Maharashtra Weather Update : मुंबई, ठाण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा; रायगडसह 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather Update : राज्यात आज 5 जुलै रोजी काही भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात आज 5 जुलै रोजी काही भागांमध्ये पावसाची (Rain) शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह (Mumbai) ठाण्यात (Thane) पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्गला (Sindhudurg) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये (Nashik) विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्यांते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या तिन्ही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यासह अन्य उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
मुंबई, ठाण्यात यलो अलर्ट
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत 5 जुलै रोजी एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज असून, या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच, नाशिकच्या घाटमाथा परिसरात आणि जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात यलो अलर्ट
विदर्भातील प्रमुख शहर नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, तिथेही यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या