एक्स्प्लोर

गडी थोडक्यात हुकला, नाहीतर गाठलं होतं, राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला, 4 वर्ष आमदारकी असतानाही शिंदेंनी का लढवली निवडणूक?

गडी थोडक्यात हुकला, ती बी थोडा फार दगाफटका झाला म्हणून नाहीतर गाठलं होत, असे म्हणत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना टोला लगावला.

Ram Shinde on Rohit Pawar : पुढची चार वर्षे विधानपरिषदेची आमदारकी असतानाही तुम्ही विधानसभेची निवडणूक का लढवली? असे लोक विचारत होती. पण  ज्याने आपल्याला पाडले त्याला पाडायची इच्छाशक्ती दांडगी होती. गडी थोडक्यात हुकला, ती बी थोडा फार दगाफटका झाला म्हणून नाहीतर गाठलं होत, असे म्हणत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना टोला लगावला. चांगलं काम करणं हे वाईट असतं हे मला उशिरा कळालं. आमच्या मतदारसंघाचा माणूस भेटला नाही बाहेरुन पाठवला. मागीलवेळी 43 हजार मतांचा फरक होता यावेळी 1243 मताचा फरक राहिल्याचे राम शिंदे म्हणाले.  क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थितीत इंदापुरात सभापती राम शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. 

 हार कर भी बाजीगर

ज्यांच्याकडून (रोहित पवार) पराभव झाला ते 288 मध्ये येतात आणि वरील सभागृहात 78 आहेत असे 368 जण सभागृहात आहेत. राज्याला एक सभापती आहे तो सगळ्या आमदारांचा सभापती असतो. त्याच्यामुळं हार कर भी बाजीगर अशी ती भानगड झाली आहे. काय त्यांच्यावर बेतली असेल तुम्हीच जाणून घ्या असेही राम शिंदे म्हणाले. आमच्या मतदारसंघातील लोक म्हणतात हजार पाचशे मतं कमी पडली होती. यालाच दिली असती तर बर झालं असतं, नाहीतर हे निवडून दिलं याचा काय उपयोग नाही आगे बी नाही आणि पीछे बी नाही असा टोला राम शिंदेंनी रोहित पवारांना लगावला. राज्यात नाही केंद्रात नाही, कामे होण्याची काही शक्यता नाही. कोणत्याही पार्टीकडून काम आणलं तर कोणी ऐकलं तर मी सध्या तिन्ही पक्षाचा सभापती आहे असंही राम शिंदे म्हणाले. 

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता राहिला नाही, विरोधात राहून करतील काय?

लोक म्हणतात राम शिंदे नशीबवान आहे, मी तर नशीबवान आहेच. कारण पण पडलो तरीही आमदार झालो, सभापती झालो असेही राम शिंदे म्हणाले. जे पडले आहेत त्यांची काय अवस्था आहे असेही राम शिंदे म्हणाले. राज्यातील सगळी लोकं म्हणतात येऊ का? 288 मध्ये 240 आमदार सत्तेत आहेत. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता राहिला नाही, विरोधात राहून करतील काय? 
निवडून आलेल्या 240 मधील 42 मंत्री आहेत, 198 आमदार आहेत आणि मी सभापती आहे असेही राम शिंदे म्हणाले. मी झोपल्यावर कधी कधी विचार करतो, आपलं बरं झालं का वाईट झालंय. जरी निवडून आलो असतो तरी 42 मध्ये मिळालं असता की नाही तो वेगळाच भाग असल्याचे राम शिंदे म्हणाले.

गळ्या आमदारांच्या पगारावर सह्या माझ्या 

मला तालुकाध्यक्ष होण्यास 10 वर्ष लागली.  प्रदेशाध्यक्ष म्हणून 10 वर्ष झालं नाव चर्चेत आहे. विधान परिषदेचा सभापती व्हायला मला अडीच वर्षे लागल्याचे राम शिंदे म्हणाले. विधान परिषदेला 100 वर्ष झाली आहेत. माझ्या एवढ्या तरुण माणसाला पहिल्यांदा सभापतीपद मिळालं आहे. कारण ते वरिष्ठ आणि ज्येष्ठांचं सभागृह आहे. पण कनिष्ठांना संधी मिळाली. आमदाराला आठ फेऱ्या विमानाच्या फुकट आहेत, सभापतीला कंटाळा येईपर्यंत आहेत. मंत्रालयात कोणत्या मंत्र्यांनी आमदाराने नागरिकांना दालनात यायला पास नाही दिला तर थेट मला फोन करा, कारण पास मीच देतो असेही राम शिंदे म्हणाले. सगळ्या आमदारांच्या पगारावर सह्या माझ्या आहेत. 

