ट्रेंडिंग
Pune Bridge Collapse : इंद्रायणी पूल अपघाताच्या बचावकार्यात पावसाचं आव्हान? मध्यरात्रीपासून पावसाचा ठिपका थांबेना, आज पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन
पुण्याच्या मावळमधील कुंडमळा इथं रविवारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. याचं रेस्क्यू ऑपरेशन रात्री 10 वाजता थांबविण्यात आलं असून ते आज सकाळी 7 वाजता पुन्हा एकदा सुरु करण्याचं नियोजन प्रशासनाचं आहे.
Pune Kundmala Bridge Collapses: पुण्याच्या मावळमधील कुंडमळा इथं रविवारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. याचं रेस्क्यू ऑपरेशन काल (रविवार 15 जून ) रात्री 10 वाजता थांबविण्यात आलं असून ते आज सकाळी 7 वाजता पुन्हा एकदा सुरु करण्याचं नियोजन प्रशासनाचं आहे. पण मध्यरात्रीपासून पावसाची सततधार थांबायचं नाव घेईना, याचा व्यत्यय आजच्या बचावकार्यात (Pune Kundmala Bridge Collapses) होणार आहे. हे आव्हान बचाव पथकं कसं पेलतात हे पाहणं महत्वाचं आहे.
आज पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन
दरम्यान, काल (रविवार 15 जून ) दुपार साडे तीन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजे साडे सहा तास बचावकार्य सुरु होतं. यात 4 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं, तसेच 51 पर्यटक यातून बचावल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलंय. त्यानंतर कोणी सापडलं नाही, अशी तक्रार प्रशासनाकडे आलेली नाही. मात्र तरी ही खबरदारी म्हणून आज पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन राबवले जाणार आहे. सकाळी 7 वाजता हे रेस्क्यू सुरु केलं जाणार आहे, पण पावसाचं आव्हान बचावपथकांसमोर आहे.
इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूलचं वैशिष्ट्य काय?
- 1990 साली पुलाचे काम सुरु झालं
- 1993 साली हे पूल तयार झालं, तेंव्हापासून वापरात
- 2023 साली म्हणजे 30 वर्षानंतर हा पूल जीर्ण झाल्याचं निदर्शनास
- दीड वर्षांपासून हा कमकुवत पूल वापरास बंद
- नव्या पूल उभारणीसाठी 8 कोटींचा निधी
- सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर काढून वर्क ऑर्डर ही दिल्याचा प्रशासनाचा दावा
- प्रत्यक्षात कामाला पावसानंतर सुरुवात होण्याची शक्यता
मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली कुंडमला दुर्घटनेतील जखमींची भेट
कुंडमला येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर जखमींना तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर आता मंत्री गिरीश महाजन यांनी जखमींची रात्री उशिरा विचारपूस केली. या घटनेत प्रत्यक्षदर्शी असलेल्या तरुणांची देखील विचारपूस केली. घटनास्थळी पाहणी करून त्यानंतर त्यांनी जनरल हॉस्पिटलमधील जखमींची विचारपूस केली. यावेळी शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख आणि जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन स्थळीं जाताना देखील पर्यटकांनी आपली स्वतःची काळजी घेऊनच पर्यटन करावे. हुल्लडबाजी किंवा धोकादायक पर्यटन करू नये असे आवाहन देखील मंत्री गिरीश महाजन यांनी पर्यटकांना केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या