरची परिस्थिती खराब

मोहिंदर कुमार हे पाकिस्तान क्रिकेटमध्ये एक प्रसिद्ध नाव होते, पण आज हा खेळाडू एका छोट्या घरात राहतो. संसर्गामुळे प्रथम त्याचा एक पाय कापण्यात आला आणि नंतर संसर्ग जास्त पसरला, तेव्हा त्याचा दुसरा पायही कापावा लागला. पीएसएल संघ मुल्तान सुल्तानचे मालक अली तहरीन आणि माजी कर्णधार मोईन खान निश्चितच या खेळाडूला मदत करण्यासाठी पुढे आले, पण तरीही मोहिंदरचे पाय वाचवता आले नाहीत. त्यांनी सोहेल खान, मोहम्मद सामी, दानिश कनेरिया, तन्वीर अहमद आणि नौमानउल्लाह यांच्यासह अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »