एक्स्प्लोर

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार, बांधावरील झाडं तोडण्यास विरोध केला म्हणून महिलेसह कुटुंबीयांना बेदम मारहाण, आरोपी फरार

Beed Crime : शेताच्या बांधावरील झाडं तोडण्यास विरोध केल्याने एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार बीडमध्ये घडला आहे.

Beed Crime : केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या (Santosh Deshmukh Murder Case) करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर बीड (Beed News) जिल्हा राज्यभरात चर्चेत आला आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसताना दिसत नाही. चोरी, घरफोडी, मारामारी, बलात्कार, छेडछाड आणि लुटमारी यांसारख्या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या काही महिन्यात बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. आता पुन्हा एकदा बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेताच्या बांधावरील झाडं तोडण्यास विरोध केल्याने एका महिलेवर आणि तिच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार वडवणी तालुक्यात घडला आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देवळा ते कोरडे वस्ती दरम्यान पायवाटेवर असलेल्या शेताच्या बांधावरील तब्बल 80-90 वर्षे जुनी लिंबाची झाडं तोडली जात होती. महिलेनं हे झाड तोडण्याबाबत जाब विचारताच, तिला मारहाण करण्यात आली. यावेळी तिचे पती, सासू-सासरे आणि इतर कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले.

आरोपी फरार

यानंतर त्यांनादेखील काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपी बालकृष्ण शिंदे याच्यासह 16  जणांविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कावर चाललेली बळजबरी आणि महिलांवरील हिंसाचाराचा हा प्रकार संतापजनक असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या फरार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. 

बीडमध्ये पैशांसाठी एकाचे अपहरण

दरम्यान, बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात केवळ 10 हजार रुपयांच्या उसनवारीवरून तब्बल 80 हजार रुपयांची बळजबरीने वसुली करत एका तरुणाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (दि. 19) सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेत आरोपींनी पीडित तरुणाच्या आईला 'मुलगा जिवंत पाहिजे असेल, तर 50 हजार रुपये पाठवा, नाहीतर त्याला पुन्हा कधीही पाहता येणार नाही,' थेट फोन करून धमकी दिली. अपहरण झालेल्या तरुणाचे नाव कृष्णा मैंद असून, काही महिन्यांपूर्वी त्याने धनराज चाटे, पृथ्वीराज राग आणि परमेश्वर आगाव यांच्याकडून 10 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, आरोपींनी या रकमेवर दिवसाला 1 हजार रुपयांचे अवास्तव व्याज आकारले होते. या हिशोबाने एकूण रक्कम 80 हजार रुपयांवर गेली. रक्कम वसूल करण्याच्या उद्देशाने आरोपींनी कृष्णाचे अपहरण केले आणि त्यानंतर त्याच्या आईकडून 50 हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास मुलाला सोडणार नाही, अशी थेट धमकीही दिली. घाबरलेल्या आईने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. धारूर पोलिसांनी तातडीने तपास करत अंबाजोगाईजवळील साकुर गावातून दोघा आरोपींना अटक केली आहे. उर्वरित दोघे अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

