खरीप हंगामात कोणतेही अधिकारी रजेवर जाणार नाहीत, अन्यथा कारवाई, कृषीमंत्री कोकाटेंचा इशारा, अधिकाऱ्यांना फटकारले
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी आज खरीप हंगाम आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे.

Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी आज खरीप हंगाम आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. बैठकीला येताना अपूर्ण माहिती असणाऱ्या आणि गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोकाटे संतापल्याचे पाहायला मिळाले. गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जेखील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर खरीप हंगामात कोणतेही अधिकारी रजेवर किंवा संपावर जाणार नाहीत, असा इशाराही माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे.
मागेल त्याला शेततळे मग मागेल त्याला सोलर पंप का नाही? कृषीमंत्र्यांचा सवाल
लाभक्षेत्र विकास आणि महावितरण कंपनीचे अधिकारी गैरहजर असल्याने कोकाटे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. राज्यभरात होणाऱ्या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीला त्या त्या भागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना अन्यथा मुख्यमंत्र्यांकडे कारवाई करण्यासाठी अहवाल पाठवण्याचा इशारा देण्यात आला आहे. महावितरण कंपनीचे जे अधिकारी बैठकीला उपस्थित आहेत, त्यांना सोलर पंप बाबतीत अपूर्ण माहिती असल्यानं कोकाटे यांनी भर मिटींगमध्येच वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून माहिती घेतली आहे. मागेल त्याला शेततळे मग मागेल त्याला सोलर पंप का नाही? असा सवाल कोकाटे यांनी बैठकीत उपस्थित केला.
संप पुकारुन शेतकरी आणि सरकारला कोणीही वेठीस धरणार नाही
दरम्यान, खरीप हंगामात कोणताही अधिकारी रजेवर किंवा संपावर जाणार नसल्याच्या सूचना माणिकराव कोकाटे यांनी दिल्या आहेत. संप पुकारुन शेतकरी आणि सरकारला कोणीही वेठीस धरणार नाही, अन्यथा प्रशासकीय कारवाई केली जाईल असा इशारा कोकाटे यांनी दिला आहे. दोन दिवसांनी मुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. त्यावेळेस कृषी विभाग तयार असल्याचे आश्वासन मी त्यांना देणार असल्याचे माणिकराव कोकाटे म्हणाले.
दरम्यान, आज कृषीमंत्री मामिकराव कोकाटे यांनी खरीप हंगामाच्या संदर्भात नाशिकमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी या बैठकीला काही अधिकाऱ्यांना अनुपस्थिती दर्शवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळं कृषीमंत्री कोकाटे यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. आजच्या या खरीप हंगामांच्या संदर्भातील बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देखील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत. तसेच खरीपं हंगामात अधिकारी रजेवर गेल्यास कारवाई करणार असल्याचा इशाराहबी देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Manikrao Kokate : अजित पवारांच्या तंबीनंतर कृषीमंत्री कोकाटे नरमले? कर्जमाफीच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून म्हणाले, 'मी सामान्य घरातून आलोय, हुशार किंवा मोठा...'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
