माझ्या भावाला पोलिसांनी सुपारी घेऊन मारलं, आरोपीच्या बहिणीचा गंभीर आरोप, वाळूजच्या संतोष लड्डा दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज परिसरातील उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरी काही दिवसांपूर्वी दरोडा पडला होता. यात साडेपाच किलो सोनं 32 किलो चांदी आणि 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

Continues below advertisement

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी मोठा दरोडा पडला होता. या दरोडाच्या घटनेत संशयित असलेल्या एका आरोपीचा पुणे शाखेच्या पथकाने एन्काऊंटर केलाय. या दरोड्यात साडेपाच किलो सोनं 32 किलो चांदी आणि 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील अमोल खोतकर या संशयीत आरोपीवर पोलिसांनी गोळी चालवली.  सोमवारी रात्री झालेल्या या घटनेवर संशयित आरोपी अमोल खोतकर यांच्या बहिणीने गंभीर आरोप केले असून पोलिसांनी सुपारी घेऊन माझ्या भावाला मारलं असा दावा बहिण रोहिणी खोतकर हिने केलाय.  त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळच वळण आलं. आता या संपूर्ण कारवाईवर पोलिसांवर संशयाची सुई आहे.

Continues below advertisement

नेमकी प्रकरण काय? 

छत्रपती संभाजीनगर मध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या दरोडाच्या घटनेत संशयीत आरोपी अमोल खोतकर यांनी गोळीबार करून पळण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात्मक गोळीबारात त्याचा मृत्यू झाला असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.  संशयीत आरोपी अमोल खोतकर आपल्या गर्लफ्रेंड सह एका हॉटेलमध्ये येत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानंतर ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री अकरा वाजता खोतकर वडगाव कोल्हाटी येथे हसबे यांच्या हॉटेल जवळ कार घेऊन आला असता पोलिसांना समोर पाहताच त्याने गोळी झाडली. कार वेगात चालवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एसपीआय रविकिरण गच्चे यांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार करत खोतकरचा एन्काऊंटर केला असे सांगण्यात आले. 

आरोपीच्या बहिणीचा गंभीर आरोप

दरम्यान आज पहाटे पाचच्या सुमारास 15 ते 20 पोलीस आमच्या घरी आले. त्यांनी सगळं सामान अस्ताव्यस्त केलं. भाऊ अमोल खोतकर किरकोळ जखमी झालाय त्याला घाटीत दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितलं. पण सर्व वॉर्ड तपासल्यानंतर तो शवविच्छेदन गृहात असल्याचं आम्हाला कळालं. माझा भाऊ गुन्हेगार नव्हता तो व्यवसायिक होता वाळूज परिसरात त्याचे हॉटेल होते. पोलिसांनी त्याला सुपारी घेऊन ठार केला आहे. असा गंभीर आरोप रोहिणी खोतकर या आरोपीच्या बहिणीने पोलिसांवर केलाय.  या घटनेचा सीसीटीव्ही  व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. 

छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज परिसरातील उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरी काही दिवसांपूर्वी दरोडा पडला होता. दरोड्यातील मुद्देमालाबाबत अधिकृत कागदपत्रे अजूनही पोलिसांनी आयकर विभागाला कळवलेली नाहीत. पोलिसांनी आयकर विभागाला अजून का सहभागी केले नाही? असं सवाल उपस्थित होतोय. दरम्यान या प्रकरणात आरोपीच्या बहिणीने केलेल्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सुपारी घेऊन भावाला संपवल्याचा आरोप रोहिणी खोतकर हिने केलाय. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण आले आहे.

 

हेही वाचा:

आदित्य ठाकरे, तू मोदी, शाह, फडणवीस यांची नावं घेतलीस तर याद राख, नारायण राणे यांचा दम

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »