India Pakistan War Live Updates: जैश-ए- मोहम्मदचा डाव उधळला, 7 दहशतवाद्यांना कंठस्नान
Operation Sindoor LIVE Updates: पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतानं थेट इस्लामाबादवर हवाई हल्ला केल्याची माहिती आहे.
LIVE

Background
Operation Sindoor LIVE Updates : भारतानं (India Pakistan Tensions) ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरु केल्यानंतर पाकिस्ताननं (Pakistan) भारताच्या 15 लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याच प्रयत्न केला होता. भारतानं तो प्रयत्न हाणून पाडला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आज रात्री पाकिस्ताननं जम्मू काश्मीर, पंजाब (Punjab), राजस्थानच्या सीमावर्ती भागात हल्ल्याचा प्रयत्न केला होता. तो भारतानं नाकाम केला आहे. भारताच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टीमनं (S-400 Air Defense System) पाकिस्तानचं ड्रोन (Pakistan Drone), मिसाईल आणि लढाऊ विमानं (Fighter Jets) पाडली आहेत. भारतानं इस्लामाबाद (Islamabad), कराची, लाहोरमध्ये (Lahore) प्रतिहल्ले केले आहेत.
पाकिस्तानने राजस्थानवर केलेल्या ड्रोन हल्ला उधळला असून राजस्थानच्या गंगा नगरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. पाकिस्तानकडून केलेल्या हल्ल्याचा प्रयत्न भारतानं उधळल्याची माहिती मिळत आहे.
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला भल्या सकाळी जम्मूकडे रवाना झालेत. रात्री पाकिस्तानकडून झालेल्या अयशस्वी ड्रोन हल्ल्याचा आढावा घेण्यासाठी जात असल्याचं ट्विट अब्दुल्लांनी केलं. जम्मू आणि इतर भागात पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
भारताच्या तिन्ही दलांकडून पाकिस्तानची कोंडी, एलओसीवर भारतीय लष्कराचा गोळीबार, पाकिस्तांनी शहरांवर एअर स्ट्राईक तर कराची बंदरात आयएनएस विक्रांतकडूनही धमाका करण्यात आला आहे.
India Pakistan War LIVE: भारताचा पाकिस्तानला मोठा दणका, आकाशानंतर समुद्रातूनही पाकिस्तानचं कंबरडं मोडलं
India Pakistan War: भारतानं पाकिस्तानला मोठा दणका दिला तो म्हणजे कराचीत. आकाशानंतर समुद्रातूनही भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. पाकिस्तानातल्या महत्त्वाच्या कराची बंदरावरच भारतीय नौदलानं हल्ल्यामागून हल्ले केले. 14 पेक्षा जास्त स्फोटांनी कराची बंदर हादरून गेलं. भारतीय नौदलाच्या धडक कारवाईनंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्ताननं कराची बंदरात ब्लॅकआऊट केलं. 1971 नंतर पहिल्यांदाच भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या कराची बंदराला टार्गेट केलं.
India–Pakistan War LIVE: पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमध्ये LOC वर रात्रभर जोरदार गोळीबार
India–Pakistan War LIVE: पाकिस्ताननं जम्मू काश्मीरमध्ये एलओसीवर रात्रभर जोरदार गोळीबार केला. त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलं. भारताने केलेल्या भडीमारात पाकिस्तानी चौक्या अक्षरशः भाजून निघाल्या. दक्षिण काश्मीरमधील पूंछ, राजौरी, सांबा सेक्टरमध्ये एलओसीवर पाकिस्तानचा रात्रभर तोफांचा भडीमार सुरू होता. तो अजूनही सुरूच आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानेही तोडीस तोड उत्तर दिलं. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आलाय.
India–Pakistan War: भारताचा पाकिस्तानला रात्रभर मोठा दणका, थेट इस्लामाबादपर्यंत धडक
India–Pakistan War: भारतानं पाकिस्तानला रात्रभर मोठा दणका दिला. थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले. त्यामुळे इस्लामाबादेत एकच हाहाकार माजलाय. कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबाद हादरून गेलं. केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरचीही भारतीय सैन्यांनी झोप उडवली. पाकिस्तानातल्या 16 शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला. अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली.
जम्मू मध्ये पुन्हा ब्लॅकआऊट, पुन्हा सायरन वाजले!
जम्मूमध्ये पुन्हा ब्लॅक आऊट करण्यात आलं आहे. शहरात पुन्हा सायरन वाजल्याची माहिती समोर आली आहे.
बीएसएफनं जैश ए मोहम्मदचा डाव उधळून लावला
बीएसएफनं जैश ए मोहम्मदचा डाव उधळून लावला आहे. जैश-ए- मोहम्मदचे 12 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात होते त्यापैकी 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
