एक्स्प्लोर

दहशतवाद्यांशी लढताना अहिल्यानगरच्या भूमिपुत्राला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण, शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक गेल्यानं गावात हळहळ

अहिल्यानगर (Ahilyanagar)  जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावाचे शूर भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर (Sandeep Gaiker) हे दहशतवाद्यांशी (terrorists) लढताना देशासाठी शहीद झाले आहेत.

अहिल्यानगर : अहिल्यानगर (Ahilyanagar)  जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावाचे शूर भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर (Sandeep Gaiker) हे दहशतवाद्यांशी (terrorists) लढताना देशासाठी शहीद झाले आहेत. भारतीय सैन्याच्या युनिट -15 मराठा लाईट इन्फंट्री सध्या17 राष्ट्रीय रायफल जम्मू काश्मीरमध्ये ते सेवा बजावत होते. सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांशी लढताना संदीप गायकर हे शहिद झाले आहेत. संदीप गायकर हे अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते.

अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावाचे शूर भूमिपुत्र संदीप गायकर यांनी आपले कर्तव्य बजावत असताना प्राणाची आहुती दिली आहे. त्यांच्या बलिदानाने संपूर्ण ब्राम्हणवाडा गाव, अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण संपूर्ण ब्राम्हणवाडा गाव तसेच अकोले तालुका आणि संपूर्ण देशाला सदैव अभिमानाने राहील.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला 1 महिना पूर्ण

जम्मू आणि काश्मीरच्या इतिहासातील निष्पाप पर्यटकांवरील सर्वात क्रूर दहशतवादी हल्ला 22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये झाला. 22 एप्रिल 2025रोजी, चार दहशतवादी जंगलातून पहलगामच्या बैसरन खोऱ्यात आले. पर्यटकांचा धर्म विचारत त्यांनी 15 मिनिटे अंदाधुंद गोळीबार केला. त्यांनी एकूण 26 जणांना ठार मारले आणि पुन्हा जंगलात गायब झाले. या घटनेत महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश होता. या घटनेला आता एक महिना झाला आहे, सुरक्षा दल सतत कारवाई करत आहेत, परंतु त्या चार क्रूर दहशतवाद्यांना अद्याप पकडता आलेल नाही. पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर मोहीम पार पडली, अजून राष्ट्रीय तपास यंत्रणेला त्या दहशतवाद्यांची माहिती मिळालेली नाही. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, 23 एप्रिल रोजी, राष्ट्रीय तपास संस्थेची म्हणजेच एनआयएची टीम घटनास्थळी पोहोचली. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर, एनआयएने 27 एप्रिलपासून अधिकृतपणे या प्रकरणाचा तपास हाती घेतला.  एनआयए प्रमुख सदानंद दाते या प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहेत. एजन्सीचे आयजी, डीआयजी आणि एसपी दर्जाचे तीन अधिकारी तपासात गुंतले आहेत. एनआयएची एक टीम अजूनही पहलगाम आणि आसपासच्या भागात सतत तपास करत आहे. आतापर्यंत 3 हजारांहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. यापैकी अनेक लोकांना दररोज पहलगाम पोलिस ठाण्यात हजर राहण्यास बोलावले जात आहे.

दरम्यान, आतापर्यतच्या चौकशीनुसारस फरार चार दहशतवादी फक्त दोन किंवा तीन स्थानिकांच्या संपर्कात असून तेच त्यांना आवश्यक वस्तू पोहोचवत आहेत. यामुळे दहशतवाद्यांना शोधणे कठीण होत आहे. दहशतवादी जंगलात, गुहेत किंवा डोंगराळ भागात बांधलेल्या लपण्याच्या ठिकाणी लपून बसले असण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

पहलगाम हल्ल्याचा महिना, तब्बल 3 हजार जणांची चौकशी, 113 जणांच्या मुसक्या आवळल्या, 20-20 लाखांचे इनाम, तरी चार दहशतवादी सापडेनात; 'एनआयए'चा हात अजूनही रिकामा

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोकणात पुन्हा ठाकरेंना धक्का? विनायक राऊतांचे कट्टर समर्थक ठोकणार रामराम, लवकर शिंदे गटात प्रवेश
कोकणात पुन्हा ठाकरेंना धक्का? विनायक राऊतांचे कट्टर समर्थक ठोकणार रामराम, लवकर शिंदे गटात प्रवेश
Preity Zinta : पंजाबच्या पराभवानंतर सहमालकीण प्रीती झिंटा का भडकली? पहाटे पावणे तीन वाजता कोणावर राग काढला? म्हणाली, ती अशी चूक नव्हती...
पंजाबच्या पराभवानंतर सहमालकीण प्रीती झिंटा का भडकली? पहाटे पावणे तीन वाजता कोणावर राग काढला? म्हणाली, ती अशी चूक नव्हती...
Delhi Weather Update : मुसळधार पाऊस आणि वादळाने देशाची राजधानी अक्षरश: तुंबली; 100 हून अधिक विमानांना फटका; सब इन्स्पेक्टरचा छत कोसळून मृत्यू
मुसळधार पाऊस आणि वादळाने देशाची राजधानी अक्षरश: तुंबली; 100 हून अधिक विमानांना फटका; सब इन्स्पेक्टरचा छत कोसळून मृत्यू
Sujay Vikhe on Satyajeet Tambe: मामा, भाचे, पुतणे कोणीही आलं तरी...; सत्यजीत तांबेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सुजय विखेंचं मोठं वक्तव्य
मामा, भाचे, पुतणे कोणीही आलं तरी...; सत्यजीत तांबेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सुजय विखेंचं मोठं वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines 01 PM Top Headlines 25 May 2025 एबीपी माझा दुपारी 01 च्या हेडलाईन्सAsaduddin owaisi : दशतवाद्यांनी कुराणचे चुकीचे वर्णन केले, इस्लाम दहशतवादाविरोधात आहे- असदुद्दीन ओवैसी100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरABP Majha Headlines 12 PM Top Headlines 25 May 2025 एबीपी माझा दुपारी 12 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकणात पुन्हा ठाकरेंना धक्का? विनायक राऊतांचे कट्टर समर्थक ठोकणार रामराम, लवकर शिंदे गटात प्रवेश
कोकणात पुन्हा ठाकरेंना धक्का? विनायक राऊतांचे कट्टर समर्थक ठोकणार रामराम, लवकर शिंदे गटात प्रवेश
Preity Zinta : पंजाबच्या पराभवानंतर सहमालकीण प्रीती झिंटा का भडकली? पहाटे पावणे तीन वाजता कोणावर राग काढला? म्हणाली, ती अशी चूक नव्हती...
पंजाबच्या पराभवानंतर सहमालकीण प्रीती झिंटा का भडकली? पहाटे पावणे तीन वाजता कोणावर राग काढला? म्हणाली, ती अशी चूक नव्हती...
Delhi Weather Update : मुसळधार पाऊस आणि वादळाने देशाची राजधानी अक्षरश: तुंबली; 100 हून अधिक विमानांना फटका; सब इन्स्पेक्टरचा छत कोसळून मृत्यू
मुसळधार पाऊस आणि वादळाने देशाची राजधानी अक्षरश: तुंबली; 100 हून अधिक विमानांना फटका; सब इन्स्पेक्टरचा छत कोसळून मृत्यू
Sujay Vikhe on Satyajeet Tambe: मामा, भाचे, पुतणे कोणीही आलं तरी...; सत्यजीत तांबेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सुजय विखेंचं मोठं वक्तव्य
मामा, भाचे, पुतणे कोणीही आलं तरी...; सत्यजीत तांबेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सुजय विखेंचं मोठं वक्तव्य
Virat Kohli In Ram Mandir : विराट कोहली अनुष्कासोबत प्रथमच रामलल्लाच्या दर्शनाला; लखनऊहून अचानक कारने अयोध्येला पोहोचला
Video : विराट कोहली अनुष्कासोबत प्रथमच रामलल्लाच्या दर्शनाला; लखनऊहून अचानक कारने अयोध्येला पोहोचला
Nashik Crime: सासरच्या जाचाला कंटाळून 'भक्ती'नं संपवलं जीवन, पती अन् सासऱ्याला नाशिक पोलिसांनी गुजरातमधून मुसक्या आवळून खेचत आणलं
सासरच्या जाचाला कंटाळून 'भक्ती'नं संपवलं जीवन, पती अन् सासऱ्याला नाशिक पोलिसांनी गुजरातमधून मुसक्या आवळून खेचत आणलं
Asaduddin Owaisi on Pakistan : तर आता प्रत्युत्तर अपेक्षेपेक्षा जास्त असेल, आम्ही अनेक निष्पाप जीव गमावले आहेत; ओवैसींकडून पाकिस्तानला अपयशी राष्ट्र म्हणत धुलाई
Video : तर आता प्रत्युत्तर अपेक्षेपेक्षा जास्त असेल, आम्ही अनेक निष्पाप जीव गमावले आहेत; ओवैसींकडून पाकिस्तानला अपयशी राष्ट्र म्हणत धुलाई
Pakistan Defence Budget: पाकिस्तानची टरकली! IMF कडून कर्ज मिळाल्यानंतर संरक्षण बजेट वाढवलं; म्हणाला, आपला शेजारी खूप खतरनाक!
पाकिस्तानची टरकली! IMF कडून कर्ज मिळाल्यानंतर संरक्षण बजेट वाढवलं; म्हणाला, आपला शेजारी खूप खतरनाक!
Embed widget
OSZAR »