आणखी वाचा

Beed Bribe News : जलसिंचन विहिरीच्या प्रस्तावासाठी लाच घेणं भोवलं, बीडमधील सरपंच एसीबीच्या जाळ्यात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना; सक्तीच्या हिंदीकरणाची मराठी लेखकाकडून चिरफाड
पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना; सक्तीच्या हिंदीकरणाची मराठी लेखकाकडून चिरफाड
Nashik News : महिलेच्या पोटात बाळ, प्रसुतीकळा सुरु झाल्या पण डॉक्टर दारूच्या नशेत झिंगाट, नाशिकमधील धक्कादायक प्रकार
महिलेच्या पोटात बाळ, प्रसुतीकळा सुरु झाल्या पण डॉक्टर दारूच्या नशेत झिंगाट, नाशिकमधील धक्कादायक प्रकार
US attacks on Iran: अमेरिकेचा हल्ला होताच इराणच्या मदतीला पहिला मुस्लीम देश उतरला; थेट लाल समुद्रात दोन हात करण्याची दिली धमकी
अमेरिकेचा हल्ला होताच इराणच्या मदतीला पहिला मुस्लीम देश उतरला; थेट लाल समुद्रात दोन हात करण्याची दिली धमकी
Jitendra Awhad on Sachin Pilgaonkar : सचिन पिळगांवकरांनी डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवावी हे पचनी पडतच नाही; 'कितने आदमी थे' डायलॉगच्या दाव्यावरून जितेंद्र आव्हाडांनी डिवचलं
सचिन पिळगांवकरांनी डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवावी हे पचनी पडतच नाही; 'कितने आदमी थे' डायलॉगच्या दाव्यावरून जितेंद्र आव्हाडांनी डिवचलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pandharpur Cycle Ringan Sohala : पंढरपुरात सायकल स्वारांचा रिंगण सोहळा, रक्षा खडसेंची खास उपस्थिती
Bharat Gogawale On Mahayuti : रायगड जिल्ह्यात महायुतीला अपवाद असू शकतो, गोगावलेंचं मोठं वक्तव्य
MNS Banner on Hindi Compulsion : काय सालं सरकार आहे!मराठी लोकांना हिंदी सक्ती करतंय, मनसेची बॅनरबाजी
Shahajibapu Patil : संजय राऊतांनाही गुवाहाटीला यायचं होतं पण..शहाजीबापूंचा गौप्यस्फोट
ABP Majha Headlines : 09:00 AM : 22 June 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना; सक्तीच्या हिंदीकरणाची मराठी लेखकाकडून चिरफाड
पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना; सक्तीच्या हिंदीकरणाची मराठी लेखकाकडून चिरफाड
Nashik News : महिलेच्या पोटात बाळ, प्रसुतीकळा सुरु झाल्या पण डॉक्टर दारूच्या नशेत झिंगाट, नाशिकमधील धक्कादायक प्रकार
महिलेच्या पोटात बाळ, प्रसुतीकळा सुरु झाल्या पण डॉक्टर दारूच्या नशेत झिंगाट, नाशिकमधील धक्कादायक प्रकार
US attacks on Iran: अमेरिकेचा हल्ला होताच इराणच्या मदतीला पहिला मुस्लीम देश उतरला; थेट लाल समुद्रात दोन हात करण्याची दिली धमकी
अमेरिकेचा हल्ला होताच इराणच्या मदतीला पहिला मुस्लीम देश उतरला; थेट लाल समुद्रात दोन हात करण्याची दिली धमकी
Jitendra Awhad on Sachin Pilgaonkar : सचिन पिळगांवकरांनी डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवावी हे पचनी पडतच नाही; 'कितने आदमी थे' डायलॉगच्या दाव्यावरून जितेंद्र आव्हाडांनी डिवचलं
सचिन पिळगांवकरांनी डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवावी हे पचनी पडतच नाही; 'कितने आदमी थे' डायलॉगच्या दाव्यावरून जितेंद्र आव्हाडांनी डिवचलं
Iran vs Israel War: अमेरिकेच्या हल्ल्याने संतापलेल्या इराणचा प्रतिहल्ला, इस्रायलमध्ये सायरनचा आवाज, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं
अमेरिकेच्या हल्ल्याने संतापलेल्या इराणचा प्रतिहल्ला, इस्रायलमध्ये सायरनचा आवाज, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं
US attacks on Iran: शांततेच्या नोबेलसाठी 'बालहट्ट' लावलेल्या डोनाल्ड ट्रम्पना 'इराणी जुगार' देशात अन् परदेशातही महागात पडणार?
शांततेच्या नोबेलसाठी 'बालहट्ट' लावलेल्या डोनाल्ड ट्रम्पना 'इराणी जुगार' देशात अन् परदेशातही महागात पडणार?
US attacks on Iran : अमेरिकेला आता अभूतपूर्व प्रत्युत्तर मिळेल, कधी झालं नाही असं नुकसान होईल; इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा थेट इशारा
अमेरिकेला आता अभूतपूर्व प्रत्युत्तर मिळेल, कधी झालं नाही असं नुकसान होईल; इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा थेट इशारा
US attacks on Iran: ट्रम्पनी दोन आठवडे हात झटकले अन् आता काही तासातच अमेरिकेचा इराणच्या आण्विक तळांवर हल्ला; आतापर्यंत काय काय घडलं?
ट्रम्पनी दोन आठवडे हात झटकले अन् आता काही तासातच अमेरिकेचा इराणच्या आण्विक तळांवर हल्ला; आतापर्यंत काय काय घडलं?
Embed widget
OSZAR »