Pune News: ...म्हणून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर चढली गाय, खाली उतरताच येईना; पुण्यात क्रेन बोलावून पार पडलं "गो- मातेचे" रेस्क्यू ऑपरेशन

Pune News: कुत्री भुंकत असल्यामुळे ती इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर चढली परत खाली उतरता येईना, क्रेन बोलावून पुण्यात पार पडलं गो- मातेचे रेस्क्यू ऑपरेशन, पाहा फोटो.

Continues below advertisement

Pune News

Continues below advertisement
1/7
पुणे: कायमच आपण पुणे तिथे काय उणे असं ऐकतो किंवा बोलतो, पुणे कायमच वेगवेगळ्या गोष्टींमुळं चर्चेत असतं. अशातच आणखी एका गोष्टीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
2/7
पुण्यातील रविवार पेठ परिसरातील कापड गल्ली इथं असणाऱ्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक गाय पायऱ्या चढून वरती गेली.
3/7
गाय दुसऱ्या मजल्यावर गेली खरी, पण तीला त्या जिन्यावरून खाली उतरता येईना. ती तिथेच बराच काळ थांबली,या घटनेची माहिती अग्नीशामक दलाला देण्यात आली.
4/7
त्यानंतर काहीवेळेतच अग्नीशामक दलाने गाईला क्रेनच्या सहाय्याने व्यवस्थित खाली उतरवलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
5/7
तो जिना निमुळता असल्याने गाईला खाली उतरता येईना. नंतर तिला क्रेनच्या सहाय्याने तिला खाली उतरविण्यात आलं आहे.
Continues below advertisement
6/7
तिच्यामागे कुत्री भुंकत असल्यामुळे ती इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर चढली अशी माहिती येथील नागरिकांनी दिली आहे, मात्र, तिला खाली उतरता येत नसल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी गाईला क्रेनच्या सहाय्याने खाली उतरवली
7/7
हा सर्व प्रकार जवळपास 2 तास सुरू होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sponsored Links by Taboola
OSZAR »