Operation Sindoor: 'आमचं कुंकू पुसणाऱ्यांना धडा शिकवला, ऑपरेशन सिंदूर नाव दिल्याबद्दल आभारी, पुण्याच्या जगदाळे कुटुंबाची प्रतिक्रिया
Operation Sindoor: भारताने केलेल्या या ऑपरेशन सिंदूर मोहीमेनंतर हल्ल्यात पुण्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Operation Sindoor: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर आणि पाकिस्तान भारतीय सेनेनं अखेर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलाने आज (बुधवारी) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेसाठी ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं आहे. भारतीय वायुदलाकडून जैश ए मोहम्मद, हिजबुल मुज्जाहिद्दीन, लश्कर ए तोयबाचे तळ उद्धवस्त, मध्यरात्री दीड वाजता कारवाई करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यामध्ये एकूण 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामधील 6 जण महाराष्ट्रातील होते, दरम्यान भारताने केलेल्या या ऑपरेशन सिंदूर मोहीमेनंतर हल्ल्यात पुण्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
एबीपी माझाशी बोलताना पुण्याच्या जगदाळे कुटुंबाची प्रतिक्रिया दिली आहे, हे जे सिंदूर ऑपरेशन केलं आहे, त्यातून त्यांनी त्या हल्ल्यातील सर्वांना श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांनी या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं त्यासाठी मी त्यांची आभारी आहे, मोदींनी आमच्या भावना जाणून घेतल्या. आमच्या समोरच आमचं कुंकू त्या दहशतवाद्यांनी पुसलं. गोळ्या घालून त्यांनी माझ्या नवऱ्याला मारलं. आज पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन त्या दहशतवाद्यांच्या तळावरती हल्ला केला आहे, तो अतिशय योग्य आहे. हा धडा त्यांना देणं गरजेचं होतं. मला खात्री होती, आम्ही मोदींच्या मुली आहोत, ते त्यांच्या मुलींना समजून घेतील अशी खात्री होती. याआधी झालेले उरी हल्ला झाला होता, त्यातून त्यांनी असं दाखवून दिलं होतं आम्ही करू शकतो. आताही मला खात्री होती, थोड वेळ घेतील पण ते हल्ला करतील, असंही जगदाळेंच्या बायकोने म्हटलं आहे.
आसावरी जगदाळेने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आज खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांना सरकारकडून श्रध्दांजली मिळाली असं वाटतं आहे. पंधरा दिवसात मिशन पूर्ण केलं. मी सरकारचे आभार मानते, जे 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यांना आज श्रध्दांजली मिळाली आहे, असंही आसावरी म्हणाली.
पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, 9 कॅम्प्स उद्धवस्त
(बहावलपूर (02), मुरीदके, मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भिंबर, चक आमरू, सियालकोट येथे हवाई हल्ले करण्यात आले). या हवाई हल्ल्यात या ठिकाणी असलेले अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले.
1. बहावलपूर (2): जैश-ए-मोहम्मद मुख्यालय (जिथे 16 एप्रिल रोजी हमास कमांडरचे स्वागत करण्यात आले होते)
2. मुरीदके: लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
3. मुझफ्फराबाद: हिजबुल मुजाहिद्दीनचा तळ
4. कोटली: दहशतवादी तळ
5. गुलपूर: दहशतवादाचे लाँच पॅड
6. भिंबर: दहशतवादाचे लाँच पॅड
7. चक अमरू: टेरर लाँच पॅड
८. सियालकोट: दहशतवादी तळ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
