India Pakistan War: भारताचा आणखी एक एअर स्ट्राईक, पाकिस्तानच्या 'या' भागात ड्रोनद्वारे हल्ला

India Pak war: भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरु झाल्याने आयपीएल स्पर्धा रद्द झाली आहे. भारताकडून मोठा निर्णय. भारत पाकिस्तानवर आणखी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत?

Continues below advertisement

India Pakistan War: भारतीय वायदूलाने शुक्रवारी सकाळी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेल्या ओकारा आर्मी कैंट परिसरात ड्रोन हल्ला (Drone Attack) केल्याची माहिती समोर आली आहे. कालच भारताने पाकिस्तानमधील (Pakistan) प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ले केले होते. त्यानंतर पाकिस्तान सातत्याने सीमारेषेवर हल्ले करत आहे. आज सकाळीच पाकिस्तानचे 5 ड्रोन्स चंदीगढ शहरात शिरले होते. त्यामुळे सायरन वाजवून शहरातील सर्व लोकांना घराबाहेर न निघण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यानंतर आता भारतानेही पाकिस्तानवर ड्रोन हल्ला (Drone Attack) केल्याची माहिती समोर आली आहे. 

Continues below advertisement

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरुवारी रात्रीपासून युद्धाला तोंड फुटले आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तान आणि भारताने एकमेकांवर हवाई हल्ले केले होते. यामध्ये भारताने पाकिस्तानचे हवाई हल्ले परतावून लावले होते. परंतु, भारतीय वायूदलाच्या (Indian Army) प्रतिहल्ल्यात पाकिस्तानमधील इस्लामाबाद, लाहोर, क्वेटा या प्रमुख शहरांमध्ये मोठे नुकसान झाले होते. भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांत युद्धनौकेने कराची बंदरावर क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. यानंतर दुसऱ्या दिवशीही भारत आणि पाकिस्तान यांच्यात हल्ले-प्रतिहल्ले सुरु असल्याचे दिसत आहे.  

सांबा गावातील जंगलात लपलेल्या जैशच्या 7 दहशवाद्यांचा खात्मा

जम्मू -काश्मीरमधील सांबा जवळच्या जंगलात जैशच्या सात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सांबा भागातल्या बीएसएफच्या कारवाईची दृश्य समोर आली आहेत. याशिवाय, सध्या सीमारेषेवर भारत आणि पाकिस्तान यांच्याकडून एकमेकांवर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला जात आहे. भारताने सीमारेषेच्या परिसरातील गावांमधून लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. 

भारतीय सैन्यदलाने गुरुवारी रात्री वेगवान ड्रोन हल्ले करुन पाकिस्तानमधील अनेक भाग बेचिराख केले आहेत. याशिवाय, क्वेटा परिसरात बलोच आर्मीने बलुचिस्तानचा एक तृतीयांश भाग ताब्यात घेतला आहे. मात्र, तरीही पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी अद्याप जिरलेली नाही. पाकिस्तानकडून दुसऱ्या दिवशीही भारतावर हल्ले सुरु आहेत. त्यामुळे भारत आता पाकिस्तानवर आणखी मोठी कारवाई करु शकतो. भारताने त्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. सध्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठका पार पडत आहेत.

आणखी वाचा

भारतीय सैन्यासमोर डाळ शिजली नाही, आता पाकिस्तानचा वेगळाच इरादा? 'त्या' बोटी ताब्यात घेतल्याने संशय वाढला

भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे 50 ड्रोन्स पाडले, जगाला हेवा वाटेल अशी कामगिरी करुन दाखवली

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »