ट्रेंडिंग
मोठी बातमी: अंबादास दानवे थेट प्रकाश महाजनांच्या घरी, राणेंच्या धमकीनंतर विचारपूस; सेना-मनसे युतीसाठीही मशागत?
Ambadas Danve Meet Prakash Mahajan: ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांची भेट घेतली आहे.
Ambadas Danve Meet Prakash Mahajan: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज (11 जून) एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांची भेट घेतली आहे. गेल्या दोन दिवासांपासून भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) आणि प्रकाश महाजन यांच्यात वाद रंगला आहे. यादरम्यान राणे पिता-पुत्रांना शिंगावर घेणाऱ्या प्रकाश महाजन यांना अंबादास दानवेंची साथ मिळाली आहे. अंबादास दानवे यांनी प्रकाश महाजनांची भेट घेऊन त्यांची विचारपूर केली. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे नेते एकमेकांची भेट घेत असल्याचे दिसून येत आहे.
अंबादास दानवेंच्या भेटीनंतर प्रकाश महाजन काय म्हणाले?
आमचे जुने संबंध आम्ही पूर्वी एका पक्षात होतो भेटायला आलेत तेही पहिलवान आहेत मी ही पहिलवान आहे .एखाद्या मोठ्या पहिलवानाला पाडल्यावर ते आनंद व्यक्त करायला आले. त्यांची संधी मी हिरावून घेतली एवढंच. त्यांना पाडायचं होतं मी पाडलं. यापूर्वीही आपल्यापेक्षा मोठ्या पैलवानाची कुस्ती खेळली आहे. नारायण राणे साहेबांना बीड काय असते हे दाखवून दिलं. आकाशात चांगले ग्रह तारे एकत्र येत आहेत काय होईल सांगता येत नाही. चांगले नक्षत्र असले की चांगली घटना घडते. धूमकेतू अजून चमकला नाही नक्षत्र चांगले दिसत आहेत.
अंबादास दानवे काय म्हणाले?
मी प्रकाश काका महाजन यांना भेटायला आलो आहे. गेल्या दोन-तीन दिवसात घडलं त्याविषयी मला वाटलं की त्यांना भेटायला हवं। तसे प्रकाश काका समर्थ आहेत .त्यांना आमच्या मदतीची गरज नाही पण ,एक आलो. आम्ही त्यांच्यासोबत राहिलोय फिरलोय त्यासाठी आलो..ते ठरवण्यासाठी उद्धव राज साहेब समर्थ आहेत ते जे मार्गदर्शन करतील तसा आम्ही चालणार दोन्ही नेते यासाठी समर्थ आहेत. नारायण राणे ज्येष्ठ नेते राहिले आहेत मुख्यमंत्री राहिलेत त्यांचा मुलगा वायफळ गप्पा मारतो त्यावर नियंत्रण असायला हवं। कोणाला बाप म्हणतो दुसऱ्या कोणाला बाप कशाला म्हणतो नारायण राणे आपले बाप आहेत. जय श्रीराम सगळ्यांचा आहे या देशाच्या प्रत्येकाचा आहे गदा यावर आहे आम्ही खेड्यापाड्यातले लोक आहेत. भविष्यात एकमेकांच्या मदतीला यावं असं आम्हाला बिलकुल वाटतं, यात काही विषय नाही.
प्रकाश महाजन आणि राणे पिता-पुत्रांमध्ये नेमका वाद काय?
1. 'राज-उद्धव एकत्र येणार असल्यानं झोप उडाली,एकाचे 20 आणि एकाचे 0 आमदार' असे नितेश राणेंचं वक्तव्य
2. नितेश राणेंची वैचारिक उंची उभं राहिल्यावर लवंगेएवढी बसल्यावर विलायचीएवढी असं प्रकाश महाजनांचं वक्तव्य
3. नारायण राणे महाजनांवर संतापले, लायकीत राहा,जास्त बोलाल तर उलट्या करायला लावेन अशी धमकी
4. माझे बरे-वाईट झाले तर नारायण राणे जबाबदार असे महाजनांचे प्रत्युत्तर, कणकवलीत जाऊन आंदोलन आंदोलन करेन...
मनसे-शिवसेना ठाकरेंच्या युतीचा पहिला प्रस्ताव कधी?
महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर करायला सुरुवात झालीय. मात्र अजूनही मनसे आणि ठाकरे यांची चर्चेची गाडी पुढे सरकायला तयार नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतरच प्रत्यक्षात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा पुढे जाणार असल्याची माहिती आहे. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी दोन्हीकडे नेते तयार असल्याची माहिती आहे. मात्र दोन्ही पक्षांनी अजून एकमेकांना अधिकृत प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी युती संदर्भातली पावलं पुढे टाकली जातील.