बाजीगरमध्ये शाहरुख खानची लहानपणी भूमिका निभावणारा कलाकार आता झालाय 43 वर्षांचा; पाहा फोटो

Sumit Pathak : आज आम्ही तुम्हाला एका बाल कलाकाराबद्दल सांगणार आहोत, ज्याने शाहरुख खान आणि सलमान खानच्या चित्रपटांमध्ये काम केले होते, परंतु काही काळानंतर त्याने अभिनयापासून स्वतःला दूर केले आणि आता तो एक यशस्वी उद्योजक आहे. चला त्याच्याबद्दल जाणून घेऊया.

Continues below advertisement

Sumit Pathak : बॉलीवूडमध्ये अशा अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, ज्यामध्ये लहान मुलांची भूमिका करणाऱ्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने छाप सोडली, पण नंतर अचानकच ते गायब झाले. अशाच एका चाइल्ड आर्टिस्टबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत — त्यांचे नाव आहे सुमित पाठक. 1990 च्या दशकात ते टॉप चाइल्ड आर्टिस्टपैकी एक होते. आज तो एका ग्लोबल कंपनीचा प्रमुख आहेॉ आणि यशस्वी उद्योजक बनला आहे.  चला, त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

Continues below advertisement

शाहरुख खानच्या ‘बाजीगर’मध्ये झळकला होता सुमित पाठक 

1990 च्या दशकात सुमित पाठक याने 1993 मध्ये आलेल्या शाहरुख खानच्या ‘बाजीगर’ चित्रपटात लहान अजय मल्होत्रा/विक्की मल्होत्रा यांची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी त्यांचा अभिनय खूपच पसंत केला होता.

सलमान खानसोबत स्क्रीन शेअर केली

सुमित पाठक यांनी सलमान खानसोबतही काम केलं आहे. त्यांनी 2002 मध्ये आलेल्या ‘तुमको ना भूल पाएंगे’ या चित्रपटात सलमानच्या भावाची भूमिका केली होती. त्यानंतर 2004 मध्ये आलेल्या ‘टार्जन – द वंडर कार’ मध्ये वत्सल सेठचा मित्र म्हणून तो सिनेमात झळकलेला पाहायला मिळाला होता. मात्र, त्या दोन्ही चित्रपटांना अपेक्षित यश मिळालं नाही, आणि त्यामुळे सुमितचा अभिनयही दुर्लक्षित राहिला.

टेलिव्हिजनवर लोकप्रियता मिळवली

सुमित यांना चित्रपटांमध्ये जरी फारसा यश मिळालं नाही, तरी टेलिव्हिजनवर तो एक प्रसिद्ध चेहरा बनला होता. त्याने सुपरहिरो-फँटसी शो ‘भक्ती ही शक्ती है’ मध्ये हिरोची भूमिका साकारली होती, जी लहान मुलांमध्ये खूपच लोकप्रिय झाली. त्याचबरोबर त्यांनी ओसवाल्ड, पावर रेंजर्स, रिची रिच, बेब्लेड अशा प्रसिद्ध कार्टून शोसाठी आवाज दिला होता. त्यामुळे सुमित यांनी मुलांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली.

अभिनयातून दूर, व्यवसायाकडे वाटचाल

चित्रपटसृष्टीत फारसं समाधानकारक यश न मिळाल्याने सुमित पाठक याने काही काळाने अभिनयापासून स्वत:ला दूर ठेवण्यास सुरुवात केली आणि व्यवसायाकडे वळाला. सध्या तो मीडिया-टेक क्षेत्रात प्रमुख पदावर कार्यरत आहेत आणि यशस्वी उद्योजक म्हणून ओळखला जातोय. ते गुलमोहर मीडिया या कंपनीचे नेतृत्व करतात, जी एक भाषा लोकलायझेशन फर्म आहे. त्यांची कंपनी जागतिक स्तरावरील कंटेंटला स्थानिक भाषांमध्ये रूपांतरित करण्याचं काम करते, जेणेकरून विविध भागांतील प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचू शकतो. सुमित पाठक यांची ही प्रेरणादायी वाटचाल चाइल्ड आर्टिस्टपासून ते यशस्वी उद्योजकापर्यंतची आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर हिंदूस्तानी भाऊ हळहळला, डोळ्यात पाणी, म्हणाला..VIDEO

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »