Karuna Sharma Divorce Update: करुणा शर्मांच्या पोटगीतील 50 टक्के रक्कम जमा करण्याचे आदेश
Karuna Sharma Divorce Update: करुणा शर्मांच्या पोटगीतील 50 टक्के रक्कम जमा करण्याचे आदेश
जी मंत्री धनंजय मुंडे यांना हायकोर्टाने दंडका दिलाय. करुणा मुंडे यांना देण्यात येणाऱ्या पोटगी मधील 50% रक्कम ही कोर्टामध्ये जमा करण्याचे आदेशही देण्यात आले. घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणी कौटुंबिक न्यायालयाने मुंडेना दोषी ठरवलं होतं. न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठाने पोटगीच्या संदर्भातले आदेश दिलेत. पत्नीला एक लाख 25 हजार रुपयांची पोटगी आणि मुलगी शिवानी तिला 75 हजार रुपये दर माहा पोटगी देण्याचे आदेशही कोर्टान दिलेले होते.
हे ही पाहा..
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा (Hindi Compulsion) शिकवण्याच्या निर्णयाबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून सर्व साधारण हिंदी भाषेसह वेळापत्रकात तृतीय भाषा म्हणून इतर भारतीय भाषांचा पर्याय वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परिणामी, त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्यावर शालेय शिक्षण विभाग ठाम असल्याचे बघायला मिळाले आहे.
तिसरी भाषा शिकण्यासाठी कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण, कार्य शिक्षणाचे तास कमी केल्याची देखील माहिती समोर आली आहे. तर मागील वेळापत्रकातील 45 आणि 60 मिनिटाची तासिका सुद्धा केली 35 मिनिटांची करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने शासन निर्णय जाहीर होताच दुसऱ्या दिवशी इयत्ता पहिलीसाठीचे वेळापत्रक जाहीर केलं आहे.




