वय होण्याआधीच प्रेमात पडली, आई म्हणाली अठरा वर्ष पूर्ण होताच लग्न करतो, तोपर्यंत प्रियकराचा आला नकार अन् अल्पवयीन प्रेयसीनं...

Nashik News : प्रियकराने लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.

Continues below advertisement

Nashik News : प्रियकराने दुसऱ्या प्रेयसीसमोर कानशिलात लगावून मारहाण केल्यासह प्रेमात धोका मिळाल्याने सतरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शरणपूर रोडवरील (Sharanpur Road) बेथेलनगरात घडली. तिचा प्रियकर संशयित वेदांत पाटील (19, रा. सिडको) याला सरकारवाडा पोलिसांनी (Sarkarwada Police) अटक करुन त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. संशयित वेदांत हा सराईत असून त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत. 

Continues below advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी लहानपणापासूनच बेथेलनगरातील मावशीकडे वास्तव्यास होती. दरम्यान, तिची ओळख मागील एक वर्षापासून वेदांत पाटील याच्याशी झाली होती. दोघे नेहमी फिरायला जात होते. त्याबाबत मावशीने विचारणा केली असता दोघेही विवाह करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर, मुलीच्या आईने दोघांनाही वय अठरा पूर्ण होताच विवाह लावून देऊ, असे सांगितले होते व तोपर्यंत एकमेकांना भेटू नका, अशी समज दिली होती. समज दिली असतानाही दोघे भेटत होते. त्यातच मागील तीन दिवसांपासून दोघांमध्ये सतत भांडण सुरू होते. 

मानसिक त्रास असह्य झाल्याने मुलीने उचलले टोकाचे पाऊल

तेव्हा प्रियकराचे दुसऱ्या मुलीशी अफेअर असून त्याने तिच्यासमोर मला मारहाण केल्याचे व विवाह करणार नाही, अशी धमकी दिल्याचे अल्पवयीन मुलीने मावशीस सांगितले होते. त्यामुळे ती तणावात होती. तरीही वेदांतने तिला फिरायला चलण्यास आग्रह केला. तिने नकार दिल्याने तिला मारहाण केली. महिन्याभरापासून सुरू असलेल्या मानसिक त्रास असह्य झाल्याने मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. मुलीच्या मावशीने दिलेल्या फिर्यादीनुसार वेदांतवर गुन्हा नोंद झाला आहे. संशयित वेदांत पाटील (19, रा. सिडको) याला सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

अंबडला प्लंबरच्या घरावर हल्ला 

दरम्यान, नाशिकच्या अंबड परिसरात एका प्लंबरच्या घरावर अज्ञात कारणातून संशयितांनी कोयत्यासह चाल करून जीवघेणा हल्ला केला. तसेच दारांवर व खिडक्यांवर कोयत्याने मारून नुकसान केले. अंबड पोलिसात तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अक्षय ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास संशयित ऋषिकेश साहेबराव नवले व त्याच्या दोन साथीदारांनी अचानक अक्षयच्या घरावर हल्ला चढविला. ऋषिकेशने हातातील कोयता दरवाज्यावर उगारला. खिडक्यांवर कोयत्याने मारून काचा फोडल्या. त्यावेळी अक्षयच्या डोक्यात कोयता उगारला असता त्याने बचाव केला. मात्र हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच, संशयितांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. संशयितांनी जाताना त्यांच्या घरावर दगडफेक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आणखी वाचा 

Ahilyanagar News : 'तू मला आवडली नाही, आपली जोडी शोभत नाही', नवरदेवानं मोडलं लग्न; नवरीनं उचललं टोकाचं पाऊल, अहिल्यानगर हादरलं!

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »