एक्स्प्लोर

Beed Crime : माझ्या मुलाला लाथा बुक्क्यांनी, केस धरून मारहाण, शिवराज दिवटेच मुख्य आरोपी; समाधान मुंडेच्या आईचा खळबळजनक दावा

Beed Crime : माझ्या मुलावर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, जी कारवाई झाली तीच कारवाई त्यांच्यावर देखील दाखल व्हावी, अशी मागणी समाधान मुंडेच्या आईने केली आहे.

Beed Crime : बीडच्या परळी (Parli) येथे शिवराज दिवटे (Shivraj Divate) या तरुणाला समाधान मुंडेच्या (Samadhan Munde) गँगकडून अमानुष मारहाण करण्यात आली होती. टोळक्याकडून आधी शिवराज याचं अपहरण करण्यात आलं, त्यानंतर त्याला रत्नेश्वर डोंगरावर नेऊन बेदम मारहाण करण्यात आली, बांबू आणि काठीनं मारहाण करण्यात आली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दिवटेला मारहाण करणारा समाधान मुंडे या तरुणाला आधी बेदम मारहाण झाली होती. त्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. आधी मारहाण झाल्याने बदला घेण्यासाठीच शिवराज दिवटेला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे आता या प्रकरणात  नवा ट्विस्ट समोर आला आहे. आता समाधान मुंडेच्या आईने माझ्या मुलाला मारहाण करणारा शिवराज दिवटेच असल्याचा दावा केला आहे. 

समाधान मुंडेच्या आईने म्हटले आहे की, माझा मुलगा गाडीवरून जात असताना त्याच्या गाडीची चावी घेऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली. माझ्या मुलावर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, जी कारवाई झाली तीच कारवाई त्यांच्यावर देखील दाखल व्हावी, अशी मागणी समाधान मुंडेच्या आईने केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा शिवराज दिवटे आहे, असा दावा देखील समाधान मुंडेच्या आईने केला आहे.  

माझ्या मुलाने याची तक्रार द्यायला पाहिजे होती

माझ्या मुलाला लाथा बुक्क्यांनी केस धरून मारहाण करण्यात आली. यावेळी शिवराज दिवटे हा देखील मारायला होता. या मारहाणीनंतर माझ्या मुलाने त्याला मारहाण केली. माझ्या मुलाने याची तक्रार द्यायला पाहिजे होती, हेच त्याचे चुकले. माझ्या मुलाला मारहाण करणारे सगळे मोठे माणसं आहेत. याबाबत मी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यांना अटक करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. 

नेमकं काय घडलं होतं? 

दरम्यान,  परळीतील जलालपूर येथे जमावाकडून समाधान मुंडे व ऋषिकेश गिरी यांना मारहाण करण्याची घडली होती, या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात भागवत साबळे व सुरेश साबळे याच्या विरोधात समाधान याच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान मुंडे हा ऋषिकेश गिरी याला सोडण्यासाठी मोटरसायकलवरून जात असताना जलालपूर येथे चौकामध्ये भागवत साबळे व सुरेश साबळे यांच्यासह इतर सात ते आठ जणांनी त्यांना अडवून जीवे मारण्याच्या उद्देशाने काठी लाथा बुक्क्या व बेल्टने मारहाण केल्याची या तक्रारीत म्हटले आहे. आता या प्रकरणाचा अधिकचा तपास परळी शहर पोलीस करत आहेत. 

आणखी वाचा 

Jyoti Malhotra: ज्योती मल्होत्राने घरात लिहून ठेवली होती चिठ्ठी; शेवटी 'Love You अन् खुश-मुश', पोलिसांना काय मिळालं?

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli News : मिरज एमआयडीसीमध्ये मध्यरात्री एकाला भोसकून संपवलं; आरोपी फरार, परिसरात खळबळ
मिरज एमआयडीसीमध्ये मध्यरात्री एकाला भोसकून संपवलं; आरोपी फरार, परिसरात खळबळ
Mumbai Rain Updates : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, मंत्रालयाबाहेर साचलं गुडघाभर पाणी, पाहा PHOTOS
मुंबईत पावसाचा धुमाकूळ, मंत्रालयाबाहेर साचलं गुडघाभर पाणी, पाहा PHOTOS
Mumbai Rain Updates: पहिल्याच पावसाने मुंबई तुंबली, थोड्याचवेळात समुद्राला भरती,  बीएमसीच्या युद्धपातळीवर हालचाली
पहिल्याच पावसाने मुंबई तुंबली, थोड्याचवेळात समुद्राला भरती, बीएमसीच्या युद्धपातळीवर हालचाली
Raigad Rain News : रायगड किल्ल्याच्या परिसरात मुसळधार पाऊस, धबधब्यातून वेगाने खाली येणाऱ्या पाण्यामुळे रस्ता खचला
रायगड किल्ल्याच्या परिसरात मुसळधार पाऊस, धबधब्यातून वेगाने खाली येणाऱ्या पाण्यामुळे रस्ता खचला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jyoti Mete : ...तर वैष्णवीनं आत्महत्या केली नसती! हगवणे प्रकरणावर ज्योती मेटेंचं वक्तव्य ABP MAJHAMonsoon Prediction For Farmers : मान्सून वेळेआधीच दाखल,पेरणी कधी करावी? हवामान तज्ज्ञांचा सल्ला काय?Nashik Rain : नाशकात वादळी वाऱ्यासह पाऊस, बस टर्मिनलचं शेड कोसळलं... ABP MAJHAABP Majha Headlines 10 PM TOP Headlines 26 May 2025 सकाळी 10 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : मिरज एमआयडीसीमध्ये मध्यरात्री एकाला भोसकून संपवलं; आरोपी फरार, परिसरात खळबळ
मिरज एमआयडीसीमध्ये मध्यरात्री एकाला भोसकून संपवलं; आरोपी फरार, परिसरात खळबळ
Mumbai Rain Updates : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, मंत्रालयाबाहेर साचलं गुडघाभर पाणी, पाहा PHOTOS
मुंबईत पावसाचा धुमाकूळ, मंत्रालयाबाहेर साचलं गुडघाभर पाणी, पाहा PHOTOS
Mumbai Rain Updates: पहिल्याच पावसाने मुंबई तुंबली, थोड्याचवेळात समुद्राला भरती,  बीएमसीच्या युद्धपातळीवर हालचाली
पहिल्याच पावसाने मुंबई तुंबली, थोड्याचवेळात समुद्राला भरती, बीएमसीच्या युद्धपातळीवर हालचाली
Raigad Rain News : रायगड किल्ल्याच्या परिसरात मुसळधार पाऊस, धबधब्यातून वेगाने खाली येणाऱ्या पाण्यामुळे रस्ता खचला
रायगड किल्ल्याच्या परिसरात मुसळधार पाऊस, धबधब्यातून वेगाने खाली येणाऱ्या पाण्यामुळे रस्ता खचला
Russia-Ukraine war : रशियाचा युक्रेनवर गेल्या तीन वर्षातील सर्वात मोठा अन् भयावह हल्ला; डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, मला माहीत नाही पुतीनना काय झालंय
रशियाचा युक्रेनवर गेल्या तीन वर्षातील सर्वात मोठा अन् भयावह हल्ला; डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, मला माहीत नाही पुतीनना काय झालंय
Israel bombs on Gaza school : इस्रायलचा गाझामध्ये नरसंहार सुरुच, बालवाडी शाळेवर केलेल्या हल्ल्यात 25 जण जिवंत जळाले; 70 टक्के इमारती उद्ध्वस्त, 19 लाख रस्त्यावर, 55 हजार गतप्राण, हजारो अजूनही ढिगाऱ्याखाली
इस्रायलचा गाझामध्ये नरसंहार सुरुच, बालवाडी शाळेवर केलेल्या हल्ल्यात 25 जण जिवंत जळाले; 70 टक्के इमारती उद्ध्वस्त, 19 लाख रस्त्यावर, 55 हजार गतप्राण, हजारो अजूनही ढिगाऱ्याखाली
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान! रेल्वे ट्रॅक अन् रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात, मशीद बंदर स्टेशनचं वॉटरपार्क झालं
ऑफिसला जाताय, विचार करुन घराबाहेर पडा! मस्जिद बंदर रेल्वेस्टेशनचं वॉटरपार्क झालं
लवकरच मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, कृषी विभागाचं आवाहन
लवकरच मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, कृषी विभागाचं आवाहन
Embed widget
OSZAR »