Video : अल्टो कारमध्ये रात्री उशिरा 'बेवफा बायको' बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ सापडली अन् नवऱ्याने हातात पाण्यानं भरलेला तांब्या घेत...
व्हायरल व्हिडिओ कुठून आला याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नव्हती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो पुरूष आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह परिस्थितीत पकडतो.

Viral Video : आजकाल नात्यांचे महत्त्व कमी होत चालले आहे. विवाहबाह्य संबंधामुळे खूनही सर्रास होत चालले आहेत. त्यामुळे अनेक घरे तुटत चालली आहेत. अशा कथा दररोज ऐकायला मिळतात. आता आणखी एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे, जिथे एक पती आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडतो. त्यानंतर, नवऱ्यानं केलेल्या कृतीनंतर चर्चेचा विषय झाला आहे. पत्नीच्या बेवफाईमुळे दुखावलेला पतीनं भांगेतील सिंदूर धुवून काढत पत्नीच्या प्रियकराला तिच्या मांगात सिंदूर भरायला लावतो. हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून प्रतिक्रियाही उमटत आहेत.
भांगातून सिंदूर काढला आणि नंतर…
व्हायरल व्हिडिओ कुठून आला याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नव्हती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो पुरूष आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह परिस्थितीत पकडतो. त्यानंतर तो त्यांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतो. व्हायरल व्हिडिओमध्ये तो पुरूष आपल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला गाडीतून बाहेर काढताना दिसत आहे. तो एका तांब्यातून पाणी आणतो आणि पत्नीच्या कपाळावरून सिंदूर काढू लागतो. हे पाहून महिलेला धक्का बसतो आणि ती तसे करण्यास तयार नसल्याचे दिसते. तो पुरूष तिच्या कपाळावरचे त्याचे निशाणी असलेले सिंदूर पाण्याने काढून धुवून टाकतो. त्यानंतर, तो तिच्या प्रियकराला महिलेच्या कपाळावर सिंदूर भरण्यास सांगतो. हा व्हिडिओ @gharkekalesh अकाउंटवरून इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो खूप वेगाने व्हायरल होत आहे.
Wife got #caught with someone else.
— ShoneeKapoor (@ShoneeKapoor) May 21, 2025
Got instant judgment on the spot. pic.twitter.com/yxkMInfveQ
व्हायरल व्हिडिओवर लोकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत
लोक व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. बरेच लोक त्या तरुणाचे समर्थन करताना दिसत आहेत. एका युजरने म्हटले आहे, "खूप छान भाऊ, ती तुमच्या निष्ठेला पात्र नाही." दुसऱ्या युजरने म्हटले आहे, "पतीचा जीव वाचला आहे." दुसऱ्या युजरने म्हटले आहे, "हा खरोखर एक चांगला धडा आहे. उर्वरित आयुष्य पश्चात्तापाने जगू द्या." एका युजरने असेही म्हटले आहे की, "हे बरोबर नाही. तुम्ही तिला घटस्फोट द्यायला हवा होता. हे नाटक का?"
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
