Nashik Satpir Dargah : सातपीर दर्गा परिसर पाहणीआधीच हुसैन दलवाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; म्हणाले, हिंमत असेल तर...

Nashik Satpir Dargah : नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील सातपीर दर्ग्यावर केलेल्या अतिक्रमण कारवाईची पाहणी करण्याआधीच पोलिसांनी हुसैन दलवाईंना ताब्यात घेतले आहे.

Continues below advertisement

Nashik Satpir Dargah : नाशिकच्या काठे गल्ली (Kathe Galli) परिसरातील अनधिकृत सातपीर दर्ग्याच्या पाडकामावेळी पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली होती. या दर्ग्याच्या परिसराची पाहणी करण्यासाठी आज मंगळवारी (दि. 22) काँग्रेसचे माजी खासदार हुसैन दलवाई (Husain Dalwai) हे नाशिकमध्ये दाखल झाले. दर्ग्यावर केलेल्या अतिक्रमण कारवाईची पाहणी करण्याआधी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, हुसैन दलवाई यांना गंगापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.      

Continues below advertisement

पोलिसांमध्ये हिंमत असेल तर... 

हुसैन दलवाई म्हणाले की, पोलिसांची असे म्हणणे आहे की, तुम्ही गेल्यानंतर इतर लोकही तिथे जातील. मग त्यांना आडवा. माझा जाण्याचा काय प्रश्न आहे? माझं चरित्र सगळ्यांना माहित आहे. मी कुठेही दंगे करणारा माणूस नाही. जे दंगे करतात त्यांना तुम्ही संरक्षण देतात. त्यांचं सगळा ऐकतात. त्यांच्यामुळेच ही गडबड झालेली आहे. इथल्या आमदारांना तुम्ही अटक केली पाहिजे. ज्या पद्धतीने त्या बोलतात सगळ्या दर्ग्यांना त्या थडगं म्हणतात, हे चुकीचे आहे. थडगं आणि दर्गा यात फरक आहे. थडगं काढणार आणि हनुमानाचं मंदिर बांधणार, असं म्हणणाऱ्यांना तुम्ही खरं म्हणजे अटक केली पाहिजे. पोलिसांमध्ये हिंमत असेल तर तुम्ही ते करा मला कशाला अटक करताय, असे त्यांनी म्हटले.  

दर्गा उद्ध्वस्त करण्याचे कारण काय?

हुसैन दलवाई पुढे म्हणाले की, या परिसरात नेमकं काय घडलं होतं तेच पाहण्यासाठी मी जात होतो. पण, मला तेच पाहू दिले नाही. मी तिथे घोषणाबाजी केली नाही. मी काहीही केले नाही. 350 वर्षांची ती दर्गा होती. ती तुम्ही उद्ध्वस्त करण्याचे कारण काय? ते हिंदू आणि मुसलमानांचं ऐक्य आहे. त्या दर्गेचे दोन ट्रस्ट हिंदू आहेत.  तो वाद निर्माण केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik Satpir Dargah: नाशिकमधील अनधिकृत दर्ग्याच्या पाडकामावेळी पोलिसांवर दगडफेक, एमआयएमच्या बड्या नेत्याला अटक

Nashik Satpir dargah violence: नाशिकच्या सातपीर दर्ग्याचं अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतरचे फोटो समोर आले, आता ती जागा कशी दिसते?

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »