शॉकिंग! ज्योतिबाच्या डोंगर परिसरात बायकोची गळा चिरून हत्या; पती कोल्हापुरातून थेट सोलापूर पोलीस ठाण्यात
पत्नीचा खून केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला आणि दुचाकीवरून थेट सोलापूरमधील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात येऊन आत्मसमर्पण केले

Solapur Crime News: कोल्हापुरातील जोतिबाच्या डोंगरात पत्नीची गळा चिरून हत्या करून पती थेट सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात हजर झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चारित्र्यावर संशय आल्याच्या कारणावरून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. शुभांगी राजपूत असं मृत महिलेचं नाव असून, तिचा पती सचिन राजपूत (रा. बागलकोट, कर्नाटक) हा आरोपी आहे. सचिन हा सैन्यातून बडतर्फ झालेला असून, त्याच्यावर कर्नाटकमध्ये पूर्वीचा एक गुन्हाही नोंद आहे.
नेमकं घडलं काय?
प्राथमिक माहितीनुसार, सचिन आणि शुभांगी हे देवदर्शनासाठी कोल्हापुरातील जोतिबाच्या डोंगरावर गेले होते. मात्र, दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद झाल्यानंतर सचिनने अज्ञातस्थळी पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून गळा चिरत तिची हत्या केली. पत्नीचा खून केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला आणि दुचाकीवरून थेट सोलापूरमधील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात येऊन आत्मसमर्पण केले.त्याने पोलिसांना संपूर्ण घटना सांगत पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यानंतर आरोपीला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे सोलापूर आणि कोल्हापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
चारित्र्याच्या संशयावरून वाद
दोघेही कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्याचे रहिवासी असून, देवदर्शनाच्या निमित्ताने कोल्हापूरला आले होते. मात्र, धार्मिक स्थळी जाण्याऐवजी त्यांच्यात चारित्र्यावरून वाद झाला. वाद वाढल्याने सचिनने जोतिबाच्या डोंगर परिसरात पत्नीला दुचाकीवरून एका अज्ञातस्थळी नेले आणि धारदार शस्त्राने गळा चिरून तिचा खून केला. खून केल्यानंतर तो कोल्हापुरातून दुचाकीवरून सोलापुरात आला आणि फौजदार चावडी पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. पोलिसांसमोर त्याने पत्नीच्या हत्येची कबुली दिली. यामुळे पोलीस दलातही एकच खळबळ उडाली.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
