एक्स्प्लोर

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वपक्षीयांवर कारवाई करणार का? की 'आपलाच 'म्हणून डोळेझाक करणार?  रोहिणी खडसेंचा चाकणकरांना सवाल

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यावरुन शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे.

जळगाव : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी पाचच्या सुमारास घडली आहे. बावधन पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजेंद्र हगवणे यांच्यासह मुलगा शशांक हागवणे आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मुळशीतील भुकूम येथे घडली आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर टीका केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांना वेळ मिळाला तर या प्रकरणाचा तपास करून स्वपक्षीयांवर कारवाई करणार का ? असा सवाल खडसेंनी केला आहे. 

हे अतिशय गंभीर व धक्कादायक आहे

पुण्यातील बावधन येथे वैष्णवी हागवणे या महिलेने आत्महत्या केली आहे. वैष्णवी या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हागवणे यांची सून होत्या. 
वैष्णवी यांच्या पतीने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला होता, तसेच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला हुंड्यासाठी त्रास दिला जात होता, असा आरोप वैष्णवी यांच्या वडिलांनी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूनंतर वैष्णवी यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा आढळून आल्या. महिला आयोगाच्या अध्यक्षांना वेळ मिळाला तर या प्रकरणाचा तपास करून स्वपक्षीयांवर कारवाई करणार का ? की 'आपलाच' म्हणून या गंभीर प्रकरणाकडे ही डोळेझाक करणार ? 

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सूनेच्या आत्महत्या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना या प्रकरणात अटक केली आहे. तर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा फरार आहे. वैष्णवी हवगणे यांनी 16 मे रोजी आत्महत्या केली आहे. जमीन खरेदीसाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वैष्णवी हगवणे याचे पती, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना 21 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत या कलमांतर्गत गुन्हा दाखल 

वैष्णवी हगवणे यांचा पती शशांक, सासू लता, नणंद करिष्मा अशी पोलीस कोठडीत रवानगी केलेल्यांची नावे आहेत. सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे पसार आहेत. राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य आहे. वैष्णवी हगवणेचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैष्णवी हिचा पती, सासू-सासरे नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवीला क्रूर वागणूक दिली. तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरले.  तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळून आले. या प्रकरणात सध्या हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्हिसेरा राखून ठेवला असून तपासात काही निष्पन्न झाल्यास त्यानुसार कलमवाढ करण्यात येईल अशी माहिती बावधन पोलिसांनी दिली.

महत्वाच्या बातम्या:

Rajendra Hagawane : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, अजितदादांचा पदाधिकारी राजेंद्र हगवणे फरार, पत्नी, मुलगा आणि मुलीला अटक

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या जिंदाल कंपनीत सलग तिसऱ्या आग धुमसतेय;  प्रचंड धुराचे काळे लाेट;  30 -40 अग्नीशमन बंब दाखल नेमकी परिस्थिती काय?
नाशिकच्या जिंदाल कंपनीत सलग तिसऱ्या आग धुमसतेय; प्रचंड धुराचे काळे लाेट; 30 -40 अग्नीशमन बंब दाखल नेमकी परिस्थिती काय?
Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचा पोलिस कोठडीतील मुक्काम चार दिवसांनी वाढला; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने कोर्टातून बाहेर काढलं
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचा पोलिस कोठडीतील मुक्काम चार दिवसांनी वाढला; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने कोर्टातून बाहेर काढलं
Anil Gote on Arjun Khotkar : मी खोटा आरोप करत असेल तर सरकार तुमचंय, मला अटक करा; अनिल गोटेंचं अर्जुन खोतकरांना ओपन चॅलेंज
मी खोटा आरोप करत असेल तर सरकार तुमचंय, मला अटक करा; अनिल गोटेंचं अर्जुन खोतकरांना ओपन चॅलेंज
मेकअप करून झोपायचं, दिवसातून तीनदा अंघोळ अन् लग्न करून 15 दिवसात फरार व्हायची; तब्बल 25 लग्न करणारी 'दरोडेखोर दुल्हन' अखेर सापडली!
मेकअप करून झोपायचं, दिवसातून तीनदा अंघोळ अन् लग्न करून 15 दिवसात फरार व्हायची; तब्बल 25 लग्न करणारी 'दरोडेखोर दुल्हन' अखेर सापडली!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vaishnavi Hagawane : अखेर वैष्णवीचं बाळ आता कस्पटे कुटुंबाकडे सुपूर्द, अज्ञाताने फोन करुन बाळाला सोपवलंSanjay Raut PC : अर्जुन खोतकरांवर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा; संजय राऊतांची मागणीArjun Khotkar on Dhule Money : अनिल गोटे यांचे आरोप अर्जुन खोतकर यांनी फेटाळलेVaishnavi Hagawane Case : ना हगवणे, ना कस्पटे, वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ कुणाकडे? Kaspate Family