मनोज जरांगे पाटील यांचे राम शिंदेंनी मानले आभार

आपण ज्या पदावर जातो त्या पदाला आपण कोणत्या पद्धतीने न्याय देतो हे महत्त्वाचे आहे. खूप चांगलं असणं आणि लोकांनी स्तुती करणं हे देखील अडचणीचं असतं असेही राम शिंदे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आभार व्यक्त करतो, त्यांनी माझ्याबद्दल चांगले शब्द वापरले. राजकीय जीवनात मी आता सर्वोच्च पदावर गेलो आहे जनता जनार्दनाचा आशीर्वाद असल्याचे राम शिंदे म्हणाले. 

 

 

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : कदम कदम बढाए जाsss, भारतीय लष्कराने पावलं टाकली, इंडियन आर्मीकडून व्हिडीओ शेअर!
VIDEO : कदम कदम बढाए जाsss, भारतीय लष्कराने पावलं टाकली, इंडियन आर्मीकडून व्हिडीओ शेअर!
Raigad crime news : रायगडमधील तरुणाची देशविरोधी चिथावणीखोर पोस्ट, गुन्हा दाखल
रायगडमधील तरुणाची देशविरोधी चिथावणीखोर पोस्ट, गुन्हा दाखल
India Pakistan War Nuclear Attack: पाकिस्तानात अणवस्त्रांबाबत निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च समितीची बैठक खरोखरच झाली का? संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचं स्पष्टीकरण
पाकिस्तानात अणवस्त्रांबाबत निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च समितीची बैठक खरोखरच झाली का? संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचं स्पष्टीकरण
India Pakistan War Nuclear Attack: पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं मोठं पाऊल, अणवस्त्रांबाबत निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च समितीची बैठक बोलावली
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं मोठं पाऊल, अणवस्त्रांबाबत निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च समितीची बैठक बोलावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

India Pakistan War | श्रीनगरमध्ये  3 स्फोट, श्रीनगर विमानतळ परिसरात संशयास्पद ड्रोन आढळलेIndian Army Full PC | 26 वेळा हवाई घुसखोरी, नागरी विमानांची ढाल, पाकिस्तानची लबाडी पुन्हा उघडSirsa Airbase Pakistan Attack : सिरसा एअरबेसवर पाकची वाकडी नजर, भारताकडून हल्ल्याला प्रत्युत्तरIndia Vs Pakistan| फतेह-1 क्षेपणास्त्राद्वारे भारतावर हल्ल्याचा प्रयत्न, भारतानं परतवून लावले हल्ले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : कदम कदम बढाए जाsss, भारतीय लष्कराने पावलं टाकली, इंडियन आर्मीकडून व्हिडीओ शेअर!
VIDEO : कदम कदम बढाए जाsss, भारतीय लष्कराने पावलं टाकली, इंडियन आर्मीकडून व्हिडीओ शेअर!
Raigad crime news : रायगडमधील तरुणाची देशविरोधी चिथावणीखोर पोस्ट, गुन्हा दाखल
रायगडमधील तरुणाची देशविरोधी चिथावणीखोर पोस्ट, गुन्हा दाखल
India Pakistan War Nuclear Attack: पाकिस्तानात अणवस्त्रांबाबत निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च समितीची बैठक खरोखरच झाली का? संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचं स्पष्टीकरण
पाकिस्तानात अणवस्त्रांबाबत निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च समितीची बैठक खरोखरच झाली का? संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचं स्पष्टीकरण
India Pakistan War Nuclear Attack: पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं मोठं पाऊल, अणवस्त्रांबाबत निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च समितीची बैठक बोलावली
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं मोठं पाऊल, अणवस्त्रांबाबत निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च समितीची बैठक बोलावली
Colonel Sophia Qureshi : पीएचडी सोडून सैन्यात भरती, बहीण चित्रपटसृष्टीत; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशींबाबत 5 महत्त्वाच्या गोष्टी
पीएचडी सोडून सैन्यात भरती, बहीण चित्रपटसृष्टीत; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशींबाबत 5 महत्त्वाच्या गोष्टी
India Pakistan War: लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट; अनेक लष्करी तळ बेचिराख, पाकड्यांची तिसऱ्या दिवशीही खुमखुमी, सैन्यानं भाजून काढलं
लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट; अनेक लष्करी तळ बेचिराख, पाकड्यांची तिसऱ्या दिवशीही खुमखुमी, सैन्यानं भाजून काढलं
Sharad Pawar on Indian Pakistan War : बोलायचं नसतं तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते! भारत-पाकिस्तान युद्धाबाबत शरद पवारांचं वक्तव्य
बोलायचं नसतं तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते! भारत-पाकिस्तान युद्धाबाबत शरद पवारांचं वक्तव्य
India Pakistan War : पाकिस्तानचा बिनडोकपणा उघड, एअर डिफेन्स सिस्टीमने सियालकोटमध्ये स्वतःचाच ड्रोन पाडला
पाकिस्तानचा बिनडोकपणा उघड, एअर डिफेन्स सिस्टीमने सियालकोटमध्ये स्वतःचाच ड्रोन पाडला
Embed widget
OSZAR »