एक्स्प्लोर

मोठी बातमी: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 10,000 पानी दोषारोपपत्र दाखल, पेडलर पुजारी, राजकीय कनेक्शन समोर येणार?

Tuljapur Drug Case:दोषआरोपपत्रात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यात आरोपीचे जबाब, सीडीआरची माहिती तसेच मुंबई, सोलापूर, पुणे येथील तस्करी प्रकरणात संबंध असल्याची दोषारोपपत्रात माहिती आहे.

Dharashiv: तुळजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग तस्करीची मोठी चर्चा आहे .15 फेब्रुवारी 2025 ला तुळजापूर तालुक्यात 2.5 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून अनेक उलगडे होत आहेत. लाखो भाविकांच्या तुळजापुरात ड्रग तस्करीमध्ये पुजारीच पेडलर असल्याचं समोर आलं होतं.  दरम्यान, आता तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात दोषआरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तब्बल 10 हजार पानांचे दोषआरोपपत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाले आहे.  तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 35 आरोपी असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. (Tuljapur Drug Case Chargesheet)

10 हजार पानी दोषारोपपत्र दाखल

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 35 आरोपी असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. लाखो भाविकांच्या तुळजापुरात ड्रग तस्करी मध्ये पुजारीच पेडलर असल्याचं समोर आलो होतं. त्यानंतर अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात राजकीय कनेक्शन समोर आल्यानंतरआतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली असून 21 आरोपी फरार आहेत.ड्रग्ज तस्करीत कोणाचे रोल काय दोषआरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. बँक ट्रांजेक्शन, आरोपींचा एकमेकांशी संपर्क कसा झाला दोषआरोपपत्रात नमूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोषारोपपत्रात आरोपीची क्रमवारी निश्चित नाही, प्रकरणात कोणाचा रोल काय हे ठरवण्यात आल्याची माहिती आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी संगीता गोळे आणि इतर आरोपींचा संपर्क कसा झाला, आरोपींची साखळी कशी तयार झाली याबाबत दोषआरोपपत्रात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यात आरोपीचे जबाब, सीडीआरची माहिती तसेच मुंबई, सोलापूर, पुणे येथील तस्करी प्रकरणात संबंध असल्याची दोषारोपपत्रात माहिती आहे.

तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचा घटनाक्रम:

  • 15 फेब्रुवारी 2025: तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी ड्रग्सचा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी 2.5 लाख रुपये किमतीचे 59 पुड्या ड्रग्स जप्त केले आणि काही आरोपींना अटक केली.
  • फेब्रुवारी 2025 अखेर: तपासादरम्यान, ड्रग्स विक्रीचे कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी मुंबईतून संगीता गोळे या महिलेला अटक केली, जी या ड्रग्स तस्करीतील मुख्य सूत्रधार असल्याचे मानले जाते.
  • मार्च 2025: पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक केली, ज्यात स्वराज उर्फ पिनू तेलंग, वैभव गोळे आणि संतोष खोत यांचा समावेश आहे. तपासात असेही समोर आले की आरोपी संगीता गोळेच्या बँक खात्यावरून सुमारे 5 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत आणि तिच्याकडून काही प्रमाणात सोने देखील जप्त करण्यात आले.
  • मार्च 2025: पोलिसांनी फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू ठेवला आणि त्यापैकी काही जणांना अटक करण्यात यश आले. या दरम्यान, तपासाची व्याप्ती वाढत गेली आणि आणखी 10 आरोपींची नावे समोर आली, ज्यामुळे फरार आरोपींची संख्या 21 वर पोहोचली.
  • मार्च 2025: तपासात राजकीय कार्यकर्त्यांचा सहभाग आणि माजी नगराध्यक्षांच्या गाडीचा वापर झाल्याचे समोर आले, ज्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले.
  • एप्रिल 2025: या प्रकरणातील सर्वात धक्कादायक माहिती समोर आली, ज्यात तुळजाभवानी मंदिरातील तब्बल 13 पुजाऱ्यांचा ड्रग्स तस्करीमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले. 

  • एप्रिल 15: चार्जशीट दाखल 

हेही वाचा:

Beed Crime : बीड पुन्हा हादरलं! आधी युवकाला भोसकून संपवलं, नंतर कोयत्यासह आरोपी पोलीस ठाण्यात, महिन्याभरातील तिसरी धक्कादायक घटना

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : इंग्लंडमध्ये एमएस धोनी-विराट कोहलीही फेल, 'या' रेकॉर्ड्सने वाढवली चिंता, शुभमन गिल इतिहास रचणार?
इंग्लंडमध्ये एमएस धोनी-विराट कोहलीही फेल, 'या' रेकॉर्ड्सने वाढवली चिंता, शुभमन गिल इतिहास रचणार?
Beed Crime : अपहरणाचा कट उधळला, हिंगोलीतील व्यक्तीची बीडमध्ये पोलिसांकडून सुटका; महिलेसह दोघांना बेड्या, नेमकं काय घडलं?
अपहरणाचा कट उधळला, हिंगोलीतील व्यक्तीची बीडमध्ये पोलिसांकडून सुटका; महिलेसह दोघांना बेड्या, नेमकं काय घडलं?
Donald Trump :  तर परिणाम भोगावे लागतील, एलन मस्क यांच्यासोबत मनोमिलनाला नकार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
एलन मस्क यांच्यासोबतचे संबंध सुधारायचे आहेत का? डोनाल्ड ट्रम्प यांचं एका शब्दात उत्तर अन् नवा ट्विस्ट
लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा तीव्र संताप, फोनवरुन महिलेला शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा तीव्र संताप, फोनवरुन महिलेला शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shambhuraj Desai On Sanjay Raut :संजय राऊत बोललेलं कधीच खरं होत नाही, शंभूराज देसाईंची टीकाRadhakrishna  Vikhepatil :  मॅच फिक्सींगबाबत Rahul Gandhi यांच्या टीकेला विखे पाटलांचं प्रत्युत्तरSunil Tatkare on Amol Mitkari : NCP एकत्र येण्याचं वक्तव्य, सुनील तटकरे मिटकरींवर संतापलेEknath Shinde On Sanjay Raut : राऊतांच्या वक्तव्यावर  शिंदे म्हणाले,माझं काम करून मी मोकळा झालो

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : इंग्लंडमध्ये एमएस धोनी-विराट कोहलीही फेल, 'या' रेकॉर्ड्सने वाढवली चिंता, शुभमन गिल इतिहास रचणार?
इंग्लंडमध्ये एमएस धोनी-विराट कोहलीही फेल, 'या' रेकॉर्ड्सने वाढवली चिंता, शुभमन गिल इतिहास रचणार?
Beed Crime : अपहरणाचा कट उधळला, हिंगोलीतील व्यक्तीची बीडमध्ये पोलिसांकडून सुटका; महिलेसह दोघांना बेड्या, नेमकं काय घडलं?
अपहरणाचा कट उधळला, हिंगोलीतील व्यक्तीची बीडमध्ये पोलिसांकडून सुटका; महिलेसह दोघांना बेड्या, नेमकं काय घडलं?
Donald Trump :  तर परिणाम भोगावे लागतील, एलन मस्क यांच्यासोबत मनोमिलनाला नकार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
एलन मस्क यांच्यासोबतचे संबंध सुधारायचे आहेत का? डोनाल्ड ट्रम्प यांचं एका शब्दात उत्तर अन् नवा ट्विस्ट
लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा तीव्र संताप, फोनवरुन महिलेला शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा तीव्र संताप, फोनवरुन महिलेला शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या
गोदावरीत 6 मुले बुडाली, नदीबाहेर कुटुंबीयांचा आक्रोश; पोलिसांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम
गोदावरीत 6 मुले बुडाली, नदीबाहेर कुटुंबीयांचा आक्रोश; पोलिसांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट, फरार आरोपी झीशान अख्तर कॅनडा पोलिसांच्या ताब्यात, मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट, फरार आरोपी झीशान अख्तर कॅनडा पोलिसांच्या ताब्यात
Multibagger Stock : 5 वर्षात स्टॉकमध्ये 15600 टक्क्यांची तेजी, शेअर बनला रॉकेट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
5 वर्षात स्टॉकमध्ये 15600 टक्क्यांची तेजी, शेअर बनला रॉकेट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
Embed widget
OSZAR »