Gopichand Padalkar: राज्यातील सगळे इतिहासकार शरद पवारांच्या बाजूचे, पवारांच्या जवळच्या संघटना ऐतिहासिक विषय उकरुन काढतात: गोपीचंद पडळकर
gopichand Padalkar in Pune: एमपीएससीमध्ये अनेक पुढारी तयार झाले आहेत. विद्यार्थ्यांनी मला जर त्यांचा विषय दिला तर मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलेन, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

पुणे: किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीची सुरक्षा वाढवली पाहिजे. याठिकाणी आणखी 20 पोलीस सुरक्षेसाठी तैनात केले पाहिजेत. संभाजी ब्रिगेडन टोकाची भूमिका मांडते. 2012 साली असाच काहीसा प्रयत्न झाला होता. वाघ्या कुत्र्याच्या (Waghya Dog) समाधीबाबत राज्य सरकारने ठाम भूमिका घेतली पाहिजे, असे वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Patil) यांनी व्यक्त केले. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले.
उदयनराजे यांच्याबद्दल नितांत आदर आहे, हे खुसपट ब्रिगेडने काढले आहेत. शरद पवारांना फॉर असलेल्या या संघटना विषय बाहेर काढतात. सगळे इतिहासकार पवार साहेबांना फॉर आहेत. शरद पवारांनी (Sharad Pawar) फावल्या वेळेत नवा इतिहास लिहावा. एकदाच नवीन इतिहास लिहा, म्हणजे पुढच्या पिढ्यांना परत इतिहास लिहण्याची गरज नाही, अशी खोचक टिप्पणी गोपीचंद पडळकर यांनी केली. तसेच पडळकर यांनी महात्मा फुले यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावरही प्रतिक्रिया दिली. जात बघून इतिहास काढायचा. नवीन इतिहासकार जागे झाले आहेत. नवीन इतिहासकार लाँच झाले आहेत. हे इतिहासकार 250 रुपयांचे जॅकेट घालून फिरत असतात, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.
यावेळी पडळकर यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबतही भाष्य केले. एमपीएससीमध्ये अनेक पुढारी तयार झाले आहेत. विद्यार्थ्यांनी मला जर त्यांचा विषय दिला तर मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलेन. राज्य सरकारने स्पर्धा परीक्षा क्लासेसबद्दल मुद्दा गांभीर्याने घेतला पाहिजे.
पडळकरांकडून अमित शाहांना पुण्यातील धनगर समाजाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण, पण अजित पवारांबद्दल विचारून सांगतो म्हणाले
अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीच्या निमित्ताने शिवमल्हार क्रांती संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक ३०० या उपक्रमाच्या अंतर्गत धनगरी नाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एकाचवेळी 50 हजार धनगरी ढोल वाजवून केले जाणार आहे. 50 हजार धनगरी ढोल वाजवून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली जाणार नोंद. धनगरी नाद या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहरात करण्यात येणार आहे. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर या कार्यक्रमाचे करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अजित पवार यांना नाही बोलवणार, हा कार्यक्रम राजकीय नाही, कोणाला बोलवावे हे समाजाला विचारून कळवू, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.
आणखी वाचा
गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरणारा नाही तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा: सदाभाऊ खोत