मुलांना वारंवार उलट्या, डोकेदुखी, संवाद साधण्यास अडचण होत असेल तर वेळीच लक्ष द्या, ही ब्रेन ट्यूमरची सुरुवात असू शकते, डॉक्टर सांगतात...

ब्रेन ट्यूमर लहान मुलांसह सर्व वयोगटातील लोकांमध्ये उच्च विकृती आणि वाढत्या मृत्युदरास कारणीभूत ठरते.

Continues below advertisement

Brain Tumer in Children: जेव्हा एखाद्या मुलाला ब्रेन ट्यूमरचे निदान होते तेव्हा वेळीच उपचार केल्यास त्याचा अमूल्य जीव वाचविता येतो. विलंब न करता मुलांमधील ही धोक्याची लक्षणे ओळखणे आणि त्वरित उपचार सुरू करणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत जागरुक राहण्याची आवश्यकता आहे. ब्रेन ट्यूमर ही मेंदूतील असामान्य पेशींची वाढ आहे आणि ती कर्करोगजन्य असू शकते. प्रौढांप्रमाणेच, मुलांमध्ये ब्रेन ट्यूमर देखील एक सामान्यपणे आढळून येणारा आजार आहे. हे खरंय की ब्रेन ट्यूमर लहान मुलांसह सर्व वयोगटातील लोकांमध्ये उच्च विकृती आणि वाढत्या मृत्युदरास कारणीभूत ठरते. मात्र वेळीच निदान आणि उपचार मुलांना त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. पालकांनी मुलांमधील ब्रेन ट्युमरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरीत वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनच्या पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिजी चालीपट यांनी दिलाय.

Continues below advertisement

मुलांमध्ये ब्रेन ट्यूमरची चिन्हे आणि लक्षणे

  • उलट्या होणे : जरी ही लक्षणे फ्लूसारख्या सामान्य आजारांच्या लक्षणांसारखीच असली तरी सततची समस्या विशेषतः डोकेदुखी,  हे ब्रेन ट्यूमरमुळे डोक्याच्या आत वाढलेला दाबामुळे (ज्याला इंट्राक्रॅनियल प्रेशर असेही म्हणतात) उद्भवते.
  • सततची डोकेदुखी: ब्रेन ट्यूमर असलेल्या मुलांना अनेकदा दीर्घकालीन डोकेदुखीची समस्या उद्भवते. विशेषतः जर ती सकाळच्या वेळी जास्त प्रमाणात वाढली तर वेळ न दवडता त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.
  • संवाद साधण्यात अडचण, दृष्टी आणि श्रवण क्षमता मंदावणे: ट्यूमरच्या स्थानानुसार, मुलांना विविध संवाद साधण्यात समस्या येणे,  दृष्टी किंवा श्रवणशक्ती कमी होणे अशा काही समस्या आढळून येऊ शकतात. पालकांनी अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • संतुलन साधण्यात समस्या: ब्रेन स्टेम जवळील ट्यूमर शरीराच्या संतुलन यंत्रणेत व्यत्यय आणू शकतात, ज्यामुळे प्रभावित मुलांना समन्वय साधण्यात अडचणी आणि असंतुलन यासारख्या समस्या उद्भवतात.
  • वर्तणुकीतील बदल: मुलाच्या वर्तनात कोणतेही लक्षणीय बदल, जसे की मूड स्विंग, दैनंदिन क्रिया टाळणे, चिडचिडेपणा किंवा आक्रमक होणे अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकिय सल्ला घेऊन योग्य तपासणी करणे गरजेचे आहे.
  • आकडी येणे : मेंदूच्या गाठी, विशेषतः मेंदूच्या पृष्ठभागावर असल्यास बाधित मुलांमध्ये आकडीची समस्या उद्भवू शकते. झटक्याचे मूळ कारण निश्चित करण्यासाठी आणि योग्य उपचार सुरू करण्यासाठी योग्य मूल्यांकन आवश्यक आहे.

उपचार काय?

मेंदूचे एमआरआय किंवा सीटी ब्रेन स्कॅन मुलांमध्ये मेंदूच्या गाठी शोधण्यास मदत करतात. उपचार हे ट्यूमरचा प्रकार, आकार आणि स्थानानुसार बदलतात आणि त्यात शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपीचा समावेश असू शकतो. संभाव्य लक्षणे ओळखण्यात आणि त्यांना प्रतिसाद देण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची असते, जेणेकरून त्यांच्या मुलाला वेळीच वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्यांचे जीवनमान सुधारु शकते.

हेही वाचा

Olive Oil : ऑलिव्ह ऑईल केसांसाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या!

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »