एक्स्प्लोर

Virat Kohli First Crush Actress: अनुष्का नाही, 'या' अभिनेत्रीवर भाळलेला रन मशीन विराट कोहली; नाव माहितीय?

Virat Kohli First Crush Actress: स्टार क्रिकेटर विराट कोहलीचं ज्या बॉलिवूड अभिनेत्रीवर क्रश होतं, ती आता दोन मुलांची आई आणि माजी मुख्यमंत्र्यांची सून आहे.

Virat Kohli First Crush Actress: टीम इंडियाची (Team India) रन मशीन स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची (Virat Kohli) किर्ती अख्खा जगभरात पसरली आहे. जगातील स्टार क्रिकेटपटूंपैकी आघाडीच्या काही नावांमध्ये विराट कोहलीचं नाव दिमाखात घेतलं जातं. विराटनं बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) अनुष्कासोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. चाहत्यांचं आवडतं सेलिब्रिटी कपल म्हणजे, विरुष्का. दोघांना आता दोन गोंडस मुलंही आहे. चाहत्यांच्या दृष्टीनं एकदम आयडीयल कपल म्हणून विराट-अनुष्काकडे पाहिलं जातं. पण, तुम्हाला माहिती आहे का? अनुष्का शर्माच्या आधी विराटचे हृदय दुसऱ्याच एका बॉलिवूड अभिनेत्रीसाठी धडधडत होतं. ती अभिनेत्री कोण? हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच, जाणून घेऊयात सविस्तर... 

विराट कोहली ज्या अभिनेत्रीवर भाळला होता, आज ती एका अभिनेत्याची पत्नी आणि महाराष्ट्राच्या माजी दिवंगत मुख्यमंत्र्यांची सून आहे. विराटला आवडणारी ती बॉलिवूड अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून अभिनेता रितेश देशमुखची स्टार पत्नी जेनिलिया डिसूझा आहे. 

जेनिलियावर भाळलेला विराट कोहली 

विराट कोहली जेनिलिया डिसूझावर भाळलेला, हे आम्ही नाहीतर स्वतः विराट कोहलीनं उघड केलं होतं. एका मुलाखतीच्या व्हिडीओमध्ये बोलताना विराट कोहलीनं स्वतः याबाबत खुलासा केला होता. मुलाखतीत विराट कोहलीला विचारण्यात आलं की, त्याला कोणत्या अभिनेत्रीला क्रिकेट खेळताना पाहायला आवडेल? पण, लाजून, फिरवून उत्तर देईल तो विराट कसला. 

विराटनं कोणताही संकोच न बाळगता, कोणताही मागचा-पुढचा विचार न करता थेट जेनिलिया डिसूझाचं नाव सांगितलं. बरं विराट एवढ्यावर थांबला नाही, जेनिलिया खूपच क्युट आहे, असंही तो म्हणालेला. विराटच्या या बोलण्यानंतर विराटच्या मनात जेनिलिया असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. आज दोघांनीही आपापले संसार थाटले आहेत. दोघांनाही मुलं आहेत. पण, त्यावेळी मात्र, जेनेलिया विराटच्या दिलाची धडकन होती, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जेनिलियानं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा मुलगा आणि बॉलिवूड स्टार रितेश देशमुखसोबत 2012 मध्ये आपली लग्नगाठ बांधली. तर, 2017 मध्ये विराटनं अनुष्काशी लग्न केलं. 

