Pune News: हृदयद्रावक! चिमुकला अंगणात खेळत होता, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; विजेचा धक्का बसून पुण्यातील दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Pune News पुणे : पुणे शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्याच्या वारजे परिसरात विजेचा धक्का बसून एका दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Pune News पुणे : पुणे शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्याच्या वारजे परिसरात विजेचा धक्का बसून एका दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वारजेतील रामनगर भागात संध्याकाळी सुमारे पावणेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. मयंक प्रदीप आडगळे (वय 10 वर्ष) असे या मृत बालकाचे नाव आहे. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आडगळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, मयंक आडगळे हा आपल्या घरासमोर खेळत होता. यावेळी त्याचा अनावधानाने विजेच्या खांबाला स्पर्श झाला. मात्र या विजेच्या खांबाला विद्युत प्रवाहाचा संपर्क आल्याने परिणामी या विजेच्या खांबातही विद्युत प्रवाहाच संपर्क झाला. अशातच, मयंकला त्याच वेळी तीव्र शॉक बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मयंक घराबाहेर मित्रांसोबत खेळत होता. खेळताना तो चुकून घरासमोर असलेल्या लोखंडी विजेच्या खांबाला टेकला आणि त्याच वेळी त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. काही क्षणातच तो खाली कोसळला. कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी तत्काळ त्याला नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करताना मृत घोषित केलंय.
चौथ्या माळ्यावरील स्लॅब थेट तळमजल्यावर पत्त्याप्रमाणे कोसळला, सहा जणांचा मृत्यू
कल्याण पूर्व चिकणी पाडा सुमारे चाळीस वर्ष जुनी असलेल्या सप्तशृंगी या पाच मजली इमारतीच्या चौथ्या माळ्यावरील स्लॅब कोसळल्याची घटना काल (20 मे) दुपारच्या सुमारास घडली. पत्त्याप्रमाणे चौथा माळ्यावरील स्लॅब हा तळमजल्यापर्यत कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या दलाने व केडीएमसीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य हाती घेतले. या दरम्यान अग्निशमन दलाने 12 जणांना बाहेर काढण्यात आले. त्यामधील दिड वर्षाच्या मुलीसह चार महिला आणि एका इसमाचा मृत्यू झाला.
कल्याण पूर्व महाराष्ट्र नगर चिकणी पाडा येथे सप्तशृंगी इमारती आहे. तळ अधिक चार मजल्याचे इमारत सुमारे 40 वर्ष जुनी आहे. या इमारतीमध्ये सुमारे 50 कुटुंब राहत होते. दुपारच्या सुमारास या इमारतीच्या एका बाजूचा चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. पत्त्याप्रमाणे हा स्लॅब तळमजल्यावर कोसळला. या दुर्घटनेत 12 जण इमारतीमध्ये अडकले होते. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन विभाग आणि केडीएमसीचा पथक, पोलीस प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव आणि घेतली बचाव कार्य सुरू केले. चार तासाच्या अथक प्रयत्नांतर या इमारतीमधून 12 जणांना बाहेर काढण्यात आले. हे सगळे गंभीर जखमी असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील दीड वर्षाची मुलगी नमस्वी शेलार, प्रमिला साहू 58, सुनीता साहू 37, सुजाता पाडी 32, सुशीला गुजर 78, व्यंकट चव्हाण 42 यांचा मृत्यू झालाय तर उर्वरित 6 जणांवर कल्याण डोंबिवली मधील विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
