Air India Plane Crash Ahmedabad: अहमदाबाद विमान अपघातात 169 भारतीयांसह तब्बल 61 परदेशी नागरिकांचा समावेश, एकट्या ब्रिटनचे 53 प्रवासी

Air India Plane Crash Ahmedabad: एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय-171 दुपारी 1.38 वाजता उड्डाण केले. दुपारी 1.40 वाजता ते कोसळले. विमान विमानतळाच्या भिंतीजवळ आणि एअर कस्टम कार्गो ऑफिसजवळ कोसळले. 

Continues below advertisement

Air India Plane Crash Ahmedabad: एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान अहमदाबादमध्ये कोसळल्याने मोठी जिवितहानी झाली आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत  50 जणांचे मृतदेह हाती लागले होते. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह 242 प्रवासी होते. प्रवाशांमध्ये 53 ब्रिटिश आणि 7 पोर्तुगीज नागरिक एक कॅनडाचा प्रवासी आहे. एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय-171 दुपारी 1.38 वाजता उड्डाण केले. दुपारी 1.40 वाजता ते कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, विमान विमानतळाच्या भिंतीजवळ आणि एअर कस्टम कार्गो ऑफिसजवळ कोसळले. 

Continues below advertisement

रुपाणी त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते

दरम्यान, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार विजय रुपाणी देखील या एअर इंडियाच्या विमानात होते. रुपाणी त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. रुपाणी यांच्याकडे बिझीनेस क्लासमधईल सीट क्रमांक 12 होता.

पायलटला 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता

दुसरीकडे, विमानाचे कॅप्टन सुमित सभरवाल होते. त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर होते. कॅप्टन सुमित सभरवाल हे एलटीसीमध्ये होते. त्यांना 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. सह-वैमानिकाला 1100 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. एलटीसी म्हणजे लाईन ट्रेनिंग कॅप्टन. हे अनुभवी वैमानिक आहेत जे इतर वैमानिकांना प्रशिक्षण देतात.

अहमदाबाद विमानतळावरील कामकाज सध्या बंद  

सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (एसव्हीपीआयए) प्रवक्त्यांनी सांगितले की विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर, विमानतळावरील कामकाज सध्या थांबवण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या ठिकाणी बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात येत आहे.

विमान ज्या इमारतीत धडकले ती निवासी डॉक्टरांची इमारत 

विमान ज्या इमारतीत धडकले ते निवासी डॉक्टरांचे आहे. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांच्या इमारतीवर विमान धडकल्याने 15 डॉक्टर जखमी झाले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »