Pune News : सिंहगड चढताना छातीत तीव्र वेदना; पुण्यातील निवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजकुमार गायकवाड यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Pune News : उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आलेली आहे.

पुणे: सिंहगड किल्ला फिरायला गेलेले असताना निवृत्त सहायक पोलिस आयुक्त राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. गायकवाड हे आतकरवाडीमार्गे सिंहगड किल्ल्यावर सहकाऱ्यांसह फिरायला गेले होते. किल्ला फिरताना त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांनी याबाबत सहकाऱ्यांना माहिती दिली, परंतु काही वेळातच ते बेशुद्ध पडले. त्यांच्यासोबत असलेल्या डॉक्टर मित्राने तातडीने त्यांच्यावरती प्राथमिक उपचार केले, परंतु गायकवाड यांनी प्रतिसाद दिला नाही. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. गायकवाड यांना स्ट्रेचरद्वारे किल्ल्यावरून खाली आणण्यात आलं आणि तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आलेली आहे.
सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेले अन्...
सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेल्यानंतर पुणे पोलीस दलातील निवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजकुमार गायकवाड (वय 62) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. या घटनेने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड हे आतकरवाडीमार्गे सिंहगड किल्ल्यावर सहकाऱ्यांसह फिरायला गेले होते. किल्ला चढत असताना त्यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांनी याबाबत सहकाऱ्यांना माहिती दिली, परंतु काही समजण्याच्या आत ते बेशुद्ध पडले. त्यांच्यासोबत असलेल्या डॉक्टर मित्राने तातडीने प्राथमिक उपचार केले, परंतु गायकवाड यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी समाधान पाटील आणि वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. गायकवाड यांना स्ट्रेचरद्वारे किल्ल्यावरून खाली आणण्यात आले आणि तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ओळखले जात होते
राजकुमार गायकवाड हे मूळ पुण्याचे रहिवासी आहेत, ते कुटुंबासह मार्केट यार्ड परिसरात राहत होते. ते त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ओळखले जात होते. गायकवाड यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावली होती. त्याचबरोबर, बृहन्मुंबई पोलीस दलातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या अकस्मात निधनाने पोलीस दलातील सहकाऱ्यांमध्ये शोक व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.