पुणे रेल्वे स्थानकाचे नामांतरण करण्याचा प्रयत्न, परिसरात लागले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानकचे बॅनर, ब्राम्हण महासंघ आक्रमक

आनंद दवे यांच्या नेतृत्वाखालील ब्राम्हण महासंघाने पुणे रेल्वे स्थानकाचे नामांतरण करण्याचा प्रयत्न केलाय. ब्राम्हण महासंघाने पुणे रेल्वे स्टेशन परिसरात थोरले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानक असे फलक लावलेत.

Continues below advertisement

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या (Pune Railway Station) नावावरुन वाद निर्माण झाला आहे. पुणे रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी भाजपच्या नेत्या व खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली होती. कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बाजीराव पेशवे यांच्या नावाने बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता आनंद दवे यांच्या नेतृत्वाखालील ब्राम्हण महासंघाने पुणे रेल्वे स्थानकाचे नामांतरण करण्याचा प्रयत्न केला आहे. ब्राम्हण महासंघाने पुणे रेल्वे स्टेशन आणि परिसरात थोरले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानक असे नाव असलेले फलक लावलेत.

Continues below advertisement

ब्राह्मण महासंघाने पुणे रेल्वे स्टेशन परिसरात थोरले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानक असे बॅनर लावले आहेत. पेशवा नावाला विरोध का? याचं स्पष्टीकरण देण्याची मागणी देखील या फलकांच्या माध्यमातून करण्यात आलीय आहे. खासदार मेधा कुलकर्णींच्या विरोधातील बॅनरवर सर्व पक्षीय नेते गप्प का? अशी विचारणा देखील आनंद दवे यांच्याकडून करण्यात आली आहे. श्रीमंत बाजीराव पेशवा नावासाठी पाठपुरावा करण्याचा आणि त्यासाठी सह्यांची मोहीम राबवण्याची घोषणा ब्राम्हण महासंघकडून करण्यात आली आहे.

पुणे स्टेशनच्या नावावरून राजकीय वाद

पुण्यातील पुणे स्टेशनच्या नावावरून राजकीय वाद पाहायला मिळाला. पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव यांच्या नावाने दिले पाहिजे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केल्यावर अनेकांनी यात उडी घेतली आहे. पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केली होती. तर, पुणे शहरात 'पोस्टर वॉर' सुरू झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळाले. खासदार मेधा कुलकर्णी यांच्या या मागणीला उत्तर म्हणून शहरात ठिकठिकाणी खोचक बॅनर झळकले होते. या बॅनरमध्ये 'कोथरूडच्या बाई, नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव 'मस्तानी पेठ' करा!' असा मजकूर होता. हे बॅनर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे लावण्यात आले होते. 

कोण आहेत थोरले बाजीराव?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक करण्याचे काम थोरले बाजीराव पेशवे त्यांनी केले आहे. शनिवार वाडा देखील त्याचेच प्रतीक आहे. हिंदवी साम्राज्याचा विस्तार, मराठा साम्राज्याचा विस्तार जसा छत्रपतींच्या काळात झाला तसाच थोरले बाजीराव पेशवे यांनी देखील केला आहे. या कामात बाजीराव पेशवे यांचे देखील योगदान मोठे आहे. थोरले बाजीराव पेशवे 42 लढाया लढले, एकही हरले नाही. एनडीए सारख्या संस्थेत त्यांच्या युद्ध कलेचे धडे गिरवले जातात. त्यांच्या युद्ध कौशल्याचे धडे सैन्यालाही दिले जातात. छत्रपती शिवरायांचा वारसा त्यांनी चालवला, अटकेपार झेंडा ज्यांनी रोवला अशा थोरल्या बाजीराव पेशवे यांचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला देण्यात यावे अशी मागणी केल्याचे मेधा कुलकर्णी यांनी सांगितल.

पुणे शहराला पेशव्यांचा इतिहास

पुणे शहराला छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांचा मोठा इतिहास आहे. पुण्यातील शनिवार वाडा आजही पेशवे घराण्याच्या इतिहासाची साक्ष देतो. त्यामुळेच, पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगत पुणे जंक्शनचे नामांतर करण्याची मागणी खासदार यांनी केली आहे. श्रीमंत थोरले बाजीराव यांचे नाव देण्याची ही मागणी आहे. 

महत्वाच्या बातम्या:

पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीरावांचे नाव द्या; भाजप खासदार मेधा कुलकर्णींची मागणी

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »