ट्रेंडिंग
दहशतवाद्यांशी लढताना अहिल्यानगरच्या भूमिपुत्राला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण, शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक गेल्यानं गावात हळहळ
अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावाचे शूर भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर (Sandeep Gaiker) हे दहशतवाद्यांशी (terrorists) लढताना देशासाठी शहीद झाले आहेत.
अहिल्यानगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावाचे शूर भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर (Sandeep Gaiker) हे दहशतवाद्यांशी (terrorists) लढताना देशासाठी शहीद झाले आहेत. भारतीय सैन्याच्या युनिट -15 मराठा लाईट इन्फंट्री सध्या17 राष्ट्रीय रायफल जम्मू काश्मीरमध्ये ते सेवा बजावत होते. सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांशी लढताना संदीप गायकर हे शहिद झाले आहेत. संदीप गायकर हे अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते.
अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावाचे शूर भूमिपुत्र संदीप गायकर यांनी आपले कर्तव्य बजावत असताना प्राणाची आहुती दिली आहे. त्यांच्या बलिदानाने संपूर्ण ब्राम्हणवाडा गाव, अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण संपूर्ण ब्राम्हणवाडा गाव तसेच अकोले तालुका आणि संपूर्ण देशाला सदैव अभिमानाने राहील.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला 1 महिना पूर्ण
जम्मू आणि काश्मीरच्या इतिहासातील निष्पाप पर्यटकांवरील सर्वात क्रूर दहशतवादी हल्ला 22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये झाला. 22 एप्रिल 2025रोजी, चार दहशतवादी जंगलातून पहलगामच्या बैसरन खोऱ्यात आले. पर्यटकांचा धर्म विचारत त्यांनी 15 मिनिटे अंदाधुंद गोळीबार केला. त्यांनी एकूण 26 जणांना ठार मारले आणि पुन्हा जंगलात गायब झाले. या घटनेत महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश होता. या घटनेला आता एक महिना झाला आहे, सुरक्षा दल सतत कारवाई करत आहेत, परंतु त्या चार क्रूर दहशतवाद्यांना अद्याप पकडता आलेल नाही. पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर मोहीम पार पडली, अजून राष्ट्रीय तपास यंत्रणेला त्या दहशतवाद्यांची माहिती मिळालेली नाही. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, 23 एप्रिल रोजी, राष्ट्रीय तपास संस्थेची म्हणजेच एनआयएची टीम घटनास्थळी पोहोचली. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर, एनआयएने 27 एप्रिलपासून अधिकृतपणे या प्रकरणाचा तपास हाती घेतला. एनआयए प्रमुख सदानंद दाते या प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहेत. एजन्सीचे आयजी, डीआयजी आणि एसपी दर्जाचे तीन अधिकारी तपासात गुंतले आहेत. एनआयएची एक टीम अजूनही पहलगाम आणि आसपासच्या भागात सतत तपास करत आहे. आतापर्यंत 3 हजारांहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. यापैकी अनेक लोकांना दररोज पहलगाम पोलिस ठाण्यात हजर राहण्यास बोलावले जात आहे.
दरम्यान, आतापर्यतच्या चौकशीनुसारस फरार चार दहशतवादी फक्त दोन किंवा तीन स्थानिकांच्या संपर्कात असून तेच त्यांना आवश्यक वस्तू पोहोचवत आहेत. यामुळे दहशतवाद्यांना शोधणे कठीण होत आहे. दहशतवादी जंगलात, गुहेत किंवा डोंगराळ भागात बांधलेल्या लपण्याच्या ठिकाणी लपून बसले असण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या: