'शिक्के नीट मारलेत का? ते 'लक्ष असूद्या', अजितदादा अन् हर्षवर्धन पाटलांच्या एकमेकांना कोपरखळ्या VIDEO
Ajit Pawar and Harshvardhan Patil : 'शिक्के नीट मारलेत का? ते 'लक्ष असूद्या', अजितदादा अन् हर्षवर्धन पाटलांच्या एकमेकांना कोपरखळ्या

Ajit Pawar and Harshvardhan Patil, Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.18) बारामतीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान केले. यावेळी मतदान केंद्रावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली. या भेटीत अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांच्या संवादातून मिश्किल टोलेबाजी झाल्याचे बघायला मिळाले.
मतदानासाठी एकाच वेळी केंद्रावर पोहोचल्यानंतर अजित पवार म्हणाले, नमस्ते हर्षवर्धन पाटील साहेब... आम्ही संस्थेवर आहोत, मला माहितीच नाही. तर हर्षवर्धन पाटील म्हणाले, शिक्के नीट मारले का? काही चुकलं नाही ना? असा सवाल विचारला. यावेळी दोघांनी मुक्तपणे संवाद केला असून दोघांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळालंय.
पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, बारामती आणि इंदापूरच्या कार्यक्षेत्रात हा कारखाना आहे. या कारखान्याचा मी प्रतिनिधी आहे. मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो. सहकारामध्ये कुठला पक्ष वगैरे काही नसतो. सर्वांनी एकत्रित येऊन इथे पॅनेल केलेला आहे. कारण आपण पाहाताय महाराष्ट्रातील सहकारातील साखर कारखानदारी अडचणीत आलेली आहे. ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत आलेला आहे. साखर कारखान्यामध्ये काम करणारे कामगार अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे सहकारी कारखान्यात कुठलंही राजकारण आणलं नाही पाहिजे. सर्वच नेत्यांनी राजकीय मतभेद विसरुन शेतकरी कामगारांसाठी निवडणूक पाहायला हवी. सर्वांचं सहकार्य असायला हवं.
अजित पवार आणि माझी नेहमीच भेट होते. ते आले मला म्हणाले, आमच्या पॅनेलला मतदान करा. मी त्यांना म्हटलं आमचं तुमचं काय? शेतकऱ्यांचं पॅनेल आहे.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या नरकातील स्वर्ग या पुस्तकावर प्रतिक्रिया देणे हर्षवर्धन पाटील यांनी टाळल्याचं पाहायला मिळालं. मी पहिल्यांदा पुस्तक वाचेन आणि त्यानंतर तुम्हाला प्रतिक्रिया देईल, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. पुस्तक प्रकाशनाचा समारंभ होता, त्यावेळी शरद पवारांना बोलवण्यात आलं होतं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना पाटील म्हणाले, आता सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आदेश दिलेला आहे. एकदा निवडणुकीचा प्रोग्रॅम लावूद्या. त्यावेळी सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीसाठी तयार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
