खिशातून हात काढून उभा राहा, आरोग्य मंत्र्यांची फिल्मी एन्ट्री, मेडिकल ऑफिसर जागेवर सस्पेंड, उद्धट वर्तनावरुन झाडलं!
Goa health minister Vishwajit Rane : खिशातून हात काढून उभा राहा, आरोग्य मंत्र्यांची फिल्मी एन्ट्री, मेडिकल ऑफिसर जागेवर सस्पेंड, उद्धट वर्तनावरुन झाडलं!

Goa health minister Vishwajit Rane : गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Goa health minister Vishwajit Rane) यांनी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये अचानक अचानक भेट दिली. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी डॉ. रुद्रेश यांच्या उद्धट वर्तनाबद्दल माहिती मिळाली होती. त्यामुळे आरोग्य मंत्री विश्वजीत राणेंकडून (Goa health minister Vishwajit Rane) कॅज्युल्टी विभागाचे डॉ. रुद्रेश यांच्या तात्काळ निलंबनाचा आदेश देण्यात आले. यावेळी त्यांनी रुग्णांशी नीट बोला आणि वागा. अन्यथा घरी चला असा सज्जड दमही विश्वजीत राणे यांनी संबंधित अधिकाऱ्याला दिला. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा (Goa health minister Vishwajit Rane) रुद्रावतार पहायला मिळाला. रुग्णांशी नीट बोला आणि वागा, अन्यथा घरी चला, असं म्हणत आरोग्य मंत्र्यांनी डॉक्टराच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
विश्वजीत राणे यांनी मेडिकल कॉलेजमध्ये फिल्म स्टाईल एन्ट्री घेतली. प्रवेश करताच इथे चीफ मेडिकल ऑफिसर कोण आहे? म्हणून विचारु लागले. यावेळी समोरील नर्सने आसपासच असतील, असं सांगितलं. मात्र, ते कुठे आहेत. त्यांना बोलवा म्हणून विश्वजीत राणे तिथेच बसून राहिले. यावेळी चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. रुद्रेश यांना त्यांच्यासमोर हजर व्हावे लागले.
विश्वजीत राणे काय काय म्हणाले?
विश्वजीत राणे डॉक्टरांना झापताना म्हणाले, तुम्ही लोकांना व्यवस्थितरित्या गाईड करत नाहीत. मला तुमच्यावर कारवाई करायला भाग पाडू नका. खिशातून हात बाहेर काढून माझ्यासमोर उभं राहा. तोंडावरचा मास्क काढा, असं म्हणत विश्वजीत राणे यांनी डॉ. रुद्रेश यांना सुनावलं. शिवाय त्यांच्या निलंबनाचं पत्रक काढण्याचे आदेशही दिले.
पुढे बोलताना विश्वजीत राणे म्हणाले, तुम्ही घरी जा.. तुला केस दाखल करायची असेल तर कर..पण तुला सांगतोय की, तुझं निलंबन करण्यात आलं आहे. जीभेवर ताबा मिळवायला तुम्ही शिकायला हवं. तुम्ही डॉक्टर आहात. तुम्ही रुग्णांशी आणि येथील लोकांशी चांगल्या पद्धतीने बोललं पाहिजे. मी बोलत असताना मध्येच अडवण्याचा तुला अधिकार नाही.
Vishwajit Rane Goa : रुग्णांशी उद्धट वर्तन, आरोग्यमंत्र्यांकडून डॉक्टरचं जागेवर निलंबन
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