दरम्यान, जेनिलियाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, ती आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर पुनरागमन करतेय. हा चित्रपट आज, म्हणजेच 20 जून रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जेनिलिया एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी जेनिलिया 'ट्रायल पीरियड' (2023) या चित्रपटात दिसली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'जब वी मेट'मधली करीनाची बहीण, 18 वर्षांनी इंडस्ट्रीची टॉप हिरोईन; आज थेट ऐश्वर्या रायसोबत तुलना, शाहीद कपूरच्या मागे असलेल्या सुपरस्टारला ओळखता का?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NASA Axiom Mission: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लांचे अंतराळ मिशन पाचव्यांदा पुढे ढकलले; शुभांशू आयएसएसमध्ये जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लांचे अंतराळ मिशन पाचव्यांदा पुढे ढकलले; शुभांशू आयएसएसमध्ये जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील
Iran-Israel Conflict: मिसाईलचा वार पलटवार सुरुच; इराणकडून इस्त्रायली न्यूज चॅनेल टार्गेट, थेट आयटी हब असलेल्या शहरातही इराणी बॅलेस्टीक मिसाईलचा आगडोंब
मिसाईलचा वार पलटवार सुरुच; इराणकडून इस्त्रायली न्यूज चॅनेल टार्गेट, थेट आयटी हब असलेल्या शहरातही इराणी बॅलेस्टीक मिसाईलचा आगडोंब
Nashik News : ऐन पावसाळ्यात नाशिककरांवर जलसंकट, उद्या संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद, नेमकं कारण काय?
ऐन पावसाळ्यात नाशिककरांवर जलसंकट, उद्या संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद, नेमकं कारण काय?
Bharat Gogawale : भरत गोगावलेंच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अंनिसची तीव्र नाराजी; म्हणाले, अंधश्रद्धेला...
भरत गोगावलेंच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अंनिसची तीव्र नाराजी; म्हणाले, अंधश्रद्धेला...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Karuna Sharma Divorce Update: करुणा शर्मांच्या पोटगीतील 50 टक्के रक्कम जमा करण्याचे आदेश
Amol Mitkari on Ajit pawar: अजितदादांनाही  विठुरायाच्या शासकीय पूजेचा मान मिळू दे, मिटकरींचं साकडं
Alandi Pandharpur Wari 2025 : माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान;मुख्य मंदिरात अलोट गर्दी
Uddhav Thackeray on Nitesh Rane : तुझी उंची किती, आवाज कसा, उद्धव ठाकरेंची नितेश राणेंवर टीका
Jyoti Waghmare Speech : महाराष्ट्राने तुमची माती केली, ठाकरेंवर टीका, ज्योती वाघमारेंचं आक्रमक भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NASA Axiom Mission: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लांचे अंतराळ मिशन पाचव्यांदा पुढे ढकलले; शुभांशू आयएसएसमध्ये जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लांचे अंतराळ मिशन पाचव्यांदा पुढे ढकलले; शुभांशू आयएसएसमध्ये जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील
Iran-Israel Conflict: मिसाईलचा वार पलटवार सुरुच; इराणकडून इस्त्रायली न्यूज चॅनेल टार्गेट, थेट आयटी हब असलेल्या शहरातही इराणी बॅलेस्टीक मिसाईलचा आगडोंब
मिसाईलचा वार पलटवार सुरुच; इराणकडून इस्त्रायली न्यूज चॅनेल टार्गेट, थेट आयटी हब असलेल्या शहरातही इराणी बॅलेस्टीक मिसाईलचा आगडोंब
Nashik News : ऐन पावसाळ्यात नाशिककरांवर जलसंकट, उद्या संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद, नेमकं कारण काय?
ऐन पावसाळ्यात नाशिककरांवर जलसंकट, उद्या संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद, नेमकं कारण काय?
Bharat Gogawale : भरत गोगावलेंच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अंनिसची तीव्र नाराजी; म्हणाले, अंधश्रद्धेला...
भरत गोगावलेंच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अंनिसची तीव्र नाराजी; म्हणाले, अंधश्रद्धेला...
उंची पेग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, डोळे कोणासाखे माहीत नाहीत, एक कोण तो बाप ठरवा पहिल्यांदा; उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंची खिल्ली उडवली
उंची पेग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, डोळे कोणासाखे माहीत नाहीत, एक कोण तो बाप ठरवा पहिल्यांदा; उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंची खिल्ली उडवली
राज्यात पावसाचा कहर! सताऱ्यातील पश्चिम भागातील पर्यटनस्थळे तब्बल दोन महिने बंद; आंबेनळी घाट संध्याकाळी 7 ते सकाळी सातपर्यंत बंद
राज्यात पावसाचा कहर! सताऱ्यातील पश्चिम भागातील पर्यटनस्थळे तब्बल दोन महिने बंद; आंबेनळी घाट संध्याकाळी 7 ते सकाळी सातपर्यंत बंद
Shashi Tharoor : अमेरिकेचे लोक ओसामा बिन लादेनला विसरले नसतील, ट्रम्प-मुनीर लंचनंतर शशी थरुर यांनी दाखवला आरसा
अमेरिकेचे लोक ओसामा बिन लादेनला विसरले नसतील, ट्रम्प-मुनीर लंचनंतर शशी थरुर यांनी दाखवला आरसा
Shubman Gill : भारताचा कॅप्टन शुभमन गिलची तीन शब्दांची पोस्ट,टीमच्या एकतेचं फोटोतून दर्शन, इंग्लंडला सूचक इशारा
शुभमन गिलची तीन शब्दांची पोस्ट,टीमच्या एकतेचं फोटोतून दर्शन, इंग्लंडला सूचक इशारा
Embed widget
OSZAR »