'तुझी बायको खूप सुंदर आहे, लाईट बील कमी करायचं असल्यास माझ्याकडे एकटीला पाठवून दे, कमी करून देतो' शेतकऱ्याला वीज अभियंत्याची 'ऑफर'

संबंधित शेतकऱ्याने मुख्यमंत्री पोर्टलद्वारे मध्यांचल विद्युत विभागाच्या एमडीकडे तक्रार केली होती. 13 मार्च 2024 रोजी तपासणीदरम्यान जेई प्रदीप कुमार घरी पोहोचले होता.

Continues below advertisement

Offer to Bring Wife to Teduce Electricity Bill : लाईट बिल कमी करुन देण्याच्या बदल्यात पत्नीला आपल्याकडे घेऊन येण्याची ऑफर दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित शेतकऱ्याने वीज विभागाच्या जेई (कनिष्ठ अभियंता) वर गंभीर आरोप केले आहे. वीज बिल कमी करून देण्याच्या बदल्यात अभियंत्याने पत्नीला आणण्यास सांगितल्याचे त्याने म्हटले आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. मात्र, अभियंत्याने आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशमधील बाराबंकीमध्ये घडली आहे. संबंधित शेतकऱ्याने वीज बील कमी करण्यासाठी दिलेला अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Continues below advertisement

'बायको खूप सुंदर आहे'

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, हे संपूर्ण प्रकरण बाराबंकीच्या हैदरगढ तहसील भागातील लोनी कटरा पोलीस स्टेशन हद्दीतील शाहपूर शिदवी परिसरातील आहे. संबंधित शेतकऱ्याने मुख्यमंत्री पोर्टलद्वारे मध्यांचल विद्युत विभागाच्या एमडीकडे तक्रार केली होती. 13 मार्च 2024 रोजी तपासणीदरम्यान जेई प्रदीप कुमार घरी पोहोचले होता. त्यादरम्यान त्याची नजर शेतकऱ्याच्या पत्नीवर पडली. यानंतर अभियंता प्रदीप म्हणाला की, तुझी पत्नी खूप सुंदर आहे, तुझे वीज कमी करायचं असेल, तर तुझ्या पत्नीला माझ्याकडे घेऊन ये.  शेतकऱ्याने सांगितले की, काही दिवसांनी अचानक वीज बिल जास्त आले. त्याला 94 864 रुपये वीज बिल पाठवल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. वीज जोडणीवर चुकीचे रीडिंग देऊन जेईने जाणीवपूर्वक बिल वाढवले ​​आणि नंतर कनेक्शन तोडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर ते बिल दुरुस्त करण्यासाठी जेईकडे गेले असता त्याने पत्नीला घेऊन येण्याची ऑफर दिली.  

तुमच्या बायकोला आण, मग वीज बिल ठीक होईल

यानंतर ते काही दिवस वीज कार्यालयात गेले नाहीत. दरम्यान, 31 जानेवारी 2025 रोजी ते बिल दुरुस्त करण्यासाठी पुन्हा अभियंता कार्यालयात गेले. पण यावेळी पुन्हा जेईने आपल्या पूर्वीच्या मुद्याचा पुनरुच्चार केला आणि म्हटले, वीज बिलासाठी चकरा मारून शकला असशील, आता 40 हजार रुपये आणि तुमची पत्नी सोबत आणा, मग वीज बिल ठिक होईल. कनिष्ठ अभियंता प्रदीपने  हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या प्रकरणाची तक्रार अधिकाऱ्यांकडे केली असून आरोप खरे असतील तर पुरावे सादर करावेत, असे सांगितले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »