एक्स्प्लोर

Colonel Sophia Qureshi : पीएचडी सोडून सैन्यात भरती, बहीण चित्रपटसृष्टीत; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशींबाबत 5 महत्त्वाच्या गोष्टी

Colonel Sophia Qureshi : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत माहिती दिल्यानंतर कर्नल सोफिया कुरेशी यांचं देशभरातून कौतुक होत आहे.

Colonel Sophia Qureshi : भारताने पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या (Operation Sindoor) माध्यमातून आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला असून, यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला घेतला गेला आहे. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांचे तळ पीओकेसोबतच पाकिस्तानच्या आतील भागातही ध्वस्त करण्यात आले आहे. या ऑपरेशनसंबंधी सर्व माहिती कर्नल सोफिया कुरेशी (Sophia Qureshi) आणि विंग कमांडर व्योमिका सिंग (Vyomika Singh) यांनी दिली होती. यानंतर कर्नल सोफिया कुरेशी या देशभरात चर्चेत आल्या आहेत. तर जाणून घेऊयात त्यांच्याबाबत 5 महत्त्वाची गोष्टी...

1. कर्नल सोफिया कुरेशी यांनी महाराजा सयाजीराव विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

2. पदव्युत्तर पदवीनंतर, सोफिया यांनी व्याख्याता म्हणून शिकवण्यास सुरुवात देखील केली.

3. जेव्हा भारत सरकारने सैन्यात उच्च पदांवर महिलांसाठी भरतीची घोषणा केली तेव्हा सोफिया यांनी त्यांची पीएचडी अर्ध्यावरच सोडली.

4. सोफिया कुरेशी यांच्या बहीण शायना कुरेशी या चित्रपटांशी संबंधित आहे. त्यांचे मुंबईत एक प्रॉडक्शन हाऊस देखील आहे.

5. सोफिया कुरेशी या बहुराष्ट्रीय लष्करी सरावाचे नेतृत्व करणाऱ्या महिला अधिकारी आहेत. 

ऑपरेशन सिंदूरसंदर्भात देशाला माहिती देण्याची संपूर्ण जबाबदारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी पार पाडली, त्यामुळेच त्यांचं विशेष कौतुक केलं जात आहे. त्यांनी हिंदीत तर विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी इंग्रजीत सैनिकी कारवाईची माहिती दिली. दोन महिला अधिकाऱ्यांनी दिलेल्या या माहितीला नारीशक्तीचा प्रभावी संदेश मानलं जात आहे. ऑपरेशनचं नाव ‘सिंदूर’ आणि माहिती देणाऱ्या महिला अधिकारी, यामुळे एक मजबूत प्रतीक निर्माण झालं आहे.

दरम्यान, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मसूद अझहरच्या दहशतवादी कारवायांचा सडेतोड बदला घेतला गेला असून, भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील जैश आणि लष्करशी संबंधित प्रमुख तळांवर निशाणा साधला आहे. बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, भिम्बर, कोटली आणि मुजफ्फराबादमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर अचूक हल्ले करण्यात आले आहेत. या कारवाईत दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेषज्ञांच्या मते, मुरीदके आणि बहावलपूर हे अत्यंत सुरक्षित मानले जाणारे भाग आहेत, जिथे पाकिस्तानी लष्कराचंही संरक्षण असतं. अशा ठिकाणी घुसून दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करणे ही भारतीय लष्कराच्या तीनही दलांची मोठी यशस्वी कामगिरी मानली जात आहे. पाकिस्ताननेही ही कारवाई झाल्याचे मान्य केले आहे. 

