'सुरेश धसांचा दुटप्पीपणा पहा', सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणावरून विजय वडेट्टीवार आक्रमक, Video शेअर करत केले ट्विट

पोलिसांना फक्त सुनावलं म्हणून सोडून द्यायचं ?हा न्याय असू शकतो का ?असंही वडेट्टीवार म्हणालेत .

Continues below advertisement

Vijay Wadettivar:एकीकडे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सुरेश धस(Suresh Dhas) सहभागी होतात. आणि दुसरीकडे पोलिसांवर गुन्हे दाखल करू नका असं म्हणतात. भाजप आमदार पोलिसांना क्लीन चिट का देत आहेत? सोमनाथ सूर्यवंशीच्या (Somnath Suryavanshi) जीवाची किंमत नाही का? असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केलाय. भाजप आमदार सुरेश धस यांचा दुटप्पीपणा पहा असे म्हणत x समाज माध्यमावर त्यांनी ट्विट करत एक व्हिडिओ ही शेअर केला आहे. 

Continues below advertisement

या व्हिडिओमध्ये सुरेश धस, पोलिसांवर गुन्हे दाखल करणे संयुक्तिक ठरणार नाही. याप्रकरणी पोलिसांची कानउघडणी केली आहे त्यामुळे गुन्हेच दाखल करा अशी मागणी करू नका असं म्हणताना दिसतात .यावरूनच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुरेश धस दुटप्पी वागत असल्याचा आरोप केलाय .सुरेश धस यांना परभणी प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय का मिळू द्यायचं नाही ? असा सवाल ही त्यांनी केलाय .एका आईने आपला मुलगा आणि कुटुंबाने आधार गमावलाय .पोलिसांना फक्त सुनावलं म्हणून सोडून द्यायचं ?हा न्याय असू शकतो का ?असंही वडेट्टीवार म्हणालेत .

काय केलं ट्विट ?

हा व्हिडिओ बघा! भाजपचे आमदार सुरेश धस यांचा दुटप्पीपणा. एकीकडे सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या मोर्च्यात सुरेश धस सहभागी होतात. आणि दुसरीकडे म्हणतात की पोलिसांवर गुन्हे दाखल करू नका..भाजप आमदार पोलिसांना क्लिनचीट का देत आहे? सोमनाथ सुर्यवंशी यांच्या जीवाची किंमत नाही का? एका आईने आपला मुलगा आणि कुटुंबाने आधार गमावला आणि पोलिसांना फक्त सुनावलं म्हणून सोडून द्यायचे? हा न्याय असू शकतो का? सुरेश धस यांना परभणी प्रकरणात सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय का मिळू द्यायचा नाही ?

नेमके प्रकरण काय ?

परभणी हिंसाचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी च्या मृत्युने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती .पोलिसांच्या माणूस मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी चा मृत्यू झाला असा आरोप करण्यात आला होता .प्रशासनाकडून सोमनाथ चा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा करण्यात आला होता .मात्र काही दिवसातच आलेल्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून हा दावा खोटा ठरला .मारहाणीतूनच सोमनाथ सूर्यवंशी चा मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे राहिले .दरम्यान या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्यांसह दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची कारवाई केली .सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात  आंदोलकांनी 15 मागण्या केल्या आहेत .परभणी हिंसाचारात कोंबिंग ऑपरेशन करत आंदोलकांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांवर गुन्हे दाखल करत कारवाई करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे .

हेही वाचा:

Parbhani: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई, 3 पोलीस कर्मचारी निलंबित, आंदोलकांच्या 15 मागण्या काय?

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »