एक्स्प्लोर

बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील भाऊ राठोड हा वाळू माफिया अवैध रेती उपसा करायचा, त्यामधून मिळालेल्या पैशातून गळ्यात सोने आणि समोर पैसे ठेवून रिल्स बनवत दहशत पसरवत होता.

हिंगोली : सोशल मीडियावर विशेषत: इंस्टाग्रामवर रिल्स बनवून हवा करायची, आपल्या चांगल्या-वाईट कामाचं प्रमोशन करायचं आणि आपली समाजाच प्रतिमा तयार करायची, असं काम सध्या जोरात सुरू आहे. अनेकदा काही गुंड प्रवृत्तीचे लोक असे रील्स व्हायरल करुन समाजात आपली दहशत निर्माण करतानाही दिसून येतात. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याच्या शिरुर कासार येथील खोक्याभाई म्हणजे सतिश भोसलेचे असे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामध्ये, हा खोक्या नोटांचे बंडल हातातून फेकून देताना, पैसे उधळताना आणि हॅलिकॉप्टरची भरारी करताना दिसून आला होता. आता, पोलिसांनी या खोक्याभाईच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता, बीडनंतर हिंगोली जिल्ह्यातही अशाच एका भाईची भाईगिरी पोलिसांनी उतरवली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव येथील भाऊ राठोडचे असेच पैसे फेकतानाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला दणका दिला. त्यानंतर, त्याने हात जोडून माफी मागितली आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील भाऊ राठोड हा वाळू माफिया अवैध रेती उपसा करायचा, त्यामधून मिळालेल्या पैशातून गळ्यात सोने आणि समोर पैसे ठेवून रिल्स बनवत दहशत पसरवत होता. सोशल मीडियातून दहशत पसरवणाऱ्या भाऊ राठोडसोबत जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या सुद्धा बैठकी होत होत्या, याचेही व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे, या वाळू माफियाच्या दमदाटीला संतापून सेनगाव येथील नागरिकांनी हिंगोलीच्या पोलीस अधीक्षकांना भाऊ राठोडवर कारवाई करण्याचे निवेदन दिले होते. त्यानंतर हिंगोली पोलिसांनी या वाळू माफियाची चांगलीच मस्ती उतरवली आहे. पोलीस खाक्या दाखवताच दाखवत हा वाळू माफिया हात जोडून आता कोणतीही दादागिरी करणार नाही, असं सांगत आहे. तसेच, यानंतर गैर कायद्याचे सर्व काम सोडून देईल असही तो सांगत आहे. पोलिसांनी भाऊ रोठोडसह त्याच्या साथीदारालाही पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर, त्यानेही हात जोडून माफी मागितली आहे. तसेच, यापुढे कुठेही दादागिरी करणार नसल्याचं म्हटलं आहे. 

हात जोडून मागितली माफी

पोलिसांनी मला सूचना दिली असून मी कुठलीही दादागिरी करणार नाही, माझा वाळूचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो 2 वर्षांपूर्वीचा होता. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मी माझं ते काम सोडू देईल, असे म्हणत हिंगोलीतील या भाऊने हात जोडून माफी मागितली आहे. 

हेही वाचा

गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! ज्योतिबाच्या डोंगर परिसरात बायकोची गळा चिरून हत्या; पती कोल्हापुरातून थेट सोलापूर पोलीस ठाण्यात
शॉकिंग! ज्योतिबाच्या डोंगर परिसरात बायकोची गळा चिरून हत्या; पती कोल्हापुरातून थेट सोलापूर पोलीस ठाण्यात
Helicopter Emergency Landing : हेलिकॉप्टरचे चक्क रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग; मागचा भाग कारवर आदळला अन् पंखे थेट दुकानात घुसले
Video : हेलिकॉप्टरचे चक्क रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग; मागचा भाग कारवर आदळला अन् पंखे थेट दुकानात घुसले
Repo Rate :  गुड न्यूज,  आरबीआयनं रेपो रेट घटवताच, तीन मोठ्या बँकांनी व्याज दर घटवले, जाणून घ्या नवे दर 
 गुड न्यूज,  आरबीआयनं रेपो रेट घटवताच, तीन मोठ्या बँकांनी व्याज दर घटवले, जाणून घ्या नवे दर 
गोंडस मुलीला जन्म देताच 15 दिवस उपाशीपोटी डांबून शारीरिक छळ, तान्हुल्या बाळाला घेऊन माहेर गाठलं, IT इंजिनीयर पतीच्या विकृतीने बीड हादरलं
गोंडस मुलीला जन्म देताच 15 दिवस उपाशीपोटी डांबून शारीरिक छळ, तान्हुल्या बाळाला घेऊन माहेर गाठलं, IT इंजिनीयर पतीच्या विकृतीने बीड हादरलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pimpari Chinchwad Water Logging : हिंजवडी आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरुप, सखल भागात पाणीRaigad Rain Update : रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, उरणमध्ये रस्त्यांना नद्यांचं रुपYashwant Killedar : संपूर्ण बैठकीत युतीच्या विषयावर एक शब्दही काढला नाही, किल्लेदारांचा हल्लाबोलYashawant Killedar on Yuti  : युतीच्या चर्चा फक्त माध्यमात, प्रत्यक्षात कोणतीच चर्चा नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! ज्योतिबाच्या डोंगर परिसरात बायकोची गळा चिरून हत्या; पती कोल्हापुरातून थेट सोलापूर पोलीस ठाण्यात
शॉकिंग! ज्योतिबाच्या डोंगर परिसरात बायकोची गळा चिरून हत्या; पती कोल्हापुरातून थेट सोलापूर पोलीस ठाण्यात
Helicopter Emergency Landing : हेलिकॉप्टरचे चक्क रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग; मागचा भाग कारवर आदळला अन् पंखे थेट दुकानात घुसले
Video : हेलिकॉप्टरचे चक्क रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग; मागचा भाग कारवर आदळला अन् पंखे थेट दुकानात घुसले
Repo Rate :  गुड न्यूज,  आरबीआयनं रेपो रेट घटवताच, तीन मोठ्या बँकांनी व्याज दर घटवले, जाणून घ्या नवे दर 
 गुड न्यूज,  आरबीआयनं रेपो रेट घटवताच, तीन मोठ्या बँकांनी व्याज दर घटवले, जाणून घ्या नवे दर 
गोंडस मुलीला जन्म देताच 15 दिवस उपाशीपोटी डांबून शारीरिक छळ, तान्हुल्या बाळाला घेऊन माहेर गाठलं, IT इंजिनीयर पतीच्या विकृतीने बीड हादरलं
गोंडस मुलीला जन्म देताच 15 दिवस उपाशीपोटी डांबून शारीरिक छळ, तान्हुल्या बाळाला घेऊन माहेर गाठलं, IT इंजिनीयर पतीच्या विकृतीने बीड हादरलं
Pune Rain Update : धुव्वाधार पावसाने हिंजवडीतील आयटीवाल्यांची उडाली दाणादाण; 10 मिनिटात रस्ते पाण्याखाली, गाड्या ढकलत नेण्याची वेळ, पाहा PHOTOS
धुव्वाधार पावसाने हिंजवडीतील आयटीवाल्यांची उडाली दाणादाण; 10 मिनिटात रस्ते पाण्याखाली, गाड्या ढकलत नेण्याची वेळ, पाहा PHOTOS
मोठी बातमी : राज-उद्धव एकत्र या, शिंदेंची शिवसेना ही भाजपप्रणित, गजानन किर्तीकरांची 5 मोठी वक्तव्य!
मोठी बातमी : राज-उद्धव एकत्र या, शिंदेंची शिवसेना ही भाजपप्रणित, गजानन किर्तीकरांची 5 मोठी वक्तव्य!
DigiPIN : आधी तार, आता 'पिन कोड' कालबाह्य, ‘DigiPIN’ चा वापर करावा लागणार; कसा शोधाल तुमचा डिजीपिन?
आधी तार, आता 'पिन कोड' कालबाह्य, ‘DigiPIN’ चा वापर करावा लागणार; कसा शोधाल तुमचा डिजीपिन?
Stock Market : संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या स्टॉकनं पैशांचा पाऊस पाडला, गेल्या 5 महिन्यात गुंतवणूकदार मालामाल
संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांंमुळं गुंतवणूकदारांची तिजोरी भरली, गेल्या 5 महिन्यातील रिटर्नमध्ये निफ्टी 50 ला मागं टाकलं
Embed widget
OSZAR »