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकच्या जिंदाल कंपनीत सलग तिसऱ्या आग धुमसतेय;  प्रचंड धुराचे काळे लाेट;  30 -40 अग्नीशमन बंब दाखल नेमकी परिस्थिती काय?
नाशिकच्या जिंदाल कंपनीत सलग तिसऱ्या आग धुमसतेय; प्रचंड धुराचे काळे लाेट; 30 -40 अग्नीशमन बंब दाखल नेमकी परिस्थिती काय?
Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचा पोलिस कोठडीतील मुक्काम चार दिवसांनी वाढला; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने कोर्टातून बाहेर काढलं
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचा पोलिस कोठडीतील मुक्काम चार दिवसांनी वाढला; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने कोर्टातून बाहेर काढलं
Anil Gote on Arjun Khotkar : मी खोटा आरोप करत असेल तर सरकार तुमचंय, मला अटक करा; अनिल गोटेंचं अर्जुन खोतकरांना ओपन चॅलेंज
मी खोटा आरोप करत असेल तर सरकार तुमचंय, मला अटक करा; अनिल गोटेंचं अर्जुन खोतकरांना ओपन चॅलेंज
मेकअप करून झोपायचं, दिवसातून तीनदा अंघोळ अन् लग्न करून 15 दिवसात फरार व्हायची; तब्बल 25 लग्न करणारी 'दरोडेखोर दुल्हन' अखेर सापडली!
मेकअप करून झोपायचं, दिवसातून तीनदा अंघोळ अन् लग्न करून 15 दिवसात फरार व्हायची; तब्बल 25 लग्न करणारी 'दरोडेखोर दुल्हन' अखेर सापडली!
Arjun Khotkar : खोतकरांच्या पीएच्या रूमध्ये सापडलं कोट्यवधींचे घबाड; खुद्द अर्जुन खोतकरांची प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया; अनिल गोटेंचे 'ते' खळबळजनक आरोप फेटाळले
खोतकरांच्या पीएच्या रूमध्ये सापडलं कोट्यवधींचे घबाड; खुद्द अर्जुन खोतकरांची प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया; अनिल गोटेंचे 'ते' खळबळजनक आरोप फेटाळले
Donald Trump : लाईट बंद करा अन् लाव रे तो व्हिडिओ! व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणखी एका राष्ट्राध्यक्षांना भिडले; राष्ट्राध्यक्ष म्हणाले, मला माफ करा, माझ्याकडे तुम्हाला भेट देण्यासाठी विमान नाही
लाईट बंद करा अन् लाव रे तो व्हिडिओ! व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणखी एका राष्ट्राध्यक्षांना भिडले; राष्ट्राध्यक्ष म्हणाले, मला माफ करा, माझ्याकडे तुम्हाला भेट देण्यासाठी विमान नाही
Washington Firing : अमेरिकेत ज्यू संग्रहालयाबाहेर गोळीबार, इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; अमेरिकेचा टार्गेट किलिंगचा आरोप
अमेरिकेत ज्यू संग्रहालयाबाहेर गोळीबार, इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; अमेरिकेचा टार्गेट किलिंगचा आरोप
एखाद्याच्या विचारसरणीसाठी जेलमध्ये टाकू शकत नाही, आम्ही ही प्रवृत्ती पाहत आहोत; न्यायालयाची 'सर्वोच्च' टिप्पणी
एखाद्याच्या विचारसरणीसाठी जेलमध्ये टाकू शकत नाही, आम्ही ही प्रवृत्ती पाहत आहोत; न्यायालयाची 'सर्वोच्च' टिप्पणी
Embed widget
OSZAR »