Mumbai Local Accident: मुंबई लोकलमध्ये भीषण दुर्घटना, 4 ठार, एका पोलिसाचाही समावेश; नेमका अपघात कसा घडला?
Mumbai Local Accident : या अपघातामध्ये जखमी झालेल्या सात जणांची प्रकृती स्थिर असून दोघांचे प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Mumbai Local Accident : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकलच्या एका धोकादायक वळणावर आज (9 जून) झालेल्या भीषण अपघातामध्ये चार जणांनी जीव गमावला. दोन लोकल विरुद्ध दिशेनं धावत असताना दरवाजामध्ये लोंबकळत प्रवास करत असलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांमध्ये अडकून जवळपास दहा ते तेरा प्रवाशी प्लॅटफॉर्मवर फेकले गेले. या अपघातामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये एका पोलिसाचा सुद्धा समावेश आहे. विकी बाबासाहेब मुख्यदल (वय 33) असे त्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ज्या ठिकाणी अपघात घडला ते अपघात ठिकाण अत्यंत धोकादायक असून शार्प वळणामुळे यापूर्वी सुद्धा या ठिकाणी अपघात झाले आहेत.
दरम्यान, या अपघातामध्ये जखमी झालेल्या सात जणांची प्रकृती स्थिर असून दोघांचे प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर मेंदूशी निगडित तातडीची शस्त्रक्रिया आवश्यक आहे. दरम्यान, अपघातानंतर ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकूण दहा जणांना दाखल करण्यात आलं होतं यापैकी सात जणांचे प्रकृती स्थिती आहे.
मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 9, 2025
नेमका अपघात कसा घडला?
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार दोन रेल्वेमध्ये झालेला हा अपघात लोकल रेल्वे मार्गावरील आहे. दोन लोकल ट्रेन आजूबाजूने जात असताना ही घटना घडली. एक लोकल कसाराकडून सीएसटीकडे जात होती. दुसरी लोकल सीएसटीकडून कल्याणकडे जात होती. हा अपघात सकाळी साडे नऊ वाजताच्या दरम्यान घडला.लोकल धोकादायक वळणावर पोहोचल्यानंतर दोन्ही लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवाशी खाली कोसळले. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार एक प्रवासी उडत आला आणि तीन प्रवाशांना घेऊन गेला. दोन्ही लोकलमधील प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला. यावेळी पाठीवर असणाऱ्या बॅगांची गुंतागुंत होऊन ही घटना घडल्याची शक्यता आहे. दरम्यान, पुष्पक एक्स्प्रेस त्यावेळी धावत असल्याने त्याच एक्स्प्रेसमधून प्रवाशी पडल्याचा दावा केला जात होता. मात्र, अपघाताचा उलघडा झाल्यानंतर पुष्पक एक्सप्रेसचा या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

