स्वर्गासारख्या देशाला नरक बनवण्याचा प्रयत्न, पवारसाहेब आपल्याला हे सरकार घालवावं लागेल : उद्धव ठाकरे
पवारसाहेब आपल्याला हे सरकार घालवावच लागेल. ज्यांनी आपल्या स्वर्गासारख्या देशाला नरक करण्याचा प्रयत्न चालू केला आहे, त्यांना नरकात टाकण्यासाठी आपल्याला लढावं लागेल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : पवारसाहेब हे सरकार आपल्याला घालवावच लागेल, ते जाणारच आहे. ज्यांनी आपल्या स्वर्गासारख्या देशाला नरक करण्याचा प्रयत्न चालू केला आहे, त्यांना नरकात टाकण्यासाठी आपल्याला लढावं लागेल आणि जिंकावं लागेल असे मत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. ही लढण्याची उर्मी संजय राऊत यांच्या पुस्तकाने दिली असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहलेल्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार ज्येष्ठ लेखक/कवी जावेद अख्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन झालं. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
एकदा तरी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या
सगळं माझ्या हातामध्ये पाहिजे असे सगळं चालू आहे. वन नेशन वन इलेक्शन फार गोंडस आहे. पण त्या निवडणुकीमध्ये पारदर्शकता कुठे आहे. आपल्या सरन्यायाधिशांच्या मातोश्रीने सांगितले की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. संशय दूर करण्यासाठी एकदा तरी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असे उद्धव ठाकरे म्हणाले. पण ते होणार नाही. वन नेशन वन इलेक्शन म्हणल्यावर सगळ्यांना एका पातळीत उभे करा. वन नेशन म्हणल्यावर देशाचा पंतप्रधान असतो. ते एका पक्षाचे प्रचारक होऊ शकत नाहीत. त्यांनी प्रचारक होता कामा नये. प्रचारक व्हायचं असेल तर स्वत:च्या पक्षासह इतर पक्षांचा आणि अपक्ष उमेदवारांचाही प्रचार करणे गरजेचे आहे. तर म्हणेन खरी लोकशाही आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान उडतायेत म्हणून एअर प्लेस ब्लॉक करुन ठेवलेत. तुमचे विमान उडवायचे नाहीत. रस्ते ब्लॉक करु ठेवलेत कारण पंतप्रधान येणार आहेत. आमच्या सभा चुकल्या तरी चालतय, पण त्यांच्या सभा जाल्या पाहिजेत असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अमित शाह तुम्ही आम्हाला कशासाठी एवढा दुश्मन समजताय? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. आम्ही विरोधी विरोधी म्हणजे कोणाचे विरोधी. आमचे आणि तुमची मते पटत नाहीत. आमचं हिंदुत्व हेदेशासाठी आहे. हे म्हटल्यानंतर तुम्ही आम्हाला दुश्मनाच्या पिंजऱ्यात उभे करताय. पाकिस्तानपेक्षा आधी आम्हाला खतम करा असे उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहात असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
उपकार मोजायचे नसतात, ते करायचे असतात, अमित शाह यांना बाळासाहेबांनी मदत केली का? नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
