एक्स्प्लोर

मांजर आडवं गेल्याने अपशकून झाल्याची भावना, हैवानांच्या कृत्याने संताप

Uttar Pradesh Crime News : मांजर आडवं गेल्याने अपशकून झाल्याची भावना, हैवानांच्या कृत्याने संताप

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून एक बातमी ऐकून तुमची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहाणार नाही. एका महिलेने तिच्या काही मित्रांच्या मदतीने मांजरीला जीवंत जाळून (Uttar Pradesh Crime News) टाकल्याची घटना घडली आहे.  मांजर आडवी आल्यानं महिलेसह तिच्या मित्रांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंधश्रद्धेला बळी पडून मुक्या प्राण्याचा अशा पद्धतीने जीव घेतल्यानंतर अशा हैवानांना कोणती शिक्षा द्यायची असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. काय आहे हे संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घेऊया.

अंधश्रद्धेतून घेतला मांजरीचा जीव  

आपण अनेकदा ऐकले आहे की, काही कामासाठी बाहेर जाताना मांजर तुमचा रस्ता ओलांडली तर ते अशुभ असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, जर तो मांजर एखाद्याच्या समोरून गेली तर कोणाचे नुकसान कसे होईल? या प्रकरणात ज्यांच्यासमोर मांजर आडवी गेली त्यांचे तर नुकसान झालेच नाही. मात्र, त्या मांजराचा मात्र या हैवानांनी विनाकारण जीव घेतलाय. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये काही लोकांनी क्रौर्याची परिसीमा ओलांडून एका मांजरीला जाळले.

मांजर आडवी गेल्यानंतर उत्तर प्रदेशात ह्रदय पिळवटून टाकणारी घटना

ज्या लोकांचा मार्ग मांजरीने ओलांडला ते मोटरसायकल चालवत होते, त्या लोकांमध्ये एका महिलेचा समावेश होता. ही मंडळी रस्त्याने जात असताना एका मांजरीने त्यांची वाट ओलांडली. दरम्यान, त्या लोकांनी संतप्त होऊन आधी मांजरीला मारहाण केली आणि त्यानंतर पेटवून दिले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मात्र,असा सर्वांना विचलीत करणारा व्हिडीओ शेअर करणे योग्य नाही, त्यामुळे आम्ही तो व्हिडीओ देणे टाळत आहोत. मात्र, मांजरीला जीवंत जाळल्याची ह्रदय पिळवटून टाकणारी घटना उत्तर प्रदेशात घडलीये. 

दरम्यान, मांजरीला क्रूरतेने संपवणाऱ्या हैवानांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वास्तविक वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोला व्हिडिओसह एक ईमेल प्राप्त झाला, त्यानंतर कारवाई करण्यात आली. आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, आरोपी हे कृत्य कॅमेऱ्यात करताना दिसले. अधिकाऱ्यांनी त्याच्या मोटारसायकलचा शोध घेतला असून पुढील तपास सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने घेतलेली कार नेमकी किती कोटींची? इतकी महागडी कार घेणारी पहिलीच भारतीय अभिनेत्री!

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Election : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर दोन-तीन वेळा चर्चा, पण शरद पवारांनी...; अजित पवारांचा गौप्यस्फोट
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर दोन-तीन वेळा चर्चा, पण शरद पवारांनी...; अजित पवारांचा गौप्यस्फोट
Railway Rules: रेल्वे आरक्षण चार्ट आता 24 तास अगोदर मिळणार, भारतीय रेल्वे मोठा बदल करणार
रेल्वे आरक्षण चार्ट आता 4 तास नव्हे 24 तास अगोदर मिळणार, भारतीय रेल्वे मोठा बदल करणार
Solar Energy :राज्यात 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार; 3 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ : देवेंद्र फडणवीस
राज्यात 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार; 3 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ
दीड दमडीचा वकील, जा कुठं जायचंय तिथं जा; वाहतूक महिला पोलिसाचा आणखी एक व्हिडिओ
दीड दमडीचा वकील, जा कुठं जायचंय तिथं जा; वाहतूक महिला पोलिसाचा आणखी एक व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Landge On Praniti Shinde : ...तर प्रणिती शिंदे यांना चपलेने मारा; अमोल लांडगेंची जीभ घसरली
Sujat Ambedkar : 2024 आधी प्रणिती शिंदे कोणाला जय भीम म्हणत होत्या का? सुजात आंबेडकरांची टीका
Salman Khan reveals brain aneurysm : चेहऱ्याच्या एका बाजूला वेदना, ट्राइजेमिनल न्यूराल्जिया म्हणजे काय?
Udayanraje Bhosale Satara : उदयनराजेंकडून आधी पप्पी, मग झप्पी, थार घेऊन आलेल्या कार्यकर्त्याचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar Robbery :  लड्डांच्या घरी दरोडाप्रकरणी रोहिणीला अटक, 22 तोळे सोनं ,7 जिवंत काडतुसं जप्त

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Election : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर दोन-तीन वेळा चर्चा, पण शरद पवारांनी...; अजित पवारांचा गौप्यस्फोट
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर दोन-तीन वेळा चर्चा, पण शरद पवारांनी...; अजित पवारांचा गौप्यस्फोट
Railway Rules: रेल्वे आरक्षण चार्ट आता 24 तास अगोदर मिळणार, भारतीय रेल्वे मोठा बदल करणार
रेल्वे आरक्षण चार्ट आता 4 तास नव्हे 24 तास अगोदर मिळणार, भारतीय रेल्वे मोठा बदल करणार
Solar Energy :राज्यात 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार; 3 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ : देवेंद्र फडणवीस
राज्यात 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार; 3 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ
दीड दमडीचा वकील, जा कुठं जायचंय तिथं जा; वाहतूक महिला पोलिसाचा आणखी एक व्हिडिओ
दीड दमडीचा वकील, जा कुठं जायचंय तिथं जा; वाहतूक महिला पोलिसाचा आणखी एक व्हिडिओ
Multibagger Stock : 'या' मल्टीबॅगर स्टॉकमध्ये तेजी कायम, प्रमोटर्सनं भागीदारी वाढवली, शेअर बनला रॉकेट
Multibagger Stock : 'या' मल्टीबॅगर स्टॉकमध्ये तेजी कायम, प्रमोटर्सनं भागीदारी वाढवली, शेअर बनला रॉकेट
मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढील 5 दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे, कृषी विद्यापिठाची शिफारस काय? वाचा..
मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढील 5 दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे, कृषी विद्यापिठाची शिफारस काय? वाचा..
मोठी बातमी! लातूरमधील नारायणा इ-टेक्नो स्कुलला ठोकलं टाळं; लाखो रुपये फी भरलेले पालक चिंतेत
मोठी बातमी! लातूरमधील नारायणा इ-टेक्नो स्कुलला ठोकलं टाळं; लाखो रुपये फी भरलेले पालक चिंतेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून 2025 | मंगळवार
Embed widget
OSZAR »