जेव्हा रवीना टंडनच्या हातावर अभिनेत्याने उलटी केली होती, स्वत:चं सांगितला किस्सा VIDEO
Raveena Tandon : जेव्हा रवीना टंडनच्या हातावर अभिनेत्याने उलटी केली होती, स्वत:चं सांगितला किस्सा VIDEO
Raveena Tandon : बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री रवीना टंडन आजही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. 1991 साली तिने सलमान खानसोबतच्या पत्थर के फूल या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. सध्या रवीना 52 वर्षांची असून अजूनही ती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसते. आता तिची मुलगी राशा थडानी हिनेही चालू वर्षी आझाद या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. रवीनाने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक रिअॅलिटी शोजमध्ये आपले अनुभव शेअर केले होते, त्यातील सर्वात धक्कादायक अनुभव म्हणजे एका जाहिरात शूटिंगदरम्यान एका मॉडेलनं तिच्या हातावर उलटी केली होती.
रवीना टंडनच्या हातावर कोणी केली होती उलटी?
रवीना टंडननं हा धक्कादायक अनुभव दिवंगत अभिनेता फारुख शेख यांच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो 'जीना इसी का नाम है' मध्ये सांगितला होता. या शोमध्ये ती प्रसिद्ध जाहिरात निर्माते प्रल्हाद कक्कर यांच्यासोबत आली होती. त्या वेळी रवीना खूप तरुण होती आणि ती शोमध्ये एक चमकदार हिरव्या रंगाचा सूट घालून आली होती. तिने सांगितले की, तेव्हा ती दहावीत शिकत होती आणि प्रल्हाद कक्कर यांच्यासोबत एका अॅडसाठी शूट करत होती. त्या जाहिरातीत त्या काळचा बाल कलाकार आणि आजचा अभिनेता आफताब शिवदासानी होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हा आफताब फक्त 10 वर्षांचा होता.
ट्रेंडिंग
नेमकं काय घडलं होतं?
त्या जाहिरातीत आफताब एका अशा मुलाची भूमिका करत होता जो खूप चॉकलेट खातो. त्यामुळे त्या सीनचे अनेक रीटेक्स झाले आणि आफताबनं खूप चॉकलेट खाल्ल्यामुळे त्याला उलटी येऊ लागली. त्याच वेळी प्रहलाद कक्कर यांनी सांगितलं की, सेटवर एकही थेंब पडता कामा नये, कारण संपूर्ण सेट पांढऱ्या रंगाचा होता. त्यामुळे घाबरलेल्या रवीनाने झटकन आफताबच्या तोंडासमोर आपला हात केला आणि अख्खी उलटी तिच्या हातावर झाली. त्यानंतर खुद्द रवीना टंडनलाही सेटवर उलटी येण्याची वेळ आली होती. सध्या रवीनाला शेवटचं इन गलियों में (2025) या चित्रपटात पाहिलं गेलं होतं. सध्या ती आपल्या मुलगी राशाच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या