आणखी वाचा

Colonel Sophia Qureshi : कर्नल सोफिया कुरेशी देखील..., ऑपरेशन सिंदूरनंतर चर्चेतील महिला लष्करी अधिकाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालयात चर्चा; नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंबोली घाटात दरड कोसळली, वाहनांच्या रांगा लागल्या; एकेरी वाहतूक सुरु, प्रवासी ताटकळले
आंबोली घाटात दरड कोसळली, वाहनांच्या रांगा लागल्या; एकेरी वाहतूक सुरु, प्रवासी ताटकळले
Video : अल्टो कारमध्ये रात्री उशिरा 'बेवफा बायको' बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ सापडली अन् नवऱ्याने हातात पाण्यानं भरलेला तांब्या घेत...
Video : अल्टो कारमध्ये रात्री उशिरा 'बेवफा बायको' बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ सापडली अन् नवऱ्याने हातात पाण्यानं भरलेला तांब्या घेत...
Vaishnavi Hagawane Death: सासऱ्याने मारले, कपडे फाडले, शशांकने खाली पाडून केस उपटले, हगवणेंची मोठी सून मयुरीनं काय काय सांगितलं?
सासऱ्याने मारले, कपडे फाडले, शशांकने खाली पाडून केस उपटले, हगवणेंची मोठी सून मयुरीनं काय काय सांगितलं?
Jagtap Family On Vaishnavi Hagawane Death : हगवणेंच्या दुसऱ्या सूनेचीही हादरवणारी कहाणी, वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण, मयूरीच्या भावाने CCTV दाखवला!
हगवणेंच्या दुसऱ्या सूनेचीही हादरवणारी कहाणी, वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण, मयूरीच्या भावाने CCTV दाखवला!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mayuri Jagtap Family : हागवणेंच्या दुसऱ्या सूनेची हादरवणारी कहाणी, आई- भावाने सांगितली हकिकतMayuri Jagtap Family On Shashank Hagawane : हगवणे कुटुंबाकडून थोरली सून मयुरी जगतापला मारहाण, मयुरीच्या भावाने दाखवला CCTVAjit Pawar On Vaishnavi Hagawane : लग्नाला गेलो, त्यांनी सुनेसोबत वेडंवाकडं केलं तर माझा काय संबंध? अजितदादाचं वक्तव्यVaishnavi Hagawane : अखेर वैष्णवीचं बाळ आता कस्पटे कुटुंबाकडे सुपूर्द, अज्ञाताने फोन करुन बाळाला सोपवलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंबोली घाटात दरड कोसळली, वाहनांच्या रांगा लागल्या; एकेरी वाहतूक सुरु, प्रवासी ताटकळले
आंबोली घाटात दरड कोसळली, वाहनांच्या रांगा लागल्या; एकेरी वाहतूक सुरु, प्रवासी ताटकळले
Video : अल्टो कारमध्ये रात्री उशिरा 'बेवफा बायको' बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ सापडली अन् नवऱ्याने हातात पाण्यानं भरलेला तांब्या घेत...
Video : अल्टो कारमध्ये रात्री उशिरा 'बेवफा बायको' बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ सापडली अन् नवऱ्याने हातात पाण्यानं भरलेला तांब्या घेत...
Vaishnavi Hagawane Death: सासऱ्याने मारले, कपडे फाडले, शशांकने खाली पाडून केस उपटले, हगवणेंची मोठी सून मयुरीनं काय काय सांगितलं?
सासऱ्याने मारले, कपडे फाडले, शशांकने खाली पाडून केस उपटले, हगवणेंची मोठी सून मयुरीनं काय काय सांगितलं?
Jagtap Family On Vaishnavi Hagawane Death : हगवणेंच्या दुसऱ्या सूनेचीही हादरवणारी कहाणी, वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण, मयूरीच्या भावाने CCTV दाखवला!
हगवणेंच्या दुसऱ्या सूनेचीही हादरवणारी कहाणी, वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण, मयूरीच्या भावाने CCTV दाखवला!
Video मोदी का दिमाग थंडा है, लेकीन लहू गरम है; राजस्थानमधून PM मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा
Video मोदी का दिमाग थंडा है, लेकीन लहू गरम है; राजस्थानमधून PM मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा
नाशिकच्या जिंदाल कंपनीत सलग तिसऱ्या दिवशी आग धुमसतेय;  प्रचंड धुराचे काळे लाेट;  30 -40 अग्नीशमन बंब दाखल नेमकी परिस्थिती काय?
नाशिकच्या जिंदाल कंपनीत सलग तिसऱ्या दिवशी आग धुमसतेय; प्रचंड धुराचे काळे लाेट; 30 -40 अग्नीशमन बंब दाखल नेमकी परिस्थिती काय?
Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचा पोलिस कोठडीतील मुक्काम चार दिवसांनी वाढला; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने कोर्टातून बाहेर काढलं
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचा पोलिस कोठडीतील मुक्काम चार दिवसांनी वाढला; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने कोर्टातून बाहेर काढलं
Anil Gote on Arjun Khotkar : मी खोटा आरोप करत असेल तर सरकार तुमचंय, मला अटक करा; अनिल गोटेंचं अर्जुन खोतकरांना ओपन चॅलेंज
मी खोटा आरोप करत असेल तर सरकार तुमचंय, मला अटक करा; अनिल गोटेंचं अर्जुन खोतकरांना ओपन चॅलेंज
Embed widget
OSZAR »